Join us

सणासुदीला ट्रॅडिशनलही दिसायचं आहे आणि स्मार्टही? मग पहा 'या' अभिनेत्रींचा लाजवाब 'फेस्टिव लूक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 15:44 IST

सणवार असले की आपोआपच आपल्याला अगदी टिपिकल मेकअप करावा वाटतो. पण टिपिकल आणि ट्रॅडिशनल मेकअप करूनही स्मार्ट दिसायचं असेल, तर 'या' अभिनेत्रींचे 'फेस्टिव लूक' एकदा पहाच...

ठळक मुद्देबघा तरी या सगळ्या अभिनेत्री साडी, अंबाडा अशा वेशभुषेत किती सुंदर आणि तेवढ्याच ट्रेण्डी दिसत आहेत ते.

गणरायाचे आगमन झाले की आपोआपच घरात चैतन्य येते. गणरायाच्या स्वागताची मग जय्यत तयारी होते आणि त्यासोबतच मग घरातली सगळी मंडळीही अगदी पारंपरिक वेशभुषा करण्यास प्राधान्य देतात. पण नेमकं असं होतं की अनेक जणींना कामाच्या धावपळीत स्वत:साठी वेळ काढता येत नाही आणि मग मेकअपही मनासारखा होत नाही. म्हणूनच तर आता गणपती बसले असले, तरीही अजून महालक्ष्मी, दसरा, दिवाळी असे सगळेच सण एका मागे एक येणार आहेत. त्यामुळे सध्या या काही अभिनेत्रींचा फेस्टिव लूक बघून ठेवा आणि पुढच्या सणांना तुम्ही त्यांची ही स्टाईल कॉपी करून स्मार्ट दिसा.

गणपती म्हणजे बहुतेकांना अगदीच प्रिय असणारे दैवत. म्हणून तर गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळेच गणरायाच्या स्वागताची तयारी आपापल्या परीने होईल तेवढ्या दणक्यात करत असतात. अनेक मराठी कलाकार आणि बॉलीवूड कलाकारही यात मागे नाहीत. म्हणूनच तर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या घरचा गणपती आणि खास गणरायाच्या स्वागतासाठी त्या कशा पारंपरिक पद्धतीने तयार झाल्या आहेत, याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बघा तरी या सगळ्या अभिनेत्री साडी, अंबाडा अशा वेशभुषेत किती सुंदर आणि तेवढ्याच ट्रेण्डी दिसत आहेत ते.

१. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टी अतिशय गोड दिसत आहे. मोकळे केस आणि वन साईडेड ओढणी हा लूक तिला अतिशय शोभून दिसतो आहे. 

 

२. मराठी अभिनेत्री स्मिता गाेंदकर जांभळ्या रंगाची साडी आणि केशरी रंगाचे ब्लाऊज घालून सजली आहे. तिने केसांचा अंबाडा घातला असून कपाळावर चंद्रकोर आणि नाकातली ठसकेबाज नथ तिचे सौंदर्य वाढविणारी आहे. तिने दागिण्यांची निवडही अतिशय क्लासिक वाटते आहे. 

 

३. गणरायाच्या स्वागतासाठी अभिनेत्री काजोल अतिशय आकर्षक पद्धतीने तयार झाली आहे. पिवळ्या रंगाची सिल्कची साडी आणि लाल रंगाचे ब्लाऊज काजोलने घातले असून ती अतिशय कलात्मकतेने तयार झाली आहे. गळ्यातला नेकलेस, कपाळावरची मोठी टिकली, हातातली अंगठी आणि अगदी अंबाड्यावर माळलेला गजरा काजोलचे सौंदर्य वाढविणारा आहे. 

 

४. नुकतीच बाळंतपणातून उठलेली अभिनेत्री उर्मिला निंबाळकरही गणरायाच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सूक असून तिचा लूकही जबरदस्त कॅची झाला आहे. पारंपरिक मराठी वेशभुषा करून सजलेली उर्मिला खूपच सुंदर दिसते आहे.  

 

५. सौंदर्याची आणि गोड हास्याची देणगी लाभलेली, अनेकांच्या दिलांची धडकन माधुरी दिक्षित हिनेदेखील गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. हिरव्या रंगाच्या पैठणीत माधूरी अतिशय सुरेख दिसते आहे. तिचा दागिण्यांचा चॉईस आणि हेअरस्टाईल तिला ट्रेण्डी लूक देत आहेत. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सबॉलिवूडगणेशोत्सवमेकअप टिप्ससेलिब्रिटी