Lokmat Sakhi >Fashion > कपडे घालताना 3 चुका टाळाच, सुंदर दिसायच्या नादात होईल आरोग्यावर परीणाम...

कपडे घालताना 3 चुका टाळाच, सुंदर दिसायच्या नादात होईल आरोग्यावर परीणाम...

3 Clothing Mistakes Harmful for Health : पाहूयात कपडे घालताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2023 10:10 AM2023-01-31T10:10:16+5:302023-01-31T10:15:02+5:30

3 Clothing Mistakes Harmful for Health : पाहूयात कपडे घालताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी

3 Clothing Mistakes Harmful for Health : Avoid 3 mistakes while dressing, in the name of looking beautiful, it will affect your health... | कपडे घालताना 3 चुका टाळाच, सुंदर दिसायच्या नादात होईल आरोग्यावर परीणाम...

कपडे घालताना 3 चुका टाळाच, सुंदर दिसायच्या नादात होईल आरोग्यावर परीणाम...

कपडे ही अंग झाकण्यासाठी गरजेची गोष्ट असते. मात्र अनेकदा सुंदर दिसण्यासाठी आणि आपला स्टेटस सांभाळण्यासाठी आपण कपड्यांवर वारेमाप पैसे खर्च करतो. उंची कपडे घातले म्हणजे आपण खूप सुंदर दिसतो आणि कपड्यांवरुन आपले व्यक्तीमत्त्व तयार होते असा अनेकांचा समज असतो. पण कपडे खूप महागडे असण्यापेक्षा ते आपल्याला कम्फर्टेबल, नीटनेटके आणि स्वच्छ असणे अधिक महत्त्वाचे असते हे लक्षात घ्यायला हवे. आपण अनेकदा फॅशन म्हणून किंवा चांगले दिसण्यासाठी वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे घालतो खरे. पण असे कपडे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असू शकतात. पाहूयात कपडे घालताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी, जेणेकरुन आपल्या आरोग्याला कपड्यांचा त्रास होणार नाही (3 Clothing Mistakes Harmful for Health). 

१. आपण बारीक दिसावे किंवा फिगर चांगली दिसावी म्हणून खूप घट्ट कपडे घालतो. मात्र असे करणे आरोग्याच्यादृष्टीने अजिबात चांगले नसते. इनर वेअर्स किंवा जीन्स, ब्लाऊज टाईट असेल तर त्यामुळे आपल्या स्कीनला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्या नसा दबल्या जाऊन रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्वचेला योग्य प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते जी घट्ट कपड्यांमुळे पूर्ण होत नाही. त्यामुळे मोकळेढाकळे आणि आपल्याला कम्फर्टेबल असे कपडे घालायला हवेत.

२. काही वेळा आपण सिंथेटीक फायबरचे कपडे वापरतो. हे कपडे सुती कापडापेक्षा स्वस्त असतात किंवा अंगाला चोपून बसतात. मात्र यामध्ये नायलॉन, पॉलिस्टर, लायक्रा, स्पॅंडेक्स आणि रेयॉन हे घटक असतात. यामध्ये ज्याप्रकारचे केमिकल्स वापरलेले असतात ते आरोग्यासाठी घातक असतात म्हणून शक्यतो सिंथेटीक कपडे वापरणे टाळायला हवे. त्याऐवजी कॉटन, लिनन, बांबू, ज्यूट अशाप्रकारचे कापड वापरा. 

३. बरेचदा महिला किंवा तरुणी अंडरवायर ब्रेसियर वापरतात. स्तनांचा आकार नीट दिसावा म्हणून किंवा फॅशन म्हणून या ब्रेसियर वापरल्या जातात. यामध्ये मेटल वायर असल्याने रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो.     

Web Title: 3 Clothing Mistakes Harmful for Health : Avoid 3 mistakes while dressing, in the name of looking beautiful, it will affect your health...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन