Lokmat Sakhi >Celebrity Corner > इलियाना डिक्रूजने बनवली खास आवडती डिश, पाहा तिनं केलेली खास रेसिपी...

इलियाना डिक्रूजने बनवली खास आवडती डिश, पाहा तिनं केलेली खास रेसिपी...

When Actress Ileana Dcruz is Cooking in Kitchen : इलियानाला स्वयंपाक येतो हे वाचून आपल्याला कदाचित आश्चर्य वाटू शकते. मात्र पण तिने केलेल्या पदार्थांचे फोटो पाहून ती चांगली कूक आहे यावर कदाचित आपला विश्वास बसू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 01:55 PM2022-11-10T13:55:44+5:302022-11-10T13:56:54+5:30

When Actress Ileana Dcruz is Cooking in Kitchen : इलियानाला स्वयंपाक येतो हे वाचून आपल्याला कदाचित आश्चर्य वाटू शकते. मात्र पण तिने केलेल्या पदार्थांचे फोटो पाहून ती चांगली कूक आहे यावर कदाचित आपला विश्वास बसू शकतो.

When Actress Ileana Dcruz is Cooking in Kitchen : Ileana DCruz's favorite dish, check out her special recipe... | इलियाना डिक्रूजने बनवली खास आवडती डिश, पाहा तिनं केलेली खास रेसिपी...

इलियाना डिक्रूजने बनवली खास आवडती डिश, पाहा तिनं केलेली खास रेसिपी...

Highlightsदोन्ही डीश इलियानाने अतिशय चांगल्या सजवल्या असून फोटोवरुन तर त्याची टेस्टही चांगली झाली असावी असा अंदाज आहे. माझ्या किचनमध्ये येणाऱ्या व्यक्तीला मिस करत असून मी कुकींग करत आहे असे ती म्हणते.

साऊथच्या सुंदर अभिनेत्रींच्या यादीत जिचं स्थान वरती आहे अशी अभिनेत्री म्हणजे इलियाना डीक्रूज. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने इलियाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. हिंदी आणि तेलगु चित्रपटातून पुढे आलेली इलियाना बऱ्याचदा चर्चेत असते. आता ती आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ती गोष्ट म्हणजे तिचा किचनमधला वावर. इनियानााने नुकतेच तिच्या किचनमध्ये काही खास पदार्थ तयार केले आहेत. या पदार्थांचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केले आहेत. आता इलियानाने कोणते पदार्थ तयार केले याबाबत आपल्याला नक्कीच उत्सुकता असेल (When Actress Ileana Dcruz is Cooking in Kitchen). 

अभिनेत्री चांगले दिसण्यासोबतच आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी आहार, व्यायाम याकडे विशेष लक्ष देताना दिसतात. डाएटच्या बाबतीत त्या विशेष काळजी घेत असल्याचे दिसते. मात्र त्या स्वत: किचनमध्ये काम करत नसून घरात कामाला येणाऱ्या मदतनीसांनी तयार केलेले खात असतील असे आपल्याला वाटते. एरवी त्यांचे शेड्यूल खूप हेक्टीक असल्याने हे खरेही असेल. मात्र काही वेळा कुकींगची आवड म्हणून किंवा थेरपी म्हणून अभिनेत्री किचनमध्ये काही ना काही पदार्थ करताना दिसतात. आता इलियानाने कोणते असे खास पदार्थ तयार केले ते पाहूया. 

इलियानाला स्वयंपाक येतो हे वाचून आपल्याला कदाचित आश्चर्य वाटू शकते. मात्र पण तिने केलेल्या पदार्थांचे फोटो पाहून ती चांगली कूक आहे यावर कदाचित आपला विश्वास बसू शकतो. इलियानाने नुकतेच २ पदार्थ बनवले, त्यापैकी एक होता चिकन करी आणि दुसरा म्हणजे डेझर्ट. माझ्या किचनमध्ये येणाऱ्या व्यक्तीला मिस करत असून मी कुकींग करत आहे असे या स्टोरीला कॅप्शन देताना इलियाना म्हणते. आता ही व्यक्ती नेमकी कोण हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. स्टीकी टॉफी पुडींग असे नाव देत इलियानाने या गोड पदार्थाचा फोटो शेअर केला आहे. रात्रीच्या जेवणासाठी तिने हे पदार्थ बनवले असल्याचे तिच्या स्टेटसवरुन लक्षात येते. या दोन्ही डीश इलियानाने अतिशय चांगल्या सजवल्या असून फोटोवरुन तर त्याची टेस्टही चांगली झाली असावी असा अंदाज आहे. 

Web Title: When Actress Ileana Dcruz is Cooking in Kitchen : Ileana DCruz's favorite dish, check out her special recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.