Lokmat Sakhi >Beauty > त्वचेवरचा नॅचरल ग्लो कायम ठेवणाऱ्या २ योगमुद्रा.. दररोज करून बघा- नेहमीच दिसाल तरुण- सुंदर

त्वचेवरचा नॅचरल ग्लो कायम ठेवणाऱ्या २ योगमुद्रा.. दररोज करून बघा- नेहमीच दिसाल तरुण- सुंदर

Yoga Mudra For Naturally Glowing Skin: त्वचेवरची चमक टिकून राहण्यासाठी या २ योगमुद्रा अतिशय उपयुक्त ठरतात. नियमित करून बघा. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी इतर कोणतं महागडं कॉस्मेटिक्स वापरण्याची गरजच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 03:04 PM2023-01-10T15:04:23+5:302023-01-10T15:05:18+5:30

Yoga Mudra For Naturally Glowing Skin: त्वचेवरची चमक टिकून राहण्यासाठी या २ योगमुद्रा अतिशय उपयुक्त ठरतात. नियमित करून बघा. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी इतर कोणतं महागडं कॉस्मेटिक्स वापरण्याची गरजच नाही...

Yoga mudra for naturally glowing skin, How to maintain natural glow of your skin? Yoga for flawless radiant skin | त्वचेवरचा नॅचरल ग्लो कायम ठेवणाऱ्या २ योगमुद्रा.. दररोज करून बघा- नेहमीच दिसाल तरुण- सुंदर

त्वचेवरचा नॅचरल ग्लो कायम ठेवणाऱ्या २ योगमुद्रा.. दररोज करून बघा- नेहमीच दिसाल तरुण- सुंदर

Highlightsनियमित करून बघा. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी इतर कोणतं महागडं कॉस्मेटिक्स वापरण्याची गरजच नाही...

विशी- पंचविशीत त्वचेचा पोत काही वेगळाच असतो. त्वचेवर ग्लो, सुंदरता दिसून येते. पण जसं जसं वय पुढे- पुढे सरत जातं, तसं तसं त्वचेतला हा नॅचरल ग्लो कमी झाल्यासारखा वाटतो. मग तो टिकवून ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे क्रिम, ब्यूटी ट्रिटमेंट्स सुरू करतो. पण हा झाला तात्पुरता उपाय. म्हणूनच चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लाे कायम ठेवायचा असेल, वाढत्या वयासोबत तो कमी होऊ द्यायचा नसेल, तर या २ योगमुद्रा करून बघा (How to maintain natural glow of skin?). योगाने जसा फिटनेस वाढतो, तसेच केसांचे आणि त्वचेचे आरोग्य (Yoga for flawless radiant skin) सुधारण्यासही नक्कीच मदत होते. 

चमकदार त्वचेसाठी २ योगमुद्रा
हा उपाय इन्स्टाग्रामच्या su_is_a_yogi या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या दोन्ही योगमुद्रा जर दररोज १५ ते २० मिनिटांसाठी नियमितपणे केल्या तर दिड ते दोन महिन्यातच चेहरा तेजस्वी, चमकदार दिसू लागेल, असं सांगितलं आहे. कॉलरा, डिसेंट्री, डायरिया, सर्दी- खोकला असा त्रास असणाऱ्यांनी आणि गर्भवती महिलांनी या मुद्रा करू नयेत.

 

१. वरुण मुद्रा (Varun Mudra)
ही मुद्रा शरीरातील पाणी नियंत्रित ठेवण्यात मदत करते. त्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या हायड्रेटेड आणि मॉईश्चराईज्ड राहण्यास मदत होते.

फिटनेससाठी नुसतंच वॉकिंग नको, 'रेट्रो' वॉकिंग करा, कसं करायचं- काय फायदे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला 

ही मुद्रा करण्यासाठी करंगळी आणि अंगठा या दोन बोटांचा वापर करावा. करंगळी आणि अंगठ्याच्या समोरच्या टोकांनी एकमेकांवर हलकासा दाब द्यावा. 

 

२. अपान मुद्रा (Apan Mudra)
शरीर शुद्धीकरणासाठी ही मुद्रा उत्तम मानली जाते. त्यामुळे डिटॉक्स मुद्रा म्हणूनही अपान मुद्रा ओळखली जाते.

स्ट्रॉबेरीमध्ये असतात लहानसे किडे- वरवरचं धुतल्याने न निघणारे, म्हणूनच पाहा स्ट्रॉबेरी धुण्याची योग्य पद्धत

यामुळे शरीरातील विषारी द्रवे शरीराबाहेर काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच त्वचा नितळ- चमकदार होते. ही मुद्रा करण्यासाठी मधले बोट, अनामिका आणि अंगठा यांची समोरची टोके एकमेकांवर ठेवून हलकासा दाब द्यावा.  

 

Web Title: Yoga mudra for naturally glowing skin, How to maintain natural glow of your skin? Yoga for flawless radiant skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.