बॉलीवूड सेलिब्रिटींचा नेमका डाएट काय असतो, ते कोणत्या ब्यूटी आणि फिटनेस टिप्स (diet tips by Shilpa Shetty) फॉलो करतात, त्यांच्या तरुण त्वचेचं सिक्रेट काय, असे अनेक प्रश्न सेलिब्रिटींच्या चाहत्यांना नेहमीच पडतात. आणि त्यांची उत्तर शोधण्यासाठी अनेकांची धडपड चालू असते. आता शिल्पा शेट्टी म्हणजे बॉलीवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक नाव. फिटनेस आणि परफेक्ट फिगर मिळविण्यासाठी ती नियमितपणे योगा करते, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण तिचं नेमकं डाएट (Shilpa Shetty's viral diet plan) काय, हा प्रश्न देखील आपल्याला अनेकदा पडतोच. याच प्रश्नाचं उत्तर शिल्पाने एक व्हिडिओ शेअर करून दिलं आहे.
हा एक अतिशय मजेशीर व्हिडिओ असून यात शिल्पा दिवसभरातून किती आणि काय खाते, याविषयी तिच्या स्टाफने घेतलेला हा व्हिडिओ आहे. यात सगळ्यात सुरुवातीला शिल्पा फळं खाताना दिसते आहे.
६ प्रकारच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरा बेकिंग सोडा, कमी मेहनतीत वस्तू होतील चकाचक
त्यानंतर चहा पिताना दिसते आहे. त्यानंतर काही वेळाने ती फळांचा रस पिते.. पुन्हा काही वेळ गेल्यानंतर ती पुन्हा वेगवेगळी फळं खाते आहे. तिच्या फळांचा जो डबा आहे, त्याला वेगवेगळे कप्पे असून त्यात वेगवेगळी फळं ठेवलेली आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा काही वेळाने ती मुरमुरे आणि त्यात काही भाज्या घालून खाताना दिसते आहे.
तिला एवढं वारंवार खाताना पाहून हे तुझं दिवसांतलं दहावं खाणं आहे का, असा प्रश्नही तिच्या स्टाफने विचारला आहे. त्यावर आपण हे फक्त स्नॅक्स खात आहोत, असं ती सांगते आहे. आता दिवसांतून एवढ्या वेळा खाते, तरी एवढी बारीक कशी, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
फेशियल हेअर काढून टाकण्यासाठी भन्नाट घरगुती उपाय, चेहरा होईल स्वच्छ- चमकदार आणि दिसेल फ्रेश
तर त्याचं उत्तर असं की तिच्या या व्हिडिओवरून एवढंच दिसून येतं, की नाश्ता, लंच आणि डिनर असं ३ वेळा भरपेट न खाता शिल्पा त्यावेळी कमी खाते. आणि दिवसभर अशा पद्धतीने फळं, फळांचा रस, मुरमुरे असं थोडं- थोडं खात राहते. बघा शिल्पाचा हा डाएट प्लॅन आवडला असेल, तर तुम्हीही करून बघा.