Lokmat Sakhi >Fashion > ब्लाऊजचे फिटिंग परफेक्ट होण्यासाठी शिवतानाच वापरा १ सोपी ट्रिक, फिटिंग आणि लूक दिसेल ग्रेसफूल

ब्लाऊजचे फिटिंग परफेक्ट होण्यासाठी शिवतानाच वापरा १ सोपी ट्रिक, फिटिंग आणि लूक दिसेल ग्रेसफूल

1 Simple Magic Trick for good blouse fitting : या ट्रिकमुळे ब्लाऊज शिवतानाच नीट शिवले जाते आणि घोळ येत नाहीत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 12:42 PM2023-10-20T12:42:01+5:302023-10-20T13:39:34+5:30

1 Simple Magic Trick for good blouse fitting : या ट्रिकमुळे ब्लाऊज शिवतानाच नीट शिवले जाते आणि घोळ येत नाहीत.

1 Simple Magic Trick for good blouse fitting : Use 1 simple trick while sewing to get perfect fitting of blouse, festival look will be graceful... | ब्लाऊजचे फिटिंग परफेक्ट होण्यासाठी शिवतानाच वापरा १ सोपी ट्रिक, फिटिंग आणि लूक दिसेल ग्रेसफूल

ब्लाऊजचे फिटिंग परफेक्ट होण्यासाठी शिवतानाच वापरा १ सोपी ट्रिक, फिटिंग आणि लूक दिसेल ग्रेसफूल

सणवार म्हटलं की आपण आवर्जून पारंपरिक लूक करतो. यामध्ये साडीला विशेष महत्त्व असल्याने अगदी तरुणींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सगळेच आवडीने सहावारी साडी नेसतात. साडी हा महाराष्ट्रातील पारंपरिक पोषाख असून काळाच्या ओघात नऊवारी साडी मागे पडत असली तरी सहावारी साडी मात्र आजही अतिशय आवडीने नेसली जाते. आता साडी म्हटल्यावर त्यावर परफेक्ट मॅच होणारे किंवा कॉन्स्ट्रास्ट असे ब्लाऊज असेल तर साडीतला लूक ग्रेसफुल दिसतो. हे ब्लाऊज घातल्यावर परफेक्ट बसलं तर ठिक नाहीतर कधी काखेत घोळ येतात तर कधी आणखी कुठे चुन्या पडतात (1 Simple Magic Trick for good blouse fitting). 

फिटिंग चांगले नसेल तर आपली चिडचिड होते आणि मग पुन्हा पुन्हा टेलरकडे जाऊन ते दुरुस्त करुन आणावे लागते. आधीच अस्तराचे, फॅशनचे मिळून बरीच शिलाई दिलेली असतानाही ब्लाऊज चांगले बसले नाही की आपला पारा वाढण्याचीच शक्यता जास्त असते. हातात पुरेसा वेळ नसेल तर आपण ब्लाऊज तसेच घालतो आणि साडीने ते झाकण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही फिटिंग नीट नसल्याचे पाहणाऱ्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. तुमच्याही बाबतीत नेहमी असं होत असेल तर ब्लाऊज शिवताना १ सोपी ट्रिक वापरायला हवी. या ट्रिकमुळे ब्लाऊज शिवतानाच नीट शिवले जाते आणि घोळ येत नाहीत. पाहूयात ही ट्रिक कोणती आणि ती कशी वापरायची, ज्यामुळे साडी नेसल्यावर आपण नक्कीच ग्रेसफूल दिसू शकू...

उपाय काय?

ब्लाऊज शिवताना त्याच्या आतमध्ये लायक्रा फ्युजिंग या कापडाचा वापर करायला हवा. हे अतिशय पातळ असे कापड असून ते स्ट्रेच होते. ब्लाऊजच्या मागच्या बाजुला हे कापड शिवताना वापरल्याने एकप्रकारचे चांगले फिनिशिंग तयार होते. अगदी बुटीक असणाऱ्या ९० टक्के लोकांनाही या कापडाबद्दलची माहिती नसते. त्यामुळे ही ट्रिक जास्त वापरली जात नाही. पण तुम्ही तुमच्या टेलरला ही ट्रिक सांगितली तर ब्लाऊजचे फिटिंग चांगले बसण्यास याचा नक्कीच फायदा होईल. आता हे कापड लावल्यावर अस्तर किंवा लायनिंग लावण्याची आवश्यकता नाही का असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. पण या कापडावरही ब्लाऊजला अस्तर लावायलाच हवे, ज्यामुळे ब्लाऊजची शिलाई जास्त पक्की होम्यास मदत होते. हे ब्लाऊज शरीरावर इतके चांगले बसेल की त्यावर अजिबात चुन्या येणार नाहीत आणि फिटींग नीट बसल्याने फिनिशिंगही छान दिसेल. 

Web Title: 1 Simple Magic Trick for good blouse fitting : Use 1 simple trick while sewing to get perfect fitting of blouse, festival look will be graceful...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.