Join us  

गरबा खेळताना ओढणी सारखी मधेमधे येते? बघा दुपट्टा कॅरी करण्याच्या ३ हटके स्टाईल, बिंधास्त खेळा गरबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 11:42 AM

Dupatta Draping Tips For Garba- Dandiya: गरबा खेळताना ओढणी मधेमधे येऊ नये, यासाठी ती कशा पद्धतीने कॅरी करायची, याच्या या ३ खास स्टाईल...

ठळक मुद्देओढणी जर व्यवस्थित पिनअप करता आली नाही तर ती गरबा खेळताना सारखी मधेमधे येते. आणि त्यामुळे मग आपण वैतागून जातो

पंजाबी ड्रेस असो, वन पीस असो, जीन्स असो किंवा मग गरबा किंवा दांडियाचा अगदी प्रॉपर ड्रेस असो.... यापैकी कोणताही पेहराव असला तरी तो भरजरी, मिररवर्क किंवा बांधनी वर्क असणाऱ्या ओढणीशिवाय खुलून दिसत नाही. आता काही जणी दुपट्ट्याऐवजी जॅकेटही घालतात. पण तरीही दुपट्ट्याची मजाच वेगळी. पण बऱ्याचदा ओढणी जर व्यवस्थित पिनअप करता आली नाही तर ती गरबा खेळताना सारखी मधेमधे येते. आणि त्यामुळे मग आपण वैतागून जातो (How to carry dupatta for garba dance?). कधीकधी पायात अडकून पडायचीही भीती असतेच. असं होऊ नये आणि गरबा खेळताना ओढणी सारखी मधेमधे येऊ नये यासाठी कशा पद्धतीने ओढणी घ्यायची याच्या या काही टिप्स पाहा... (3 Stylish ways for carrying dupatta for garba- dandiya)

 

गरबा खेळताना ओढणी कशा पद्धतीने कॅरी करायची?

१.  ओढणी घेण्याची ही स्टाईल खूपच वेगळी आणि स्टायलिश आहे. ही स्टाईल तुम्ही जीन्स, लेहेंगा अशा ड्रेसवर करू शकता. यामध्ये ओढणी किंवा दुपट्ट्याचा डाव्या साईडचे टोक अगदी मधोमध खोचून घेतले आहे.

गरबा खेळताना थकवा येऊ नये म्हणून खाण्यापिण्याची ही ३ पथ्यं पाळा, मग नाचा बिनधास्त रात्रभर

त्यानंतर ओढणी मागच्या बाजुने लपेटून पुढे आणली आहे. आणि त्यानंतर ती वर उचलून गळ्याभोवती गुरफटून घेतली आहे. 

 

२. ही दुसरी स्टाईलही तुम्ही पंजाबी ड्रेस, लेहेंगा किंवा जीन्स अशा कोणत्याही पेहरावावर केली तरी चालेल. ही स्टाईल खूपच सोपी आहे शिवाय दिसायला अगदी सुंदर.

गरबा- दांडियासाठी जॅकेट घ्यायचंय? फक्त ३०० रुपयांत घ्या एकापेक्षा एक ट्रेण्डी- स्टायलिश जॅकेट

ड्रेस साधा असेल पण ओढणी भरजरी असेल तर ही स्टाईल नक्की करा. चारचौघींमध्ये उठून दिसाल. यामध्ये ओढणीच्या प्लेट्स घालून ती मागच्या बाजूने गळ्यात घेत पुढे सोडली आहे. प्लेट छान पसरवून ठेवल्या आहेत आणि त्यावर कंबरपट्टा लावला आहे. ही ओढणी दोन्ही खांद्यावर पिनअप केली तर अगदी पॅक बसेल. 

 

३. ओढणी कॅरी करण्याची ही स्टाईल नेहमीचीच आहे. पण त्यामध्ये कंबरपट्ट्याचा वापर केलेला आहे.

लिंबू सरबतात घाला ‘इन्स्टंट मसाला’, नेहमीचेच सरबत ऑक्टोबर हिटमध्ये देईल भरपूर एनर्जी

त्यामुळे ओढणी अगदी व्यवस्थित बसते. शिवाय नाचताना तुमच्या शरीराची कितीही हालचाल झाली तरी ओढणी अजिबात हलणार नाही आणि मधेमधे येऊन तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. 

 

टॅग्स :नवरात्री गरबा २०२३शारदीय नवरात्रोत्सव 2023गरबादांडियाफॅशन