धूळ, प्रदुषण, ऊन किंवा मग अयोग्य आहार, रात्रीची जागरणं अशी बदललेली लाईफस्टाईल... या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर जसा होतो, तसाच तो आपल्या त्वचेवरही होत असतो... म्हणूनच तर हल्ली त्वचा, केस यांच्या समस्याही खूप जास्त वाढल्या आहेत आणि जवळपास प्रत्येकालाच त्याविषयीची एखादी तरी तक्रार असतेच असते.. त्वचेवर अकाली सुरकुत्या (skin care) दिसायला लागणं हा त्यातलाच एक प्रकार.. म्हणूनच तर त्यासाठी हा घ्या एक सोपा उपाय.
त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊ नयेत, यासाठी त्वचा नेहमीच हायड्रेटेड असणं गरजेचं असतं.. म्हणूनच त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ब्यूटी एक्सपर्ट चेहरा धुतल्यानंतर नियमितपणे टोनर लावण्याचा सल्ला देत असतात. त्वचेचा टवटवीतपणा, तारूण्य टिकवून ठेवायचं असेल तर टोनर हा आपल्या डेली रुटीनचा एक भाग असायलाच हवा...
DIY: घरीच तयार करा कंडिशनर, केसांवर खुलेल नॅचरल ब्राऊन शेड, पांढऱ्या केसांवर उत्तम उपाय
म्हणूनच तर घरच्याघरी टोनर (jeera toner) तयार करण्याचा हा घ्या एक उत्तम आणि सोपा पर्याय.. तुमच्या स्वयंपाक घरातले फोडणीचे जिरे जरा बाहेर काढा आणि त्यापासून ॲण्टी एजिंग टोनर (anti aging toner from cumin seeds) तयार करा. जिऱ्यांमध्ये असणारे काही गुणधर्म तुमचं सौंदर्य वाढविण्यासाठी निश्चितच मदत करणारे आहेत..
सौंदर्यासाठी जीरा टोनर का आहे उपयुक्त?
- जिऱ्यांमध्ये ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टी इंफ्लेमेटरी आणि ॲण्टी एजिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात.
- त्यामुळे कमी वयात चेहऱ्या दिसू लागलेल्या फाईन लाईन्स कमी करण्यासाठी जीरा टोनर उपयुक्त् ठरते.
- जिऱ्यांमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे त्वचेचा सैलसरपणा कमी होतो.
- डेड स्किन काढून टाकण्यासाठी आणि त्वचेला नवी चमक देण्यासाठी जीरा टोनर उपयुक्त ठरते.
कसे तयार करायचे जीरा टोनर
- जीरा टोनर तयार करण्यासाठी आपल्याला जिरे, पाणी, रोझ वॉटर आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे साहित्य लागणार आहे.
- सगळ्यात आधी अर्धा कप पाण्यात एक टेबलस्पून जिरे टाका आणि रात्रभर ते त्या पाण्यात भिजू द्या.
- दुसऱ्यादिवशी पाणी गाळून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.
- आता या पाण्यामध्ये दोन टेबलस्पून रोझ वॉटर टाका आणि दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून टाका. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने जीरा टोनर झालं तयार.
- हे टोनर दररोज रात्री झोपताना चेहऱ्यावर लावावं.
Red lipstick tips: आलियासारखी रेड लिपस्टिक लावायची डेअरिंग करायची तर ५ गोष्टी लक्षात ठेवा, दिसा कॉन्फिडन्ट, हॉट!
- टोनर लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यानंतर एका कापसावर हे टोनर घ्या आणि अलगदपणे कापसाने चेहऱ्यावर टॅपिंग करत टोनर लावा. नियमितपणे वापर केल्यास खूपच लवकर चेहरा स्वच्छ, नितळ दिसू लागतो. हा उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसणं खूप कमी होतं.