सध्या लग्नसराई जोरात सुरु आहे. पुढचे काही महिने म्हणजे मे- जून पर्यंतही अनेक लग्नतिथी आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी साड्यांची, लेहेंगा- घागरा यांची खरेदी झाली असेल आणि ब्लाऊज कसं शिवायचं याचा विचार करत असाल, तर ही एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या. बऱ्याचदा काही जणींच्या बाबतीत असं होतं की मापाला अगदी परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज (perfect fitting and finishing of blouse) देऊनही आपलं ब्लाऊज काही व्यवस्थित अंगावर बसतच नाही. किंवा आपल्याला ब्लाऊजची फिनिशिंग जशी अपेक्षित असते, त्यानुसार आपलं ब्लाऊज तयार होत नाही.(Tips and tricks for the perfect finishing of blouse)
ब्लाऊजवर मध्येच कुठेतरी झोळ पडतो किंवा मग घड्या, आढ्या दिसू लागतात. अशावेळी काही जणी टेलरही बदलून पाहतात. पण तरीही ब्लाऊजला मनाप्रमाणे फिनिशिंग येत नाहीच. अशीच अडचण तुमचीही होत असेल तर हा एक व्हिडिओ एकदा बघायलाच पाहिजे. भरजरी साड्यांचे, लेहेंग्यावरचे ब्लाऊज शिवण्यासाठी तर हा उपाय कराच. पण रेग्युलर वापरातल्या एखाद्या साडीवरचे ब्लाऊज शिवतानाही हा उपाय करून बघा. एखादं ब्लाऊज या पद्धतीने शिवल्यावर तुम्हाला लगेचच या ब्लाऊजची फिटिंग आणि जुन्या ब्लाऊजची फिटिंग यातला फरक लक्षात येईल. हा उपाय इन्स्टाग्रामच्या urban_naree या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
शिवून घेतलेल्या ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग येण्यासाठी...१. शिवून घेतलेलं ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचं आणि परफेक्ट फिनिशिंगचं व्हावं म्हणून लायक्रा फ्युजिंग या कपड्याचा वापर करावा, असा उपाय फॅशन डिझायनर मोनिका यांनी सुचवला आहे.
२. लायक्रा फ्युजिंग हा एक अतिशय मऊ आणि जाळीदार कपडा असतो. साधारण ब्लाऊज पीस जेवढं लागतं, तेवढ्याच मापाचा हा कपडा विकत घ्यावा.
३. ब्लाऊज शिवताना टेलरला तो कपडा ब्लाऊजच्या खाली लावायला सांगावा. अस्तरचं ब्लाऊज असेल तर आधी ब्लाऊज पीस, त्याखाली लायक्रा फ्युजिंग आणि त्याखाली अस्तर अशा पद्धतीने असावे.