Lokmat Sakhi >Beauty > सतत क्रीम किंवा फेसपॅक लावण्यापेक्षा नितळ त्वचेसाठी करा ३ सोपी आसनं, मेकअप न करता दिसा सुंदर

सतत क्रीम किंवा फेसपॅक लावण्यापेक्षा नितळ त्वचेसाठी करा ३ सोपी आसनं, मेकअप न करता दिसा सुंदर

Yoga For Glowing Skin : त्वचेवर डाग सुरकुत्या आणि फोड येऊ नयेत आणि ग्लो कायम रहावा यासाठी कोणती आसने करायला हवीत याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2022 11:56 AM2022-07-03T11:56:44+5:302022-07-03T12:03:21+5:30

Yoga For Glowing Skin : त्वचेवर डाग सुरकुत्या आणि फोड येऊ नयेत आणि ग्लो कायम रहावा यासाठी कोणती आसने करायला हवीत याविषयी...

Yoga For Glowing Skin : For smooth skin, Do 3 easy asanas, look beautiful without makeup, instead of constantly applying creams or face packs. | सतत क्रीम किंवा फेसपॅक लावण्यापेक्षा नितळ त्वचेसाठी करा ३ सोपी आसनं, मेकअप न करता दिसा सुंदर

सतत क्रीम किंवा फेसपॅक लावण्यापेक्षा नितळ त्वचेसाठी करा ३ सोपी आसनं, मेकअप न करता दिसा सुंदर

Highlightsआसनामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते, त्याचा नकळत आपल्या त्वचेवर परिणाम होतो आणि त्वचा ग्लो करण्यास मदत होते.आहार, ब्युटी प्रॉडक्ट याबरोबरच त्वचा ग्लोईंग राहावी यासाठी नियमित आसनेही करायला हवीत.

आपली त्वचा ग्लोईंग असावी यासाठी आपण एक ना अनेक उपाय करत असतो. कधी पार्लरच्य ट्रीटमेंटस तर कधी घरगुती उपचार, कधी महागडी उत्पादने लावून मेकअप तर कधी आणखी काही. पण काही केल्या त्वचेवरचे डाग, सुरकुत्या, फोड कमी होत नाहीत, यामागे अनेक कारणे असतात. त्वचा खराब होण्यामागे प्रदूषण, पोट खराब असणे, आहाराच्या चुकीच्या सवयी, शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन्सची कमतरता असणे अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. (Skin Care Tips) मात्र अभिनेत्रींची त्वचा जशी नितळ असते तशी आपलीही दिसावी यासाठी सतत ब्यूटी प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा चांगला आहार घेणे, भरपूर पाणी पिणे आणि व्यायाम करणे अशा नैसर्गिक गोष्टी केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. योगासने करण्याचे लगेच फायदे दिसत नसले तरी त्याचा दिर्घकालीन चांगला उपयोग होतो. पाहूयात त्वचेवर डाग सुरकुत्या आणि फोड येऊ नयेत आणि ग्लो कायम रहावा यासाठी कोणती आसने करायला हवीत (Yoga For Glowing Skin) . 

१. पद्मासन 

पद्मासन हे दिसायला सोपे दिसत असले तरी पायांना काहीसा ताण पडणारे आसन आहे. पद्मासनात काय आहे ज्यामुळे त्वचा ग्लो करेल असे आपल्याला वाटू शकते. पण पद्मासनात आपण शांत बसतो, त्यामुळे आपल्या मेंदूचा ताण कमी होण्यास मदत होते. रक्तप्रवाह सुरळीत झाल्याने ही त्वचेवर एकप्रकारचा ग्लो येण्यास मदत होते. दोन्ही पायांचे पद्मासन घालून हात योगमुद्रेत ठेवावेत. पाठीचा कणा ताठ राहील याकडे लक्ष देऊन संथ श्वसन सुरु ठेवावे. 

(Image : Google)
(Image : Google)

२. पश्चिमोत्तानासन 

या आसनामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्वचेची लवचिकता वाढून मन शांत करण्यासाठी हे आसन उपयुक्त असते. मन शांत झाले की त्याचा परिणाम नकळत आपल्या त्वचेवर होतो आणि त्वचा ग्लो होण्यास मदत होते. आपले पोट साफ नसेल तरी चेहऱ्यावर फोड येणे, चेहरा डल दिसणे अशा समस्या उद्भवतात. पण या आसनामुळे पचनक्रियाही सुरळीत होत असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होते. पाय लांब करुन दोन्ही हाताने पायाची पावले धरायची आणि डोके गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. संथ श्वसन करत काही वेळ या आसनात राहायचा प्रयत्न करायचा यामुळे पाठ, पोट, पाय सगळ्याला ताण पडतो आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. उष्ट्रासन 

या आसनामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते, तसेच शरीरातील काही हार्मोन्समध्ये बदल होत असल्याने त्याचा त्वचेवर अतिशय चांगला परिणाम होतो. गुडघ्यावर बसून मांडया आणि पाय एका सरळ रेषेत ठेवावेत. पाठीतून मागे वाकत हाताने पायाच्या टाचा धरण्याचा प्रयत्न करावा, श्वसन संथपणे चालू ठेवावे आणि छाती वर उचलावी. यामध्ये आपले शरीर उंटाप्रमाणे दिसत असल्याने याला कॅमल पोज असेही म्हणतात. 

(Image : Google)
(Image : Google)

Web Title: Yoga For Glowing Skin : For smooth skin, Do 3 easy asanas, look beautiful without makeup, instead of constantly applying creams or face packs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.