Join us  

उंची कमी आहे आणि हाय हिल्स न घालताही उंच दिसायचं? ३ टिप्स, दिसाल कायम उंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 6:03 PM

3 Fashion Tips To look Tall even though you are Short : कपड्यांची परफेक्ट निवड केली तरी उंच दिसण्यास त्याची चांगली मदत होते.

आपली उंची छान असावी आणि आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावं असं अनेकींना वाटतं. उंची ही आपल्या व्यक्तीमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक असते, म्हणूनच उंच व्यक्तींची एक वेगळी छाप पडते. पण उंची ही आपल्याला जन्मत: मिळालेली गोष्ट असल्याने आपल्याला त्यात फार बदल करता येत नाही. मग उंच दिसण्यासाठी आपण कधी हिल्स घालतो तर कधी आणखी काही. पण कपड्यांची परफेक्ट निवड केली तरी उंच दिसण्यास त्याची चांगली मदत होते. आता कपड्यांची निवड आपण उंच दिसावे म्हणून कशी उपयुक्त ठरते असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठीच आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत (How To Look Tall Fashion Tips)...

१. लूज कपड्यांची फॅशन

सध्या लूज पँट, लूज टॉप किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बलून बॅगी प्रकारचे कपडे वापरणे हा ट्रेंड आहे. मात्र आपली हाईट कमी असेल तर असे कपडे आपल्यावर सूट होत नाहीत. असे लूज कपडे घातले की आपण आणकी बुटके आणि जाड दिसतो. त्यामुळे सध्या फॅशन इन असले तरी असे कपडे बुटक्या लोकांनी शक्यतो वापरु नयेत. तरी तुम्हाला ही फॅशन कॅरी करायचीच असेल तर एक कोणतेतरी लूज फिट आणि एक फिटेड असे घालावे. म्हणजे पँट लूज असेल तर टॉप फिटेड घालावा. यामुळे हाईट काही प्रमाणात झाकली जाण्यास मदत होते. 

२. गुडघ्यापर्यंत स्कर्ट आणि ड्रेस टाळा

शक्यतो गुडघ्याइतके स्कर्ट किंवा ड्रेस असतील घातले तर आपली उंची २ भागांमध्ये विभागली जाते आणि आपण आहोत त्याहून लहान दिसतो. त्यामुळे गुडघ्याच्या खाली येतील पण अगदी जमिनीवर लोळणार नाहीत असे कपडे घाला. ज्यामुळे तुमची उंची नकळत जास्त असल्याचे भासेल.

३. लो वेस्ट जीन्स नको

लो वेस्ट जीन्सची फॅशन मागच्या काही वर्षात खूप इन होती. पण त्यानंतर आता हाय वेस्ट जीन्सची जुनी फॅशन पुन्हा आली आहे. लो वेस्ट जीन्समध्ये जीन्स खाली नेसल्याने आपण आहोत त्याहून बुटके दिसतो. त्यापेक्षा जीन्स जर वरपर्यंत असेल तर आपल्या पायांची उंची जास्त असल्याचे भासते. त्यामुळे उंची कमी असेल तर लो वेस्ट जीन्सपेक्षा हाय वेस्ट जीन्स वापरायला हवी.  

टॅग्स :फॅशनमेकअप टिप्सब्यूटी टिप्स