Lokmat Sakhi >Celebrity Corner > श्रीदेवीची लेक म्हणते, ' त्यात ' लपवावे, लाज वाटावी असे काय आहे? म्हणा काय हवे ते..

श्रीदेवीची लेक म्हणते, ' त्यात ' लपवावे, लाज वाटावी असे काय आहे? म्हणा काय हवे ते..

khushi kapoor talked about her beauty surgeries : मी करून घेतल्या बऱ्याच सर्जरीज खुशी कपूर सांगते....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2025 19:09 IST2025-01-31T19:05:37+5:302025-01-31T19:09:25+5:30

khushi kapoor talked about her beauty surgeries : मी करून घेतल्या बऱ्याच सर्जरीज खुशी कपूर सांगते....

khushi kapoor talked about her beauty surgeries | श्रीदेवीची लेक म्हणते, ' त्यात ' लपवावे, लाज वाटावी असे काय आहे? म्हणा काय हवे ते..

श्रीदेवीची लेक म्हणते, ' त्यात ' लपवावे, लाज वाटावी असे काय आहे? म्हणा काय हवे ते..

बॉलिवूडच्या अभिनेत्रींना प्लास्टिक असं संबोधलं जातं. त्याचे कारणही तसेच आहे. अशा हातावर मोजण्याएवढ्याच जणी असतील, ज्यांनी कोणतीही ब्यूटी ट्रिटमेंट करून घेतलेली नाही. (khushi kapoor talked about her beauty surgeries) तसं बघितलं तर जवळपास सगळ्यांनीच कोणती ना कोणती सर्जरी करून घेतली आहे. आपल्याला अचानक ओव्हर वेट वरून झीरो फिगर वर आलेल्यांचे फार कौतुक वाटते. पण त्यांनी ते वजनही ऑपरेशन करून घेऊन कमी केलं असतं. नाकाचा आकार कमी करण्यापासून स्तनांचा आकार वाढवून घेण्यापर्यंत सर्व प्रकारच्या सर्जरी केल्या जातात. या सगळ्या गोष्टींमुळे बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना प्लास्टिक म्हटले जाते.(khushi kapoor talked about her beauty surgeries)

अर्थात प्रत्येकाला आपल्या शरीरात जे बदल करून घ्यायचे आहेत, त्यांनी ते करून घेण्यात काहीच चूक नाही. तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या अभिनेत्री त्यांनी करून घेतलेल्या ट्रिटमेंट्सबद्दल कधीच सत्य बोलताना दिसत नाहीत. कायम अशा सर्जरीज करू नयेत, वगैरे बोलतानाच दिसतात. मात्र एका अभिनेत्रीने मोकळेपणाने मान्य केले की, तिने कॉसमेटिक्स सर्जरी करून घेतली आहे. ती म्हणते, "त्यात लपण्यासारखे काहीच नाही. कॉस्मेटिक्स सर्जरी बॉलिवूडमध्ये अगदीच कॉमन आहे."

ही अभिनेत्री आहे खुशी कपूर. श्रीदेवीची मुलगी आणि जान्हवी कपूरची धाकटी बहीण. खुशी म्हणाली, "मी लहानपणी अटेंशन सिकर होते. सगळ्यांनी मलाच बघावं असं मला वाटायचं. मी आणखी सुंदर दिसावं, अशी माझी इच्छा होती. मी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करून घेतली आहे. आणि त्यात लावण्यासारखं मला तरी काहीच वाटत नाही." सर्जरीजबद्दल खुशी एवढं मोकळेपणाने कोणतीही अभिनेत्री बोलताना दिसत नाही. ज्यांना या सर्जरींची गरज आहे. ज्यांना ते परवडतं, पटतं ते अशा ट्रिटमेंट करून घेतात. "पण मग नॅचरल ब्यूटी आहे" असे खोटे सांगताना दिसतात. पण खुशीने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकतानाच स्वत:बद्दल मोठा खुलासा केला आहे. खुशीच्या या वक्तव्याबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही तिलाही प्लास्टिक म्हणत आहेत. तर काही तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत.

Web Title: khushi kapoor talked about her beauty surgeries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.