Lokmat Sakhi >Beauty > मेकअप न करताही तुमचे गाल दिसू शकतील सुंदर लाल-गुलाबी, फक्त ५ गोष्टी गालावर चढेल लाली

मेकअप न करताही तुमचे गाल दिसू शकतील सुंदर लाल-गुलाबी, फक्त ५ गोष्टी गालावर चढेल लाली

मेक अप न करता नैसर्गिकरित्या गाल लाल व्हावेत म्हणून घरच्या घरी काय करायचे याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 04:00 PM2022-03-13T16:00:04+5:302022-03-13T16:12:51+5:30

मेक अप न करता नैसर्गिकरित्या गाल लाल व्हावेत म्हणून घरच्या घरी काय करायचे याविषयी...

Your cheeks can look beautiful red-pink even without makeup, only 5 things will get red on the cheeks | मेकअप न करताही तुमचे गाल दिसू शकतील सुंदर लाल-गुलाबी, फक्त ५ गोष्टी गालावर चढेल लाली

मेकअप न करताही तुमचे गाल दिसू शकतील सुंदर लाल-गुलाबी, फक्त ५ गोष्टी गालावर चढेल लाली

Highlights गालाला गोलाकार आणि उलट्या दिशेने मसाज करणे ते लाल-गुलाबी होण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. ताण आणि राग यांमुळे त्वचा काळवंडते किंवा निस्तेज दिसायला लागते. योगा, ध्यान या गोष्टींची मदत घ्या

आपले गाल सिनेमातल्या नटींसारखे छान लाल असावेत असे प्रत्येक तरुणीला वाटते. मग त्यासाठी मेकअपचा आधार घेतला जातो. गाल रोझी दिसावेत याच्यासाठी बाजारात मिळणारी एकाहून एक उत्पादने वापरली जातात. पण या उत्पादनांच्या सततच्या वापराने त्वचा खराब होण्याची शक्यता असते. मग डाएट आणि लाईफस्टाइलमध्ये काही सोपे बदल केल्यास तुम्हाला नैसर्गिकरित्या लाल गाल मिळू शकतात. घरगुती पदार्थांचा वापर करुन आपल्या सौंदर्यात भर पडणार असेल तर कशाला महागडी उत्पादने वापरुन चेहऱ्यावर मेकअपचा थर चढवायचा? चला तर मग पाहूयात मेक अप न करता गाल छान लाल व्हावेत म्हणून काय करायचे याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. योग्य आणि पुरेसा आहार

चांगला संतुलित आहार घेणे आपल्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर असते. इतकेच नाही तर दिवसातून ठरलेले नाश्ता, दुपारचे जेवण, चहाच्या वेळचे खाणे आणि रात्रीचे जेवण या चार गोष्टी आवर्जून घ्यायलाच हव्यात. यामुळे तुमचे आरोग्य आणि पर्यायाने तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे आहाराचा आपल्या सगळ्या गोष्टींवर परिणाम होत असल्याने चांगला आहार केव्हाही महत्त्वाचा आहे. तसेच याच्या मधल्या वेळी भूक लागलीच तर चांगले आणि पौष्टीक पर्याय खायला हवेत. पोट रिकामे ठेवले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि त्वचेवर विपरित परिणाम होतो. 

२. व्यायाम आणि पाण्याची पातळी 

व्य़ायाम हा उत्तम आरोग्यासाठी गरजेचा असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. व्यायामामुळे त्वचा चांगली राहण्यासही मदत होते आणि त्यामुळे नकळत तुमचे गाल लाल दिसतात. तसेच शरीरातील पाण्याची पातळी योग्य असणेही तितकेच गरजेचे आहे. तुम्ही जितके पाणी प्याल तितकी तुमची त्वचा ग्लोईंग राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली ठेवणे आवश्यक आहे. 

३. हलके ब्लिचिंग 

तुम्हाला ला-गुलाबी गाल हवे असतील तर तुम्ही एखादे हलके ब्लिच करु शकता. यासाठी कॉटनने सायडर व्हिनेगर गालावर लावा. हे तुमच्या चेहऱ्याला सूट होत नाही असे वाटले तर चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा. मात्र त्यानंतर लगेच उन्हात जाणे टाळा. कारण लिंबाचा रस लावून उन्हात गेल्यास त्वचेवर रिअॅक्शन येऊ शकते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. राग आणि ताणावर नियंत्रण 

तुम्ही सतत चिडत असाल किंवा तुम्हाला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा ताण असेल तर त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. अशाप्रकारचा ताण आणि राग यांमुळे त्वचा काळवंडते किंवा निस्तेज दिसायला लागते. योगा, ध्यान या गोष्टींची मदत घ्या, ज्यामुळे तुमची त्वचा नकळत ग्लो करेल. इतकेच नाही तर किमान ७ ते ८ तासांची शांत झोप होणे हेही त्वचा चांगली राहण्यासाठी गरजेचे असते. त्याकडे आवर्जून लक्ष द्या. 

५. मसाज 

अनेकदा आपण इतके थकतो की आपल्या शरीराचे काही अवयव दुखत असतील त्यांचा रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नसेल असेही आपल्याला वाटत नाही. पण आपण कधी आपल्या गालांना गोलाकार मसाज केल्यास आपल्याला खूप छान वाटते. आणि याठिकाणचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. त्यामुळे गालाला गोलाकार आणि उलट्या दिशेने मसाज करणे ते लाल-गुलाबी होण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. 

Web Title: Your cheeks can look beautiful red-pink even without makeup, only 5 things will get red on the cheeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.