Join us

मलायका अरोराकडे आहेत खोलीभर कपडे आणि चपला- बूट.. हे कलेक्शन की दुकान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 18:42 IST

Trending story: बडे लोग बडी बाते... असं म्हणतात ते काही उगाच नाही... आणि स्पेशली ते जर सेलिब्रिटींच्या बाबतीत असेल तर मग विचारायचीच सोय नाही... आपल्या मलायका अरोराचंही तेच आहे.. बघा जरा तिचे फोटो !!

ठळक मुद्देहा फोटो पाहून मलायका चपला- बुटांच्या दुकानात तर बसलेली नाही ना, हा प्रश्न कुणालाही पडू शकतो..

मलायका अरोरा.. (Malaika Arora) हे बॉलीवूडचं एक मोठं नाव.. तिची स्टाईल, तिच्या अदा आणि तिचं ग्लॅमर यांची नेहमीच चर्चा असते.. मलायका आणि तिच्या संबंधीची किंवा तिने केलेली प्रत्येक गोष्ट ही सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरते.. नेहमीच ही चर्चा चांगलीच होते, असंही काही नाही.. अनेक लहान- सहान गोष्टींवरून तिला जबरदस्त ट्रोलही केलं जातंच.. सध्या अशीच एक मलायकाची गोष्ट गाजते आहे..

 

त्याचं झालं असं की कॉलमनिस्ट नम्रता झकारिया यांनी मलायकाचा एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये असं दिसतं की मलायका एका मोठ्या खोलीत बसलेली आहे. तिच्या मागे उजव्या बाजूला  चपला- बुटांची मोठी रांग लागलेली आहे आणि डाव्या बाजूच्या पुर्ण भिंतीला एक कपाट आहे... हा फोटो पाहून मलायका चपला- बुटांच्या (Malaika Arora's collection) दुकानात तर बसलेली नाही ना, हा प्रश्न कुणालाही पडू शकतो.. पण इथेच तर खरी गंमत आहे. 

 

मलायका बसलेली आहे, ते ठिकाण म्हणजे चपला- बुटांचं दुकान नाही, तर मलायकाच्या घरची चपला बुटांची खाेली आहे.. याविषयी सांगताना नम्रता झकारिया असं म्हणत आहेत की एखाद्या सर्वसामान्य घरात असणाऱ्या बेडरूमपेक्षाही मलायकाची ही खोली मोठी आहे.. या खोलीच्या दोन भितींना भव्य कपाटं असून एका कपाटात मलायकाच्या चपला- बुटांचं तर दुसऱ्या कपाटात मलायकाच्या कपड्यांचं कलेक्शन आहे.. कोणत्याही ब्रॅण्डच्या चपला- बुट कलेक्शनला लाजवेल असं आणि एवढं भव्य कलेक्शन तर एकट्या मलायकाच्याच घरात आहे, हे या फोटोतून अगदी स्पष्ट दिसून येतं... 

 

म्हणूनच तर नम्रताच्या या फोटोंवर अनेक जणांच्या कमेंट आल्या असून बहुतेक जणांनी हे चपला- बुटांचं दुकान तर नाही ना..., मलायका चपला- बुटांच्या शोरूम मध्ये तर बसलेली नाही ना, अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत...  मलायकाने खरोखरंच खूपच शिस्तशीर पद्धतीने तिची पादत्राने मांडून ठेवली आहेत. नम्रता यांनी या फोटोत मलायकालाही टॅग केले असून मलायकाने या फोटोला लाईक केले आहे. 

 

टॅग्स :सेलिब्रिटीफॅशनमलायका अरोरा