"माझे केस या वयातच पिकून पांढरे झाले आहेत...," "हे काय माझं केस पिकायचं वय आहे का?," "केसांना हेअर डाय करून केस रंगवू का ?" अशी असंख्य संभाषण रोज आपल्याला प्रत्येक घरातून ऐकायला मिळतात. वय झाल्यावर केसांचे पांढरे होणे, या गोष्टीला आपल्याकडे अजूनही तितक्या लगेच स्वीकारले जात नाही. काहीवेळा तर पांढरे केस लाजेखातर आपण लोकांपासून लपवतो किंवा डाय करून रंगवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच कमी लोक असतील जे पांढरे केस अभिमानाने मिरवत असतील. सध्या दिवसागणिक रोज नवीन काहीतरी ट्रेंड बदलत जातो. बॉलिवूडमधील ७० च्या दशकांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांनी आपले वाढते वय व पांढरे केस जगापासून न लपवता, तेच अभिमानाने मिरवले आहेत.
७० च्या दशकांत बॉलिवूड गाजवणाऱ्या झीनत अमान यांना कोण ओळखत नाही. झीनत अमान यांनी त्यांच्या काळांत अनेक बॉलिवूड हिट्स दिले होते. त्या ७० च्या दशकांत जेवढ्या लोकप्रिय होत्या तेवढ्याच आता आहेत. बॉलिवूडचा चेहरामोहरा बदलण्यात झीनत अमान यांचा मोठा वाटा आहे. बॉलिवूड विश्वात नवे ट्रेंड आणणारी बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांचे नाव घेतले जाते. पुरुषप्रधान चित्रपटांच्या काळात झीनत अमान यांनी चित्रपटातील अभिनेत्रीचं महत्त्व अधोरेखित केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी झीनत अमान मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होत्या. आपल्या अभिनयासोबतच त्यांनी फॅशन आणि हॉट लुक्सनेही चाहत्यांची मन जिंकली. त्यांच्या ग्लॅमरस लुकने त्या काळात पाश्चात्य कपड्यांमध्ये अनेक ट्रेंड सेट केले. सध्या त्या इंस्टग्रामवर देखील त्यांच्या एका खास पोस्टने अतिशय लोकप्रिय होत आहेत(Zeenat Aman shares how her grey hair has become a style statement: 'I'm all the happier for it').
नेमकी काय आहे ती पोस्ट...
सध्या इंस्टाग्रामवर झीनत अमान यांच्या मुलाने तुपाचा काढलेले फोटो खूपच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये झीनत अमान यांनी आपले केस न रंगवता ते तसेच पांढरे ठेवणे पसंत केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, एक स्त्री म्हणून आम्हाला नेहमी सांगितले जाते की तुमचे सामाजिक मूल्य हे तरुण वयात आणि शारीरिक सौंदर्यात आहे. सर्वसाधारणपणे वय वाढते म्हणून पुरुषांचे वाढते वय मान्य केले जाते, पण स्त्रियांच्या वाढत्या वयाबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.
क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?
चेहऱ्यावर करा बटाटा आइस क्यूबची जादू, चेहऱ्यावर येईल कधीही न आलेली सुंदर चमक...
त्यांनी पुढे लिहिले की, 'सुरुवातीला मला माझे केस रंगवायचे नव्हते, पण लोकांनी मला ते रंगवण्याचा सल्ला दिला. माझ्या काही शुभचिंतकांनी तर असेही म्हटले की याचा माझ्या करियरवर विपरित परिणाम होईल. परंतु या गोष्टीवर मी थोडा विचार केला आणि मला जाणवले की मला आपल्या समाजातील तरुणांच्या आदर्शांना बळकटी देण्याची खरोखर गरज आहे. पुढे त्या म्हणतात, तरुण असणे ही छानच गोष्ट आहे, परंतु म्हातारे होणे हे देखील तितकेच अद्भुत आहे.
प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा सांगतात, खास घरगुती फेसपॅक - चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू...
पिंपल्स, फोडांचे डाग जाता जात नाहीत? हा घ्या ‘खास’ पाण्याचा सोपा फॉर्म्युला, चेहरा दिसेल नितळ...
अधिकाधिक पांढरे केस असणाऱ्या महिलांना बघून मग त्या कोणत्याही वयात असो, त्यांना अशा परिस्थिती पाहून मला खूपच आनंद होतो. कारण त्या या वयातही सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन आव्हान पेलत असतात. झीनत अमान शेवटी म्हणते की, माझ्या राखाडी केसांना इतरांसाठी स्टाईल स्टेटमेंट बनवण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता तर यातून मला जास्त आनंद मिळतो. ७० च्या दशकात ज्यांची तुफान क्रेझ असणाऱ्या झीनत अमान व त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत, शिवाय अशाही अनेक अभिनेत्री आहेत ज्या झीनत यांना प्रेरणास्थान मानतात. याचबरोबर त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करताना अनेकांचे शब्द अपुरे पडतात.