अभिनेत्री राणी मुखर्जी जणू काही चित्रपटांपासून दूर गेली आहे. शिवाय इतर अभिनेत्रींप्रमाणे ती कोणत्या ना कोणत्या कारणाने फार चर्चेतही दिसते. नुकतीच ती कपिल शर्मा शो मध्ये दिसून आली. या कार्यक्रमात तिची झलक पाहिली आणि 'कुछ कुछ होता है....' या चित्रपटात दिसलेली सुंदर, आकर्षक फिगर असणारी राणी मुखर्जी हिच का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला. राणी मुखर्जीच्या लूकमध्ये खूपच बदल झाला असून ती आता अधिक प्रगल्भ दिसू लागली आहे.
या कार्यक्रमानंतर राणीच्या लूक्सची तर चर्चा झालीच, पण त्यासोबतच आणखी एका बाबतीतही सोशल मिडियावर बरीच चर्चा रंगली होती. ती चर्चा होती राणीने नेसलेल्या साडीची. या कार्यक्रमासाठी येताना राणीने फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता यांनी डिझाईन केलेली पिवळ्या धमक रंगाची साडी नेसली होती. मसाबा गुप्ता यांच्या नविन कलेक्शनमधली ही साडी होती. Yellow Blooming Cow Saree या नावाने ही साडी ओळखली जाते. तब्बल १५ हजार रूपये एवढी या साडीची किंमत आहे. या साडीबद्दल अधिक सांगायचं तर Viscose Crepe या प्रकारातला साडीचा कपडा असून साडीचा रंग गडद पिवळा आहे. याशिवाय या साडीवर गाईच्या आकाराचे मोठे मोठे प्रिंट काढले आहेत. म्हणूनच या साडीला त्यांनी Cow Saree असं नाव दिलं आहे.
अशी डार्क रंगाची आणि मोठ्या प्रिंटची साडी प्रत्येकीलाच शोभून दिसते असे नाही. अशी साडी नेसायची असेल तर थोडी काळजी घ्यायलाच हवी... १. मोठ्या प्रिंटची साडी नेसायची असेल तर शक्यतो पदर हातावर सोडू नका. साडीचे प्रिंट मोठे असल्याने तुम्ही अधिक जाड दिसू शकता. त्यामुळे अशी मोठ्या प्रिंटची साडी नेसल्यावर पदराच्या छोट्या छोट्या प्लेट्स करा आणि त्या छानपैकी पिनअप करा.२. मोठ्या प्रिंटची साडी शक्यतो लठ्ठ किंवा जाड महिलांनी नेसणे टाळावे. कारण अशी साडी नेसल्यामुळे त्या अधिकच जाड दिसू लागतात.३. उंच महिलांना मोठ्या प्रिंटच्या साड्या नेसणे अधिक शोभून दिसते. उंचीने कमी असणाऱ्या महिलांनीही मोठ्या प्रिंटच्या साड्या नेसणे सहसा टाळावे.४. मोठ्या प्रिंटच्या साड्या नेसायच्या असतील तर त्याचे ब्लाऊज शक्यतो प्लेन असावे. ५. मोठ्या प्रिंटच्या साड्या नेसल्यावर खूप हेवी ज्वेलरी घालणे टाळावे.