Lokmat Sakhi >Beauty > चेहेऱ्यावरील डाग घालवण्यासाठी करा योगासनं; 2 आसनांमुळे चेहेरा चमकतो आणि होतो नितळ

चेहेऱ्यावरील डाग घालवण्यासाठी करा योगासनं; 2 आसनांमुळे चेहेरा चमकतो आणि होतो नितळ

चक्रासन आणि सर्वांगासन (yogasanas for healthy skin) केल्यानं त्वचा निरोगी होवून चेहेऱ्याचं सौंदर्य वधारतं. फिटनेससाठी योगासनं आवर्जून करताना सौंदर्याचा विचार करुन (yogasanas for beautiful skin) चक्रासन आणि सर्वांगासन ही दोन आसनं नियमित करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 02:00 PM2022-07-18T14:00:58+5:302022-07-18T14:09:22+5:30

चक्रासन आणि सर्वांगासन (yogasanas for healthy skin) केल्यानं त्वचा निरोगी होवून चेहेऱ्याचं सौंदर्य वधारतं. फिटनेससाठी योगासनं आवर्जून करताना सौंदर्याचा विचार करुन (yogasanas for beautiful skin) चक्रासन आणि सर्वांगासन ही दोन आसनं नियमित करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Yoga exercise helping reduce blemishes on skin... practice of 2 Yogasana can give beautiful skin | चेहेऱ्यावरील डाग घालवण्यासाठी करा योगासनं; 2 आसनांमुळे चेहेरा चमकतो आणि होतो नितळ

चेहेऱ्यावरील डाग घालवण्यासाठी करा योगासनं; 2 आसनांमुळे चेहेरा चमकतो आणि होतो नितळ

Highlightsचक्रासन नियमित केल्यानं तरुण दिसण्यास मदत होते.सर्वांगासनाला सौंदर्य वाढवणारं आसन असंही म्हटलं जातं. 

शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी, फिटनेस राखण्यासाठी योगअभ्यास (doing yoga)  करणं महत्वाचं मानलं जातं. नियमित योगाभ्यास केल्यानं शरीरावर सकारात्मक परिणाम होतात, शरीरातील विविध अवयवांचं काम सुधारतं. नियमित योग केल्यास पचन क्रिया, स्वादूपिंड,आतडे आणि किडनी या महत्वाच्या अवयवांचं कार्य सुधारतं. योग सराव केल्यानं शारीरिक आरोग्यासोबतच त्वचेचं आरोग्यही सुधारतं. योगसाधनेतील काही विशिष्ट आसनं अशी आहेत जी (yogasanas for reduce blemishes on skin)  चेहेऱ्यावरील डाग घालवण्यासाठी, चेहेऱ्याची त्वचा नितळ करण्यासाठी महत्वाची असतात. चक्रासन आणि सर्वांगासन केल्यानं त्वचा निरोगी होवून (yogasanas for healthy and beautiful skin)  चेहेऱ्याचं सौंदर्य वधारतं. फिटनेससाठी योगासनं आवर्जून करताना सौंदर्याचा विचार करुन चक्रासन आणि सर्वांगासन ही दोन आसनं नियमित करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

Image: Google

चक्रासन

त्वचेचं आरोग्य सुधारुन चेहेऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी चक्रासनाचा सराव महत्वाचा मानला जातो. चक्रासनाला ॲण्टि एजिंग योगासन असंही म्हणतात. चक्रासनाचा सराव करताना शरीराची स्थिती गोल चाकासारखी बनते म्हणून या आसनाला चक्रासन असं म्हटलं जातं. चक्रासनात चेहेऱ्याकडे रक्तप्रवाह गतिशील होतो. यामुळे  चेहेऱ्यावरचा ग्लो वाढतो. चेहेरा सुंदर दिसतो. चक्रासन नियमित केल्यास त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. एजिंगची प्रक्रिया उशिरा सुरु होते. चेहेऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासोबतच चक्रासनामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. कंबरेच्या दोन्ही बाजुंची चरबी कमी होते. मांडीवरील चरबी कमी होते. जांघेचे स्नायू बळकट होतात. पचनासाठी उपयुक्त असलेलं हे आसन फुप्फुसांचं आरोग्यही निरोगी ठेवतं. हे आसन करताना फुप्फुसांवर ताण येतो.  फुप्फुसं मजबूत होण्यासाठी चक्रासन महत्वाचं. चक्रासनानं त्वचा निरोगी तर होतेच सोबतच या आसनातील मुद्रेमुळे डोक्याकडील रक्तप्रवाह वाढतो. त्याचा फायदा केस मजबूत होण्यास होतो.

