Lokmat Sakhi >Celebrity Corner > पोझ, मेकअप, शॉपिंग, रिपीट..करिश्मा आणि करिनाचा खास मंत्र, धमाल भटकंती

पोझ, मेकअप, शॉपिंग, रिपीट..करिश्मा आणि करिनाचा खास मंत्र, धमाल भटकंती

Karishma Kapoor Kareena Kapoor करिना आणि करिश्मा कपूर या दोन्ही बहिणींचे आपसात भारी प्रेम आहे. त्या कायम एकत्र असतात आणि ग्लॅमरसही दिसतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 02:09 PM2022-11-04T14:09:09+5:302022-11-04T14:11:05+5:30

Karishma Kapoor Kareena Kapoor करिना आणि करिश्मा कपूर या दोन्ही बहिणींचे आपसात भारी प्रेम आहे. त्या कायम एकत्र असतात आणि ग्लॅमरसही दिसतात

Pose, makeup, shopping, repeat..Karisma and Kareena Kapoor's special holiday mantra, Dhamaal Bhaktanti | पोझ, मेकअप, शॉपिंग, रिपीट..करिश्मा आणि करिनाचा खास मंत्र, धमाल भटकंती

पोझ, मेकअप, शॉपिंग, रिपीट..करिश्मा आणि करिनाचा खास मंत्र, धमाल भटकंती

बॉलिवूडच्या ग्लॅमरस सिस्टर्स करिश्मा कपूर आणि करीना कपूर आपल्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखले जातात. कोणतेही सण, पार्टी अथवा शॉपिंग असो हे दोघीही नेहमी एकत्र दिसतात. या दोघी बहिणींमध्ये कमालीचे बाँडींग आहे. त्यांचे फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच त्या दोघींचे लंडनच्या गल्ल्यांमध्ये शॉपिंग आणि भटकंती करत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.  काळ्या कपड्यातले हे फोटो भारी कातील आहेत.

करीनाने काही फोटो शेअर केले होते, ज्यात तिच्यासह तिचा छोटा मुलगा जेह दिसत होता. आणि आता नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये ती करिश्मा कपूरसह दिसत आहे. इंस्टाग्रामवर बेबोने तिची बहीण आणि अभिनेत्री करिश्मा कपूरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. दोन्ही बहिणी लंडनच्या रस्त्यावर खूप मस्ती करताना दिसत आहेत. दोघांनीही ब्लॅक आऊटफिट परिधान केले आहे.

फोटो पोस्ट करत करीनाने मजेशीर कॅप्शनदेखील दिले आहे. त्यात तिने लिहिलं, "दोघी बहिणी एकत्र असताना काय करतात, पोझ, मेकअप, शॉपिंग, रिपीट..." सध्या हे फोटोज् सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका फोटोमध्ये करीना आणि करिश्मा एकाच खोलीत आरशासमोर मेकअप करताना दिसत आहेत.

करीना आणि करिश्मा या दोघांना शॉपिंग करायला खूप आवडते. त्यांच्या पोस्टमधूनच अनेकवेळा दिसून येते. लंडनमध्ये दोन्ही बहिणींनी भरपूर शॉपिंग केली आणि लंडनच्या वातावरणाचा आनंद लुटला. या फोटोंमध्ये दोन्ही अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहेत. करीना कपूरची बॉलीवूडमध्ये एक जबरदस्त गर्ल गॅंग आहे ज्यात तिची बहीण करिश्मा कपूर देखील आहे. लंच डेटपासून ते सणासुदीपर्यंत करिश्मा करिनासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसून येते.

Web Title: Pose, makeup, shopping, repeat..Karisma and Kareena Kapoor's special holiday mantra, Dhamaal Bhaktanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.