साफ, स्वच्छ दात तुमच्या पर्सनॅलिटीत भर घालतात. ओरल हेल्थचा परिणाम ओव्हर ऑल आरोग्यावरही होतो. खाण्यापिण्यात काही मसालेदार पदार्थांचा समावेश दात पिवळे होण्याचं कारण ठरतो. यापासून बचावासाठी तुम्ही दिवसभरातून दोन ते तीनवेळा ब्रश करायाला हवा. (Hair Care Tips) डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही टिथ क्लिनिंगही करू शकता. सतत क्लिनिकमध्ये जाऊन दात स्वच्छ करून घेणं त्रासदायक वाटू शकतं. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. ( How to Clean Yellow Teeth at Home Naturally)
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार पिवळ्या दातांना पांढरे आणि चमकदार बनवण्यासाठी सावधगिरी बाळगायला हवी. निष्काळजीपणामुळे दातांना नुकसान पोहोचू शकतं. दात सेंसिटिव्ह होतात आणि कॅव्हिटीजचाही धोका वाढतो. दातांना स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित ब्रश करणं गरजेचं आहे. (Yellow Teeth Whitening Tips)
याव्यतिरिक्त कोणतेही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर ब्रश करायला विसरू नका. यामुळे दात पिवळ्या दातांची समस्या उद्भवू शकता. २०१८ च्या अभ्यासानुसार दात पांढरे करण्यासाठी टुथपेस्टऐवजी तुम्ही इलेक्ट्रिक ब्रशचा वापर करू शकता.
१) दात क्लिन करण्यासाठी बेकींग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचचा वापर तुम्ही करू शकता. बेकींग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साईडने बनवलेली पेस्ट दातांवर लावा. यामुळे प्लाक आणि बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होईल. ही पेस्ट बनवण्यासठी यात १ चमचा बेकींग सोडा आणि २ चमचे हायड्रोजन पेरोक्साईडसोबत मिसळून लावा. ही पेस्ट दातांना लावून ब्रशने व्यवस्थित स्वच्छ करा.
ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा
२) दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचाही वापर करू शकता. २ चमचे एप्पल सायडर व्हिनेगर १ कप पाण्यात मिसळून माऊथवॉश तयार करा. हे मिश्रण तोंडात ३० सेंकद फिरवा नंतर पाण्याने गुळण्या आणि ब्रश करा. याचा वापर जास्त प्रमाणात करू शकता. अन्यथा दातांचे नुकसान होऊ शकते.
३) लिंबू, संत्री आणि केळ्यांच्या सालीने पिवळ्या दातांपासून सुटका मिळवू शकता. ही सालं दातांवर रगडल्यास पिवळेपणा दूर होतो आणि दात पांढरे, चमकदार दिसतात. असं मानलं जातं की सालीमध्ये डि-लिमोनेन सायट्रिक एसिड असते जे दातांना पांढरे करण्यास फायदेशीर ठरते. दात स्वच्छ करण्यासाठी या पदार्थांच्या साली २ मिनिटं हळूहळू रगडा काही वेळानंतर स्वच्छ ब्रश करा.