Image: Google

चक्रासन कसे करावे?

चक्रासन करण्यासाठी पाठीवर ताठ झोपावं. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून नितंबाजवळ आणावेत. दोन्ही पायात 10-12 इंच अंतर ठेवावं.  दोन्ही हात वर नेऊन कोपरात वाकवून खांद्याच्या वर ठेवावे. हाताचे पंजे जमिनीला टेकवावे. मंद श्वसन सुरु ठेवावं. मग दीर्घ श्वास घेत हात आणि पायावर भार देत उचलत धड वर उचलावं. डोकंही वर उचलून ते तरंगतं ठेवावं. नजर वर छताकडे स्थिर ठेवावी.मंद श्वसन सुरु ठेवावं. हात आणि पाय ताणलेल्या अवस्थेत ठेवावेत.साधारण एक मिनिट या आसनात राहावं. नंतर हात कोपरात वाकवून डोकं खाली टेकवावं. मग पाठ जमिनील टेकवत पाय सरळ करावेत. दोन्ही हात कमरेच्या बाजूने जमिनीवर ताठ ठेवावे. रोज 3 ते 4 वेळा चक्रासन केल्यास फायदा होतो.

Image: Google

सर्वांगासन

सर्वांगासनाला सौंदर्य वाढवणारं आसन असंही म्हटलं जातं. सर्वांगासन करताना शरीराच्या सर्व अवयवांचा वापर केला जातो. सर्वांगासन केल्यानं शरीराच्या प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो त्याचप्रमाणे त्वचेलाही मिळतो.  सर्वांगासन करताना पाय वर हवेत असतात आणि डोकं जमिनीला टेकलेलं असतात. खांद्यावर शरीराचा पूर्ण तोल सांभाळलेला असतो. सर्वांगासन करताना रक्त प्रवाह चेहेरा आणि डोक्याच्या बाजूनं गतिमान असतो. यामुळेच चेहेऱ्यावरचं तेज वाढतं. सर्वांगासन केल्यानं म्हणून चेहेरा सुंदर दिसतो. सर्वांगासन केल्यानं चेहेऱ्यावरची चमक वाढते, केस निरोगी, मजबूत आणि चमकदार होतात. चेहेऱ्यावरचे मुरुम पुटकुळ्या आणि काळे डाग कमी होतात. 

Image: Google

सर्वांगासन कसे करावे?

सर्वांगासन करताना जमिनीवर ताठ झोपावं. दोन्ही पाय एकमेकांच्या शेजारी असावे. दोन्ही हात कमरेच्या जवळ असावेत. मंद श्वसन सुरु ठेवावं. मग दीर्घ श्वास घेत दोन्ही पाय वर उचलावेत. पाय छताच्या दिशेनं सरळ ठेवावेत.  हातानं कंबरेला आधार द्यावा. डोकं जमिनीला टेकलेलं असावं. या स्थितीत साधारणत: मिनिटभर राहावं. आसन सोडताना सावकाश कंबर खाली टेकवावी. मग पाय खाली आणून जमिनीवर टेकवावेत. दोन्ही हात कंबरेच्या बाजूला ताठ ठेवावं. 2 ते 3 वेळा सर्वांगासन करावं. 

Web Title: Yoga exercise helping reduce blemishes on skin... practice of 2 Yogasana can give beautiful skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.