Lokmat Sakhi >Fashion > जिन्स-टी शर्टमध्ये स्टायलिश दिसायचंय? भन्नाट सोप्या ३ टिप्स- दिसाल कमाल स्मार्ट

जिन्स-टी शर्टमध्ये स्टायलिश दिसायचंय? भन्नाट सोप्या ३ टिप्स- दिसाल कमाल स्मार्ट

3 T Shirt Hacks for Summer Season :टी शर्ट घालताना काही सोप्या गोष्टी ट्रिक्स वापरल्या तर आपल्याला कम्फर्टेबल तर वाटेलच आणि आपण फॅशनेबलही दिसू शकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 11:43 AM2023-05-18T11:43:50+5:302023-05-18T14:19:48+5:30

3 T Shirt Hacks for Summer Season :टी शर्ट घालताना काही सोप्या गोष्टी ट्रिक्स वापरल्या तर आपल्याला कम्फर्टेबल तर वाटेलच आणि आपण फॅशनेबलही दिसू शकू

3 T Shirt Hacks for Summer Season : A loose t-shirt feels good in summer? 3 tips, you will look fashionable even in cloudy clothes | जिन्स-टी शर्टमध्ये स्टायलिश दिसायचंय? भन्नाट सोप्या ३ टिप्स- दिसाल कमाल स्मार्ट

जिन्स-टी शर्टमध्ये स्टायलिश दिसायचंय? भन्नाट सोप्या ३ टिप्स- दिसाल कमाल स्मार्ट

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान जास्त असल्याने आपल्याला सतत खूप गरम होतं आणि घाम येत राहतो. अशावेळी आपण शक्यतो मोकळेढाकळे आणि हलके कपडे वापरणे पसंत करतो. सुती कुर्ते आणि पंजाबी सूट याबरोबरच आपण कम्फर्टेबल अशा पँटवर मोकळेढाकळे टीशर्ट वापरण्यालाही अनेकदा पसंती देतो. हे टीशर्ट हलके असल्याने गरम होत नाही आणि थोडे ढगळे असले की सगळीकडून हवा लागण्यास मदत होते. त्यामुळे खूप घाम येणे, घामाने ओले होणे किंवा घामाने रॅशेस येणे, खाज येणे अशा समस्या उद्भवत नाहीत. काही टीशर्ट हे स्कीन फिट असतात. पण टिशर्टचा सामान्य पॅटर्न हा ढगळा असल्याने उन्हाळ्यात तरी आपण तसेच टी शर्ट वापरणे पसंत करतो. हे टिशर्ट घालताना काही सोप्या गोष्टी ट्रिक्स वापरल्या तर आपल्याला कम्फर्टेबल तर वाटेलच आणि आपण फॅशनेबलही दिसू शकू. या ट्रिक्स कोणत्या ते पाहूया (3 T Shirt Hacks for Summer Season)...

१. टीशर्ट उंचीला मोठा असेल तर पुढच्या बाजुने त्याच्या बारीक घड्या करुन तो फोल्ड करायचा मधला फोल्ड केलेला भाग पँटमध्ये खोचून टाकायचा. त्यानंतर कडेनेही हा टीशर्ट आत खोचायचा. अशाने पँट थोडी ढगळी होत असेल तरी टी शर्टच्या घड्या घातल्याने ती घट्ट बसण्यास मदत होईल. इतकेच नाही तर कोंबून आत खोचण्यापेक्षा नीट घड्या घालून तो आत खोचला तर दिसतानाही नीटनेटके दिसण्यास मदत होते. टिशर्ट अशाप्रकारे आत खोचल्याने पोट सपाट असेल तर आपण नकळत बारीक दिसतो.


 
२. टी शर्ट मोठा होत असेल आणि आपण तसाच ढगळा टिशर्ट घालून बाहेर पडलो तर गबाळे दिसण्याची शक्यता असते. अशावेळी दोन्ही बाजूने टिशर्ट एकमेकावर फोल्ड करुन मग तो आत खोचावा. यामुळे आपण आवरलेले दिसतो आणि टिशर्टचाही खूप बोंगा दिसत नाही. तसेच आपल्याला आवडत असेल तर वरुन हा टिशर्ट पँटच्या थोडा बाहेरही काढता येतो. 

३. अशाचप्रकारे टीशर्ट वर घेऊन पँटच्या हूकमध्ये त्याची २ टोके घालून बाहेर काढायची आणि पुन्हा पँटमध्ये खोचून टाकायची. त्यावरुन टीशर्ट ओढून घ्यायचा. म्हणजे हा टीशर्ट मोठा असल्याचेही दिसत नाही आणि तो नकळत फॅशनेबल दिसण्यास मदत होते. 

Web Title: 3 T Shirt Hacks for Summer Season : A loose t-shirt feels good in summer? 3 tips, you will look fashionable even in cloudy clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.