आपल्या आयुष्यात आपण कपड्यांना फार महत्त्व देतो. अर्थाच द्यायलाच हवं कारण ते गरजेचेच आहेत. पण आपण किती महागडे कपडे वापरतो, यावरून आपलं व्यक्तिमत्व ठरत नाही. (see how Sushmita Sen designed the dress for Miss Universe ) बरेचदा माणसाच्या कपड्यांच्या किंमतीवरून आपण त्या माणसाबद्दल आपलं मत तयार करतो. मोठमोठ्या ब्रॅण्डचे कपडे घालण्यात अनेकांना मोठेपणा वाटतो. आवड म्हणून असे कपडे वापरण्यात काहीच हरकत नाही. (see how Sushmita Sen designed the dress for Miss Universe )पण जर त्या कपड्यांपेक्षा त्यांच्या किंमतीला जास्त महत्त्व दिले तर, त्याला काही अर्थ नाही. मिस युनिव्हर्स ब्यूटी पेजेंट १९९४ची विजेता सुष्मिता सेन म्हणते, "कपड्यांपेक्षा व्यक्तिमत्व महत्त्वाचं. स्वभाव महत्त्वाचा." सुष्मिता तिच्या बोल्ड पर्सनॅलिटीसाठी ओळखली जाते. संवाद कौशल्याचे नमुने ती सतत देत असते. तिच्या मुलाखती तरूण मुलींसाठी मार्गदर्शनपर आहेत. अशाच एका मुलाखतीत तिने तिच्या विनिंग ड्रेसबद्दल सांगितलं होतं.
सुष्मिताने तिचा मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या वेळचा किस्सा सांगितला. सुष्मिता एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्माला आली. (see how Sushmita Sen designed the dress for Miss Universe )स्पर्धेसाठी आईच्या सांगण्यावरून तिने नाव तर नोंदवलं, पण कपड्यांसाठी पैसे कोण देणार? पाच ड्रेस त्या स्पर्धेसाठी हवे होते. तेव्हा सुष्मिताची आई तिला म्हणाली, "लोकं व परीक्षक तुला बघणार आहेत, कपड्यांच काय घेऊन बसलीस." मायलेकी सरोजीनी मार्केटमध्ये जाऊन कापड घेऊन आल्या. घराजवळच्या शिंप्याकडे ड्रेस शिवायला दिला. हातात घालायला काळे ग्लोव्ज नव्हते. पाय मोज्यांपासून घरीच तयार केले. कसला डिझायनर आणि कसलं काय. तिच्या आईने नंतर त्या ड्रेसवर स्वत:हूनच फुल तयार करून ओवले. सुष्मिता म्हणते, "पैशांपेक्षा महत्वाकांक्षा गरजेची असते. मला त्या ड्रेसबद्दल अभिमान आहे." त्याला मोठ्या डिझायनरचं नाव नसलं, तरी तोच माझा विनिंग ड्रेस ठरला.
एका सामान्य घरातली मुलगी सरोजीनीमधून घेतलेल्या कापडाचा ड्रेस वापरून मिस युनिव्हर्स बनली. कारण ड्रेस सामान्य असला, तरी तिच्या अपेक्षा आणि कष्ट सामान्य नव्हते. तिच्या उत्तरांनी परीक्षकांचे मन जिंकले. सुष्मिताच्या या किस्स्यातून शिकण्यासारखं बरंच काही आहे. कपड्यांवर वायफळ खर्च करण्यापेक्षा पर्सनॅलिटी सुधारण्यावर आपण लक्ष द्यायला हवे.