आपले दात पिवळसर, दात किडणे किंवा दातांमध्ये पोकळी निर्माण होणे अशी समस्या उद्भवत असते. या दातांच्या समस्येबाबत लवकरात लवकर तोडगा नाही काढला तर, दातात पोकळ निर्माण होते आणि दात पडू लागतात. एका किडलेल्या दातामुळे इतर दात देखील किडतात. आणि या कारणामुळे तुमचे इतर दात देखील पडतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर या दातांवर उपचार केले तर, वेळीच दात निरोगी राहतील. आणि दात पडण्यापासून वाचतील. दात किडण्याचे कारणे अनेक आहेत. बहुतांशवेळी जास्त साखर खाल्ल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते. आपण घरगुती उपायामधून देखील दातांमधील समस्या सोडवू शकता. दातांचा पिवळसरपणा, कीड, आणि जंत देखील घरगुती उपाय करून सोडवू शकता.
हर्बल पावडर
दातांसाठी हर्बल पावडर तयार करणे खूप सोपे आहे आणि ते दातांसोबतच हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर उपचार करते. ही पावडर बनवण्यासाठी २ चमचे आवळा, एक चमचा कडुलिंब, अर्धा चमचा दालचिनी पावडर, बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा लवंग पावडर एकत्र करून मिक्स करा. या हर्बल पावडरने दररोज दात घासल्याने तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल.
खोबरेल तेल
नारळाच्या तेलाचा वापर दातातील जंत दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. नारळाच्या तेलाने दातांमधील प्लेक, बॅक्टेरिया, किड आणि दातांची दुर्गंधी दूर होते. यासाठी नारळाच्या तेलाचे ऑईल पुलिंग करायचे आहे. सर्वप्रथम नारळाचे तेल तोंडात घेणे आणि ते तेल ५ ते १० मिनिटे तोंडात फिरवायचे आहे आणि शेवटी थुंकून द्यायचे आहे. हे खोबरेल तेल गिळायचे नाही आहे. पोकळी काढून टाकण्यासाठी हे सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे.
तुरटीची पेस्ट
तुरटी अनेक कारणांसाठी वापरली जाते. सर्वप्रथम चिमुटभर खायचा चुना घ्या, आणि चिमुटरभर तुरटीची पावडर घ्या. चुना+तुरटी+दोन थेंब पाणी घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट कापसाच्या मदतीने दातांना लावा. ही पेस्ट तोंड उघडुन लावावे, वरील दात खालील दातांना काही मिनिटे लागू देऊ नका, जिभही नाही. यामुळे लाळ वाहून येईल, याच्यात किड वाहून जाईल. हे दुसऱ्या दिवशीही करा. म्हणजे राहिलेली किड देखील निश्चित निघून जाईल.