Lokmat Sakhi >Fashion > ओढणी घेण्याच्या २ सोप्या पद्धती; गरबा खेळताना मधेमधे तर येणार नाहीच, पण दिसाल एकदम उठून

ओढणी घेण्याच्या २ सोप्या पद्धती; गरबा खेळताना मधेमधे तर येणार नाहीच, पण दिसाल एकदम उठून

2 Easy Dupatta Draping Style for Navratri garba dance : ओढणी नेहमीपेक्षा थोड्या हटके पद्धतीने कॅरी केली तर ती सांभाळणे तर सोपे होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 11:55 AM2023-10-16T11:55:34+5:302023-10-16T11:55:49+5:30

2 Easy Dupatta Draping Style for Navratri garba dance : ओढणी नेहमीपेक्षा थोड्या हटके पद्धतीने कॅरी केली तर ती सांभाळणे तर सोपे होते

2 Easy Dupatta Draping Style for Navratri garba dance : 2 easy methods of tying dupatta; While playing garba, you will be seen standing up | ओढणी घेण्याच्या २ सोप्या पद्धती; गरबा खेळताना मधेमधे तर येणार नाहीच, पण दिसाल एकदम उठून

ओढणी घेण्याच्या २ सोप्या पद्धती; गरबा खेळताना मधेमधे तर येणार नाहीच, पण दिसाल एकदम उठून

नवरात्र म्हटल्यावर गरबा, दांडीया खेळण्याचे दिवस. तरुण-तरुणी तर अगदी उत्साहाने हा गरबा खेळायला जातात. गरबा म्हटला की त्यासाठी घागरा-ओढणी, त्यावर सूट होतील असे दागिने, मेकअप हे सगळे ओघानेच आले. या गेटअपमध्ये तयार होऊन खेळण्याची सगळ्यांनाच सवय असते असं नाही. पण मज्जा म्हणून आपण नवरात्राच्या दिवसांत हा अनुभव कधी ना कधी तर घेतोच. यंदा तुम्हीही अशाप्रकारे आपल्या मित्रमंडळींबरोबर किंवा बहिण-भावंडांसोबत गरबा खेळायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तयार होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाहूयात (2 Easy Dupatta Draping Style for Navratri garba dance). 

तुम्हाला घोळदार घागरा, त्यावरची हेवी अशी ओढणी हे सगळं कॅरी करायची सवय नसेल तर गरब्याचा डान्स राहतो बाजूला आणि हे सगळे सावरण्यातच आपला सगळा वेळ जातो. ही ओढणी खेळताना सतत मधेमधे येत असेल तर आपल्याला काहीच सुधरत नाही. पण फॅशन म्हणून किंवा अंग झाकण्यासाठी आणि ड्रेसचा ग्रेस वाढण्यासाठी ही ओढणी तर आपल्याला लागतेच. अशी ही ओढणी नेहमीपेक्षा थोड्या हटके पद्धतीने कॅरी केली तर ती सांभाळणे तर सोपे होतेच पण वेगळ्या पद्धतीने घेतल्याने आपण सगळ्यांमध्ये उठून दिसायलाही त्याची मदत होते. यासाठी आपण फक्त एका बांगडीचा वापर करणार असून बांगडीमध्ये ओढणी कशी ड्रेप करायची ते पाहूया...   

(Image : Google )
(Image : Google )

१. एक गोल्डन किंवा सिल्व्हर आपल्या ड्रेसवर मॅच होईल अशी बांगडी घ्यायची. ही बांगडी मेटलची असेल तर जास्त चांगलं म्हणजे ती ओढणीचे वजन चांगले पेलू शकते. ओढणीचे दोन्ही काठ या बांगडीला सेफ्टी पिनने जोडायचे. बांगडी आपल्या गळ्यापाशी येईल अशी घ्यायची आणि ओढणीचे दोन्ही भाग खांद्यावरुन खाली सोडायचे. यासाठी ओढणी थोडी हलकी असेल तर जास्त चांगले म्हणजे गळ्याला फार ओढले जात नाही. आवश्यकता वाटल्यास खांद्याला दोन्ही बाजूने पीन लावल्यास ओढणी आणखी चांगली बसण्यास मदत होते आणि घसरतही नाही.  

२. हीच बांगडी बांधलेली ओढणी एका बाजुने थोडी घोळदार आणि पदरासारखी घ्यायची असेल तर ही बांगडी गळ्यावर न ठेवता एका खांद्यावर घ्यायची. जेणेकरुन ओढणीचा घोळ घागऱ्यावर येतो आणि ओढणी डीझायनर असेल तर आणखी छान दिसण्यास मदत होते. पुढचा भाग थोडा झाकलेला हवा असेल तर या स्टाईलचा चांगला उपयोग होतो. यामध्ये ओढणीला खूप पिन्स लावण्याचीही आवश्यकता नसल्याने अगदी झटपट आवरुन होते. त्यामुळे तुम्हीही गरबा खेळायला जाणार असाल तर ओढणी स्टाईल करण्याच्या या दोन्ही फॅशन्स नक्की ट्राय करुन पाहा. 
 

Web Title: 2 Easy Dupatta Draping Style for Navratri garba dance : 2 easy methods of tying dupatta; While playing garba, you will be seen standing up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.