Lokmat Sakhi >Beauty > कितीही शाम्पू - कंडिशनर वापरले तरी केसगळती होतेच ? करा १ सोपी योगमुद्रा, केस गळणे बंद...

कितीही शाम्पू - कंडिशनर वापरले तरी केसगळती होतेच ? करा १ सोपी योगमुद्रा, केस गळणे बंद...

Which yoga can stop hair fall ? : रोजच्या होणाऱ्या केसगळतीने हैराण, योग्य डाएटसोबत करा एक सोपी सहज मुद्रा, केसांच्या समस्या होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2023 08:04 PM2023-10-14T20:04:21+5:302023-10-14T20:15:34+5:30

Which yoga can stop hair fall ? : रोजच्या होणाऱ्या केसगळतीने हैराण, योग्य डाएटसोबत करा एक सोपी सहज मुद्रा, केसांच्या समस्या होतील कमी

Yoga Asanas to Reduce Hair Fall Naturally,Yoga Mudras for Hair Growth and Prevent Hair Fall | कितीही शाम्पू - कंडिशनर वापरले तरी केसगळती होतेच ? करा १ सोपी योगमुद्रा, केस गळणे बंद...

कितीही शाम्पू - कंडिशनर वापरले तरी केसगळती होतेच ? करा १ सोपी योगमुद्रा, केस गळणे बंद...

आपण आपले शरीर व आरोग्य फिट ठेवण्यासाठी योग्य डाएट व योगा, एक्सरसाइज करतो. त्याचप्रमाणे केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीसुद्धा आहार आणि योगा, एक्सरसाइज यांची तितकीच गरज असते. आजकाल प्रत्येक व्यक्तीला केसांच्या बाबतीत काही ना काही समस्या आहेतच. लहान वयातच केसगळती, केस पांढरे होणे, टक्कल पडणे, कोंडा होणे यांसारख्या असंख्य समस्या जाणवतात. या समस्यांवर उपाय म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे महागडे हेअर केअर प्रॉडक्ट्स वापरतो. याचा काही अंशी केसांवर फरक पडलेला दिसतो तर काहीवेळा केसांची 'जैसे थे' अशीच स्थिती होते(Yoga Asanas To Help You With Hair Growth).

केसगळती ही एक कॉमन समस्या असली तरीही, केसांचे आरोग्य अधिक बिघडले तर ती गंभीर समस्या बनू शकते. केस गळतीची (Yoga Asanas to Reduce Hair Fall Naturally) ही समस्या कायमची बंद करायची असल्यास योग्य डाएटसोबतच योगा, एक्सरसाइज यांची मदत घेऊ शकतो. आहारतज्ज्ञ डॉ. हितेश खुराना सांगतात की केसांची योग्य काळजी न घेणे, हार्मोनल असंतुलन आणि आहारात पोषक तत्वांचा अभाव यामुळेही केस पातळ (Which Mudra is good for hair fall and hair growth?) होऊ गळू लागतात. ही सतत होणारी केसगळती थांबवण्यासाठी आपण योगाभ्यासातील अनेक योगमुद्रांचा (Mudra For Hair Growth) रोज सराव करु शकतो(Yoga Mudras for Hair Growth and Prevent Hair Fall).

केस गळण्याची नेमकी मुख्य कारणे कोणती आहेत ? 

१. जास्त ताणामुळेही केस गळायला लागतात. 

२. औषधांच्या अतिसेवनामुळेही केस गळण्याची समस्या उद्भवते. 

३. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या सुरु होते. केसांवर सतत केल्या जाणाऱ्या हेअरस्टाईल व हेअर ट्रिटमेंटमुळेही केस गळायला लागतात.

४. शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल हे देखील या समस्येचे कारण असू शकते.
 
५. वाढत्या वयामुळेही ही समस्या उद्भवते कारण एका विशिष्ट वयानंतर अनेकांचे केस गळायला लागतात. 

गरब्यासाठी हटके हेअर स्टाईल करण्याच्या नादात, केसांचे नुकसान तर करुन घेत नाही ना ?

स्किन स्पेशालिस्ट सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत, केसगळती - पांढरे केस समस्याच संपतील...

सतत होणारी केसगळती थांबवण्यासाठी रोज करा काली मुद्रा (Kali Yoga Mudra).... 

१. काली मुद्रा करतांना खाली मांडी घालून बसा त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या छातीसमोर घेऊन हातांचे तळवे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येतील असे ठेवावे. 

केस खूपच गळत आहेत ? 'या' सोप्या पद्धतीने केस विंचारल्यास केस गळणे होईल बंद...

२. आता आपली दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये व्यवस्थित अडकवून घ्यावीत. 

३. त्यानंतर दोन्ही हाताचे पहिले बोट उघडून ते एकमेकांना चिटकवून घ्यावे, तसेच दोन्ही हातांचा अंगठा एकमेकांवर विरुद्ध दिशेने ठेवावा. 

हेअर ब्रश स्वच्छ करण्यासाठी ६ सोपे उपाय, एका मिनिटांत कळकट - घाणेरडा हेअर ब्रश होईल स्वच्छ...

आसन करण्यासोबतच आपल्या आहाराकडेही लक्ष द्यावे, हिरव्या भाज्या व फळे खाणे खूप महत्वाचे आहे तसेच जंक फूड खाणे टाळावे. यासोबतच काली मुद्रा रोज करावी यामुळे आपल्या केसांच्या समस्या दूर होऊन केसांच्या सौंदर्यात भर पडेल.

Web Title: Yoga Asanas to Reduce Hair Fall Naturally,Yoga Mudras for Hair Growth and Prevent Hair Fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.