Join us  

ऐश्वर्या रायचा आज वाढदिवस, वयाची पन्नाशी जवळ आली तरी विलक्षण सुंदर दिसण्याचं ब्यूटी सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2022 1:17 PM

Aishwarya Rai Bachhan ऐश्वर्या राय मुळात सुंदर, ते विलक्षण सौंदर्य जपण्यासाठी ती काय काय करते?

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय. विलक्षण सौंदर्यवती. १ नोव्हेंबर हा तिचा वाढदिवस. आज ती ४९वा वाढदिवस साजरा करतेय. पन्नाशी जवळ आली तरी ऐश्वर्या तितकीच देखणी आणि आकर्षक दिसते. आजही तिला पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके हे वाढल्याशिवाय राहत नाही. तिचे ब्यूटी सिक्रेट काय आहे हे समजून घेण्याचा अनेकदा मोह पडतोच. मात्र तिची हेल्दी लाइफस्टाइल, डाएट, व्यायाम याला त्याचे श्रेय जातेच, सोबत ती काही घरेलू उपायही करते.

घरचं जेवण, उत्तम जेवण

ऐश्वर्या राय नेहमी घरी बनवलेले पदार्थ खाण्यास प्राधान्य देते. बाहेरील पॅक्डफूड किंवा तळेले पदार्थ खाण्यास टाळते. सिगारेट ओढणे,  दारू यासह शितपेयं, बाहेरचं खाणंही टाळते. घरातील पदार्थ खाण्यास तिची पसंती आहे.

फळं, भाज्या आणि पाणी भरपूर प्या

हेल्थी लाईफस्टाईल मध्ये जगायचे असेल तर, आपल्या आहारात  फळ, भाज्यांचा समावेश करा. फळ आणि भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन, विटामिन आणि न्युट्रिशन मिळते जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत. यासह पाणी देखील तितकेच भरपूर पिणे महत्वाचे आहे. पाणी भरपूर पिल्याने आपला चेहरा ग्लो करतो आणि तजेलदार दिसतो. वय जरी वाढत गेलं तरी देखील चेहरा हा चिरतरुण दिसतो.

मेकअपपासून राहते लांब

ऐश्वर्या राय जरी अनेक प्रोडक्ट्सचे प्रमोशन आणि जाहिराती करताना दिसत असली तरी ती मेकअप पासून बहुतांशवेळा लांब राहते. शुटींगमर्यादितच ती मेकअप लावते. परंतु, इतर वेळी ती दहीपासून बनलेला फेसपॅक लावण्यास पंसती दर्शवते. यासह डेडस्किन काढण्यासाठी ती बेसन, दूध आणि हळदीपासून बनलेले फेसपॅक लावते. हे फेसपॅक तिच्या चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो देतात.

काकडीचा फेसपॅक म्हणून वापर

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी पिण्याच्या पाण्यासोबत ती काकडीचा वापर करते. फेसपॅक बनवण्यासाठी ताजी काकडी किसून घ्या आणि त्याचा मास्क चेहऱ्यावर लावा. तसंच ऐश्वर्या राय आपल्या त्वचेच्या काळजीसाठी त्वचारोग तज्ज्ञांच्या संपर्कात राहते. त्वचा तपासल्यानंतरच ती कोणतेही कॉस्मेटिक वापरते. जेणेकरून त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनहेल्थ टिप्स