Lokmat Sakhi >Beauty > चेहरा तरुण-वय कमी-केस मात्र पांढरे? करा ॲक्युप्रेशर- योगमुद्रेचा सोपा उपाय, म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेच

चेहरा तरुण-वय कमी-केस मात्र पांढरे? करा ॲक्युप्रेशर- योगमुद्रेचा सोपा उपाय, म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेच

Best Solution For Black Hair: कमी वयातच केस पांढरे होऊ लागले असतील तर हा ॲक्युप्रेशर- योगमुद्रेचा उपाय (yog mudra and acupressure therapy) करून पाहा.. पांढरे केसही काळे होतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2023 04:09 PM2023-11-03T16:09:48+5:302023-11-03T16:13:22+5:30

Best Solution For Black Hair: कमी वयातच केस पांढरे होऊ लागले असतील तर हा ॲक्युप्रेशर- योगमुद्रेचा उपाय (yog mudra and acupressure therapy) करून पाहा.. पांढरे केसही काळे होतील...

Yog mudra for grey hair, yoga and acupressure therapy for reversing grey hair into black | चेहरा तरुण-वय कमी-केस मात्र पांढरे? करा ॲक्युप्रेशर- योगमुद्रेचा सोपा उपाय, म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेच

चेहरा तरुण-वय कमी-केस मात्र पांढरे? करा ॲक्युप्रेशर- योगमुद्रेचा सोपा उपाय, म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेच

Highlightsकोणत्या २ योगमुद्रा महत्वाच्या ठरतात, ते पाहूया.. तसेच ॲक्युप्रेशरचा उपयोग करून केस काळे कसे ठेवता येतील, याचीही माहिती घेऊया....

योगाभ्यासाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळेच तर आज भारतीय योग जगभरात पसरला आहे. परदेशातली मंडळीही आता योगाभ्यास करण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेत आहेत. योगाभ्यासाच्या नियमित सरावामुळे जसे अनेक आजारांवर उपाय करता येतात, तसेच सौंदर्य वाढविण्यासाठी, टिकविण्यासाठीही योगाभ्यास उपयुक्त ठरतो. म्हणूनच योगगुरू रामदेव बाबा तसेच इतर अनेक योगतज्ज्ञ काही योग मुद्रा किंवा योगासने सांगतात, जी केस आणि त्वचा या दोन्हींसाठी उपयुक्त ठरतील (Best Solution For Black Hair). म्हणूनच आता आपण केस काळे राहावेत किंवा पांढरे केस काळे व्हावेत यासाठी कोणत्या २ योगमुद्रा महत्वाच्या ठरतात, ते पाहूया.. तसेच ॲक्युप्रेशरचा उपयोग करून केस काळे कसे ठेवता येतील, याचीही माहिती घेऊया....(yoga and acupressure therapy for reversing grey hair into black)

 

केस पांढरे होऊ नयेत म्हणून २ योग मुद्रा

१. वायु मुद्रा

वायु मुद्रेचा अभ्यास नियमितपणे केल्यास केस काळे राहण्यास नक्कीच मदत होते. दिवसातून ३ वेळा प्रत्येकी १५- १५ मिनिटांसाठी या योगमुद्रेचा अभ्यास करावा.

ब्लॅकहेड्समुळे नाक खूपच खरखरीत दिसते? ४ सोपे उपाय, नाकावरची त्वचा होईल स्वच्छ- मऊ

ही योगमुद्रा करण्यासाठी दोन्ही हाताच्या अनामिका म्हणजेच पहिले बोट दुमडून घ्या आणि अंगठ्याने अनामिकेच्या दुमडलेल्या भागावर दाब द्या.

 

२. पृथ्वी मुद्रा

पृथ्वी मुद्रा करण्यासाठी रिंग फिंगर म्हणजेच करंगळीच्या बाजुचे बोट दुमडून घ्या आणि अंगठ्याच्या पुढच्या टोकाने रिंग फिंगरच्या पुढच्या टोकावर दाब द्या. ही मुद्रा देखील दिवसांतून २ ते ३ वेळा १५- १५ मिनिटांसाठी करावी.

दिवाळीत घराला फेस्टिव्ह लूक देण्यासाठी वापरा जुन्या साड्या... बघा एकापेक्षा एक सुंदर आयडिया

ॲक्युप्रेशर

कमी वयात केस पांढरे होत असतील तर ॲयुप्रेशर थेरपीचा एक उपाय इन्स्टाग्रामच्या rekha.khandelwal.75054 या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यासाठी मधल्या बोटाच्या वरच्या पेराचे जे रिंग फिंगरच्या बाजुचे टोक आहे त्यावर दाब द्या. दाब योग्य पद्धतीने बसावा, यासाठी एक हरबरा किंवा तूर डाळीचा दाणा घ्या आणि तो चिकटपट्टीच्या साहाय्याने त्या भागावर चिटकवा. त्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे १५ मिनिटांसाठी पृथ्वी मुद्रा करा, असेही त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. 

 

Web Title: Yog mudra for grey hair, yoga and acupressure therapy for reversing grey hair into black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.