जीन्स हा हल्ली अनेकजणांचा आवडीचा पेहराव झाला आहे. स्त्री असो पुरुष असो किंवा तरुण असो, वृद्ध असो... जीन्स घालणं हल्ली सगळ्यांनाच आवडतं. एखादी चांगल्या क्वालिटीची जीन्स घेतली की ती २ ते ३ वर्षे तरी आरामात जाते. या कालावधीत नेमकं िंअनेक जणांच्या बाबतीत असं होतं की काही कारणांमुळे पोटाचा घेर वाढतो. मग पायाला परफेक्ट येणारी जीन्स फक्त कंबरेतच घट्ट होऊ लागते. अशावेळी कंबरेत घट्ट झाली म्हणून जीन्स टाकून देत असाल तर थोडसं थांबा आणि हा एक सोपा उपाय करून बघा. यामुळे कंबरेतही जीन्स अगदी परफेक्ट येईल. (without any alteration make your tight jeans perfectly of your size....)
हा उपाय इंस्टाग्रामच्या homeinspirehacks या पेजवर शेअर करण्यात आला आहे. एरवी कपडे आपल्याला घट्ट होतात तेव्हा ते आपल्या मापाचे करण्यासाठी आपण ते उसवतो.
साडी अंगावर खूप फुगलेली दिसते- निऱ्या घालताना गोंधळ होतो, १ सोपी ट्रिक- दिसाल स्मार्ट- आकर्षक
पण जीन्सच्या बाबतीत आपल्याला असे काहीही करायचे नाही. जीन्स तुमच्या मापाची करायची असेल तर फक्त १ मिनिटाचा हा उपाय आहे. यासाठी तुम्हाला फक्त १ रबर बँड लागणार आहे. रबराच्या मदतीने जीन्स कंबरेत परफेक्ट मापाची कशी करायची, ते आता पाहूया....
एखादा चांगल्या क्वालिटीचं रबर बँड घ्या. जीन्स बटन लावण्यासाठी जे काजे म्हणजेच रबर अडकविण्याचे छिद्र असते, त्यामध्ये रबर बँड घाला आणि तिथल्या तिथे त्याची पक्की गाठ मारून घ्या.
वाढदिवसाच्या दिवशी अचानक लेकीला समोर पाहून वडिलांना आलं रडू... काय झालं नेमकं? व्हायरल व्हिडिओ
आता हे रबर बँड जीन्सच्या बटनामध्ये अडकवा. झालं एवढं सोपं काम आहे हे. रबर बँडच्या इलॅस्टिसिटीमुळे जीन्स तुम्हाला परफेक्ट मापाची करून घालता येईल. आता त्यावर एखादा बेल्ट लावला की आपण लावलेलं रबरही झाकून जाईल.