बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच तिच्या फिटनेसबाबत आणि ड्रेसिंग सेन्सबाबत चर्चेत असते. हॉट आणि स्टनिंग लूकमध्ये श्रद्धा जेवढी सुंदर दिसते तेवढेच तिचे सौंदर्य वेस्टर्न लूकमध्ये बहरून येते. श्रद्धाने नुकतेच एक जबरदस्त फोटोशूट केले आहे. यामध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली असून त्यामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. ट्रॅडिशन विथ फॅशन असा लूक श्रद्धाने केला असून कोणत्याही मॉडर्न मुलीला श्रद्धाचा हा लूक खूपच आवडणारा आहे.
श्रद्धाने नुकताच तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये श्रद्धाने लाल रंगाची प्लेन साडी आणि लाल रंगाचे ब्लाऊज असे ड्रेसिंग केले आहे. श्रद्धाची साडी सिल्कची असून या साडीचे खरे सौंदर्य खुलविले आहे ते तिच्या ब्लाऊजने. या ड्रेसिंगसोबत श्रद्धाने घातलेले दागिणेही अतिशय ट्रेण्डी आहेत. श्रद्धाच्या ड्रेसिंग आणि ज्वेलरी सेन्सबद्दल नेहमीच चर्चा होते. यावेळीही तिने असाच जबरदस्त लूक केला असून नवरात्रीसाठी तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या स्टाईलचा विचार करू शकता.
कसे आहे श्रद्धाचे ब्लाऊज?
अनेकदा बॉलीवूड अभिनेत्री किंवा मॉडेल्स जे कपडे घालतात, ते कपडे सर्वसामान्य मुली कोणत्याही कार्यक्रमात घालू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची फॅशन आपल्याला कितीही आवडली तरी ती कॅरी करणे अवघड असते. पण श्रद्धाने केलेला लूक कोणत्याही ट्रॅडिशनल कार्यक्रमात किंवा एखाद्या पार्टीसाठी तयार होताना आपण करू शकतो, असा आहे. यामध्ये श्रद्धाने स्लिव्हलेस ब्लॉऊज घातले असून ते साधारण कंबरेएवढे लांब आहे. तसेही हल्ली उंचीने जास्त असणाऱ्या ब्लाऊजची फॅशन इन आहे. फक्त ब्लाऊजचा गळा थोडा डिप केला की तुम्हीही दिसू शकाल एकदम स्टनिंग. या ब्लाऊजवर मिररवर्क केले असून प्लेन साडीचा लूक पुर्णपणे बदलून टाकण्याचे काम या ब्लाऊजने केले आहे.
मिररवर्कची जादू
मिररवर्क सध्या बरेच ट्रेण्डींग आहे. नवरात्रीला तर मिररवर्कची फॅशन तुफान चालते. प्लेन ड्रेस आणि मिररवर्क केलेले जॅकेट किंवा मिररवर्क असणारी चमकदार रंगाची ओढणी अशी स्टाईल प्रचंड हिट आहे. ज्यांना नवरात्रात प्रॉपर दांडिया लूक करणं जमत नाही, ते असा मिररवर्क असणाऱ्या कपड्यांची स्टाईल करतात आणि भाव खाऊन जातात. त्यामुळे तुमच्याकडेही एखादी अशी शिफॉन किंवा सिल्कची प्लेन साडी असेल तर तुम्ही हा हटके प्रकार नक्कीच ट्राय करू शकता. किती बोअर आहे, असे म्हणून अडगळीत टाकून दिलेली एखादी साडीही या निमित्ताने बाहेर येऊ शकते आणि मिरर वर्क ब्लाऊजसोबत मॅच करून तिचे सौंदर्य खुलू शकते. मिररवर्कचे काम अतिशय सुबक असते आणि ते बहुतांशवेळा हाताने केले जाते. त्यामुळे उच्च दर्जाचे मिररवर्कचे कपडे निश्चितच महाग मिळतात, पण त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा दर्जा बघताक्षणीच डोळ्यात भरणारा असतो.