Join us  

रिंकू राजगुरू इतकी सुंदर कशी दिसते? रिंकूच सांगतेय तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 7:52 PM

रिंकू (Rinku Rajguru) म्हणते, त्वचा नितळ, सतेज ठेवण्यासाठी दिव्य करावं लागत नाही की भारंभार ब्यूटी प्रोडक्टसही वापरावी लागत नाही. आपल्या दीनचर्येत सोप्या नियमांचा (Rinku Rajguru beauty secret) समावेश करुन सुंदर दिसता येतं .

ठळक मुद्देरिंकू म्हणते आपलं खाणं पिणं, झोपणं या सर्वांचा परिणाम त्वचेवर होतो. फ्रेश दिसण्यासाठी आनंदी राहाणं महत्त्वाचं असं रिंकू सांगते. 

सैराटची आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru)  चेहेऱ्यावरचं तेज दिवसेंदिवस वाढतंच आहे. रिंकू चेहेऱ्याला असं काय लावतेय ज्यामुळे ती इतकी फ्रेश दिसते याबद्दलचं सीक्रेट (Rinku Rajguru beauty secret )  जाणून घेण्याची इच्छा तरुणींसोबतच प्रौढ स्त्रियांनाही आहे. रिंकू राजगुरुनं 'लोकमत सखी डाॅट काॅमला' (lokmat sakhi.com) दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या ग्लोइंग स्कीनचं सीक्रेट सांगितलं आहे. रिंकू म्हणते, त्वचा नितळ, सतेज ठेवण्यासाठी दिव्य करावं लागत नाही की भारंभार ब्यूटी प्रोडक्टसही  वापरावी लागत नाही. आपल्या दीनचर्येत सोप्या नियमांचा समावेश करुन सुंदर दिसता येतं .  

Image: Google

रिंकूचे सौंदर्य नियम काय?

1. रिंकू सांगते त्वचा नितळ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी ती दिवसातून 5-6 वेळा चेहेरा थंडं पाण्यानं धुते. चेहेरा धुतल्यानंतर चेहेऱ्याला माॅश्चरायझर लावते

2. रिंकू म्हणते आपण काय खातो पितो त्याचा, आपल्या डाएटचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. डाएट योग्य ठेवल्यास त्वचा चांगली राहाते. दिवसभरात भरपूर पाणी पिल्यास त्वचा ओलसर राहाते. त्वचेला  नैसर्गिक माॅश्चरायझर मिळतं. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.  त्वचा फ्रेश आणि चेहेरा आनंदी दिसण्यासाठी पुरेशी शांत झोप झालेली असणं आवश्यक असल्याचं रिंकू सांगते. 

Image: Google

3. सतत चित्रीकरणात व्यस्त असलेल्या रिंकूला मेकअप करावाच लागतो. पण रिंकू सांगते की रात्री झोपताना चेहेऱ्यावरचा मेकअप काढल्याशिवाय ती झोपत नाही. ती म्हणते चेहेऱ्यावरचा मेकअप काढला तरच त्वचा मोकळा श्वास घेवू शकेल. त्वचेला मोकळा श्वास घेता आला की त्वचा फ्रेश दिसते. 

4. चेहेरा फ्रेश आणि आनंदी दिसण्यासाठी आनंदी असणंही महत्वाचं असल्याचं रिंकू सांगते. मनावर कुठल्याच गोष्टीचा ताण घेतला नाही तर मन आनंदी राहातं आणि हा आनंद चेहेऱ्यावरही दिसतो. रिंकू आनंदी राहाण्यासाठी सतत गाणी ऐकते.

Image: Google

5. रिंकू म्हणते की ती पहाटे लवकर ऊठून साडे पाच वाचता बाहेर फिरायला जाते. बाहेरच्या स्वच्छ मोकळ्या हवेचा परिणाम शरीर मनासोबतच त्वचेवरही होतो. 

टॅग्स :रिंकू राजगुरूब्यूटी टिप्सत्वचेची काळजी