Lokmat Sakhi >Celebrity Corner > राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमकथेची दर्दभरी गोष्ट, लग्न होऊ शकलं नाही कारण..

राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमकथेची दर्दभरी गोष्ट, लग्न होऊ शकलं नाही कारण..

love story of Raj Kapoor and Nargis : पहिल्या भेटीतच प्रेमात पडले, पण नशिबात एकत्र येणं नव्हतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2025 16:08 IST2025-02-23T16:07:16+5:302025-02-23T16:08:41+5:30

love story of Raj Kapoor and Nargis : पहिल्या भेटीतच प्रेमात पडले, पण नशिबात एकत्र येणं नव्हतं.

love story of Raj Kapoor and Nargis | राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमकथेची दर्दभरी गोष्ट, लग्न होऊ शकलं नाही कारण..

राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमकथेची दर्दभरी गोष्ट, लग्न होऊ शकलं नाही कारण..

बॉलिवूडमध्ये अनेक असे किस्से घडत असतात. जे ऐकणाऱ्याला चकित करून सोडतात. बॉलिवूडवर एकेकाळी कपूरांचे राज्य होते. ( love story of Raj Kapoor and Nargis)आत्ता देखील आहेच. पण तेव्हाची गोष्ट काही वेगळीच होती. राज कपूर यांच्या मागे मुली फार वेड्या होत्या. राज कपूरांचे फॅन फॉलोविंग प्रचंड प्रमाणात होते. इतके की एक त्यांच्या एवढीच गाजलेली अभिनेत्री राज कपूरांवर फिदा झाली. एवढी प्रेमात पडली की,  ( love story of Raj Kapoor and Nargis)त्यांच्यासाठी काहीही करायला तयार झाली होती. 

एव्हरग्रीन गाणी देणार्‍या ५० ते ६० च्या दशकाने, एव्हरग्रीन प्रेम कहाणीसुद्धा दिली होती. काही गुगल स्टोरी आणि हरजिंदगी पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या माहितीचा संदर्भ घेतला तर असे समजते की,  'अंदाज' नावाचा एक सिनेमा आला होता. ( love story of Raj Kapoor and Nargis)त्यात राज कपूर होते. त्यांची सह नायिका नर्गिस होत्या. नर्गिस त्यांच्या सौंदर्यासाठी प्रचंड लोकप्रिय होत्या. अनेक नावाजलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे नर्गिस. अंदाज सिनेमाच्या सेटवर त्या दोघांमध्ये प्रेमाचे नाते तयार व्हायला लागले होते. नर्गिस यांच्या सौंदर्यावर भले-भले फिदा झाले होते. राज कपूरही त्या पासून वाचले नाहीत. पण राज कपूर जेवढे नर्गिसवर फिदा होते, त्याच्या दुप्पट नर्गिस त्यांच्यावर फिदा झाल्या. 

राज कपूरांचं लग्न झालेलं होतं. वयाच्या २२साव्या वर्षीच त्यांचं अरेंज मॅरेज झालं होतं. १९४२ मध्ये कृष्णा मल्होत्रा नावाच्या महिलेशी त्यांचा विवाह झाला. पण नर्गिसला पाहिलं आणि त्यांना बघताच क्षणी प्रेम झालं. असे वृत्तांमधून समजले होते. त्या दोघांमध्ये जवळपास १६ वर्ष प्रेमसंबंध होते. लग्न बाह्य संबंधात राज कपूर आणि नर्गिस होते खरे पण नर्गिसना तेवढे पूरेसे नव्हते. त्यांनी राज कापूरांना लग्नासाठी विचारले. पण राज कपूर म्हणाले की, मी कृष्णाला सोडू इच्छित नाही. हे ऐकल्यानंतर नर्गिस राज कपूरांची दूसरी पत्नी म्हणून राहण्यासाठीही तयार झाल्या होत्या. मोठमोठ्या वकिलांचे सल्ले त्यांनी घेतले. पण राज कपूर तयार होत नव्हते. त्यामुळे  नर्गिस यांनी त्यांची अडचण थेट गृहमंत्र्यांना सांगितली. मोरारजी देसाई तेव्हा गृहमंत्री होते. त्यांना नर्गिस यांनी राज कपूरांची दूसरी पत्नी होण्याची इच्छा सांगितली होती. 

या सगळ्यानंतरही राज कपूर लग्नाला तयार न झाल्याने मग नर्गिस यांनी त्यांना विसरण्याचा निर्णय घेतला. सुनील दत्त यांच्याशी लग्न केले. नरगिस यांच्या लग्नाची बातमी ऐकून राज कपूर यांनी स्वत:ला सिगारेटचा चटका लावून घेतला होता.       
 

Web Title: love story of Raj Kapoor and Nargis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.