Join us  

दारूचे हँगओव्हर ऐकलं आहे, मात्र स्किन हँगओव्हर नवीन काय? त्वचेवर नक्की याचा काय परिणाम होतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2023 3:03 PM

What is skin hangover and how to get rid of it? दारूचे हँगओव्हर उतरतं पण त्वचेच्या हँगओव्हरचं काय? यामुळे स्किनवर होतो दुष्परिणाम..

शरीरामध्ये त्वचेची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जस जसं वय वाढत जातं तस तसं त्वचेमध्ये देखील बदल घडतात. आपल्या शरीरात काही चुकीचे घडत असेल तर, ते आपल्या त्वचेवरून लगेच निदर्शनास येते. यातीलच एक मुख्य समस्या म्हणजे स्किन हँगओव्हर. आता तुम्ही म्हणाल दारूचं हँगओव्हर ऐकलं आहे, हे स्किन हँगओव्हर नवीन काय? खरंतर स्किन हँगओव्हर देखील दारूच्या अतिरिक्त सेवनामुळे होते. त्वचेवर जळजळ होते त्यांनतर पिगमेंटेशनसारखी समस्या उद्भवते. यामागे अनेक कारणे आहेत, दारू रात्री उशिरा प्यायल्यास त्याचा शरीरावर तसेच त्वचेवर परिणाम होतो.

स्किन हँगओव्हरची लक्षणे अनेक आहेत. त्यातील मुख्य लक्षणे म्हणजे, मद्यपान केल्यामुळे झोप न लागणे, त्वचा डिहाइड्रेट होणे, कोरडी निस्तेज त्वचा पडणे ही सर्व लक्षणे हळहळू त्वचेवर निदर्शनास येतात. डोळ्यांखाली सूज येणे यासह अधिक काळसर वर्तुळे दिसणे ही देखील त्वचेच्या हँगओव्हरची लक्षणे आहेत. रात्री उशिरापर्यंत दारू प्यायल्यास ही लक्षणे त्वचेवर दिसून येतात.

मद्यपानाचे नियमित सेवन केल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम घडतात. अल्कोहोल शरीराला डिहायड्रेट करते, ज्यामुळे त्वचेतील कोरडेपणा खूप वाढतो. त्वचेच्या हँगओव्हरची काळजी योग्यवेळी न घेतल्यास, त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अल्कोहोलिक ड्रिंक्समधील साखर ग्लायकेशन नावाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देते. जे कोलेजन आणि इलास्टिन तंतूंच्या विघटनास कारणीभूत ठरते, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स उठण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

स्किन हँगओव्हरपासून वाचण्यासाठी उपाय

सर्वप्रथम ३ ते ४ लिटर पाणी पिऊन शरीर आणि त्वचेला हायड्रेट ठेवा. व्हिटॅमिन सी किंवा लिंबूवर्गीय फळांचा ज्यूस प्या. ज्यामुळे त्वचेला दारूमुळे हानी पोहोचणार नाही.

त्वचेचा हँगओव्हर टाळण्यासाठी, आपण त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरली पाहिजेत. त्वचेचा हँगओव्हर टाळण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे सूर्याकिरणांपासून दूर राहणे, यापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर सनस्क्रिन लावणे आवश्यक.

याशिवाय त्वचेचा हँगओव्हर टाळण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी. मेलाटोनिन, ज्याला स्लीप हार्मोन म्हणूनही ओळखले जाते, ही प्रक्रिया त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करते. झोपेच्या कमतरतेमुळे त्वचेची सामान्य दुरुस्तीची यंत्रणा देखील कमी पडते. त्यामुळे शरीर आणि त्वचेसाठी पुरेशी झोप आवश्यक.

टॅग्स :त्वचेची काळजीहोम रेमेडी