Join us

एकेकाळची बॉलिवूडची सेक्स सिम्बॉल पण प्रेमात कायम अपयशी, शेवटी वाट्याला आला एकाकी मृत्यू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2025 18:55 IST

sex symbol of Bollywood still always unsuccessful in love : जिच्यासाठी लाखो तरुण दिवाने, तिच्या वाट्याला मात्र खरं प्रेम आलंच नाही, स्क्रिझोफेनियानं छळलं आणि..

१९७० ते १९८० च्या कालावधीत बॉलिवूडची 'सेक्स सिम्बॉल' मानली जाणारी नटी म्हणजे 'परवीन बाबी'.(sex symbol of Bollywood still always unsuccessful in love) फिल्म इंडस्ट्रीमधील अनेकांना वेड लावणारी परवीन बाबी अचानक गायब  कुठे झाली?  हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. तिने अमिताभ बच्चन बरोबर एक सो एक हिट सिनेमे दिले होते. अचानक एकाएकी क्षेत्रातून गायब होणार्‍या कलाकारांची बॉलिवूडमध्ये कमी नाही. बातम्यांनुसार, परवीन बाबीचे आयुष्य इंडस्ट्रीत आल्यावर फारच खडतर झाले.  (sex symbol of Bollywood still always unsuccessful in love)

१९७१ मध्ये तीने मॉडेलिंग सुरू केले. लगेचच १९७३ ला 'चरित्र' या चित्रपटात तिला काम करायची संधी मिळाली. एका वर एक हिट चित्रपट देत असतानाच, तिचे नाव 'डॅनी' या नटाशी जोडले गेले. त्यानंतर काही वर्षातच कबीर बेदी व परवीन बाबी यांच्या नात्याची चर्चा गाजली. तरी शेवट पर्यंत ती अविवाहितच राहिली. 

महेश भट या दिग्दर्शकाशी परवीन बीबी यांचे संबंध होते. त्या काळचे अनेक रिपोर्ट सांगतात की, परवीनच्या सौंदर्यावर महेश भट भाळला होता. मात्र परवीन बाबी त्याच्या प्रेमात पार वेडी झाली होती. ते दोघे एकत्र असताना घडलेला एक किस्सा म्हणजे, महेश भटच्या मागे परवीन बाबी नग्न अवस्थेत धावताना दिसली होती. असे अनेक किस्से घडल्यानंतर कळले की, परवीनची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तिला 'स्किझोफ्रेनिया' हा आजार असल्याची बातमी कळली . 

 

स्किझोफ्रेनिया या आजारात माणसाला भास होतात. नसलेल्या गोष्टी दिसायला लागतात. या आजाराबद्दल कळल्यानंतर महेश भट परविन बाबीला सोडून गेल्याची बातमी आली होती. ती शेवटी एकटीच पडली होती. २० जानेवारी २००५ ला तिचा मृत्यू झाला. तीन दिवसानंतर बिल्डींग सेक्रेटरीला संशय आल्यानंतर मृत्यूची बातमी मिळाली. मल्टी ऑर्गन फेल्यूअरमुळे मृत्यू झाल्याचे कळले. (sex symbol of Bollywood still always unsuccessful in love)

सोबर, सोज्वळ अभिनेत्रींच्या जमान्यात परवीन बाबीनी बोल्ड व हॉट व्यक्तीमत्त्वाने स्वत:ची वेगळी ओळख तयार केली होती. वयाच्या ५०व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला. भारताने एक सुंदर चेहरा गमावला. आजही त्यांचा मृत्यू नक्की  मल्टी ऑर्गन फेल्यूअरमुळेच झाला का? का अजून काही गुपित आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडत असातत. 

टॅग्स :परवीन बाबीमहेश भटबॉलिवूडमृत्यू