Lokmat Sakhi >Beauty > केमिकल डाय कशाला? दह्यात फक्त ४ गोष्टी मिसळा; केस वाढतील भरभर - कोंडाही राहणार नाही

केमिकल डाय कशाला? दह्यात फक्त ४ गोष्टी मिसळा; केस वाढतील भरभर - कोंडाही राहणार नाही

Yogurt for Hair and Scalp: Benefits and How to Apply : केस गळती, पांढरे केस, केसात कोंडा 'या' समस्या होतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2024 04:35 PM2024-07-21T16:35:23+5:302024-07-21T16:36:19+5:30

Yogurt for Hair and Scalp: Benefits and How to Apply : केस गळती, पांढरे केस, केसात कोंडा 'या' समस्या होतील दूर

Yogurt for Hair and Scalp: Benefits and How to Apply | केमिकल डाय कशाला? दह्यात फक्त ४ गोष्टी मिसळा; केस वाढतील भरभर - कोंडाही राहणार नाही

केमिकल डाय कशाला? दह्यात फक्त ४ गोष्टी मिसळा; केस वाढतील भरभर - कोंडाही राहणार नाही

आपले केस सिल्की आणि शायनी असावे कोणाला नाही वाटत (Hair care tips). काळेभोर सुंदर केस सगळ्यांना हवे. पण बिघडलेली जीवनशैली आणि पौष्टीक आहार न खाल्ल्यामुळे केसांचे नुकसान होते (Grey hairs problem). यामुळे केसात कोंडा, केस गळती, केस अकाली पांढरे होणे यासह इतर केसांच्या निगडीत समस्या वाढतात (White hairs).

केस पांढरे होण्यामागे अनेक कारणं आहेत. पांढरे केस काळे करण्यासाठी आपण डायऐवजी घरगुती उपायांना देखील फॉलो करू शकता. केस काळे करण्यासाठी आपण दह्याचा वापर करू शकता. दही, मेथी दाणे, कांदा, खोबरेल तेल आणि बीटरूटचा वापर करून हेअर मास्क रेडी करा. या नैसर्गिक गोष्टींमुळे केसांवर नवी चमक येईल(Yogurt for Hair and Scalp: Benefits and How to Apply).

केसांना द्या नैसर्गिक कलर

लागणारं साहित्य

मेथी दाणे

कांदा

दही

बूट - चपला - सॅण्डल पावसात भिजतात, ते चटकन कसे सुकवाल? ३ ट्रिक्स- मिनिटात कोरडे होतील

खोबरेल तेल

बीटरूट

या पद्धतीने तयार करा घरगुती हेअर डाय

केसांना केमिकलयुक्त डाय लावण्याऐवजी घरगुती नैसर्गिक गोष्टींनी केस काळे करा. यासाठी रात्रभर पाण्यात मेथी दाणे भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी एका भांड्यात मेथी दाणे, बारीक चिरलेला कांदा, बीटरूट आणि त्यात २ चमचे दही घालून चांगले मिक्स करा.

मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य घालून त्याची पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट एका भांड्यात काढून घ्या. त्यात एक चमचा खोबरेल तेल घाला. तयार पेस्ट केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. यातील गुणधर्मामुळे केस मजबूत होतील, शिवाय केसांना नवी चमक मिळेल.

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? पाहा, कानात मळ झाला तर काय करायचे..

केसांसाठी दह्याचे फायदे

दही एक नैसर्गिक केस मऊ करणारे एजंट म्हणून काम करते. ज्यामुळे केसांची योग वाढ होते. दही हे पौष्टीक्तेने परिपूर्ण असते. दह्यामध्ये प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्व असतात. जे केसांच्या वाढीस चालना देतात. शिवाय केसांना नवीन जीवन मिळते.

Web Title: Yogurt for Hair and Scalp: Benefits and How to Apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.