डिसेंबर महिना असल्याने सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. लग्न म्हटलं की त्यामध्ये हळद, संगीत, ग्रहमख आणि लग्न, रिसेप्शन अशा बऱ्याच गोष्टी असतात. यातील काही विधी दिवसा असतात. पण हळद, संगीत, रिसेप्शन असे कार्यक्रम शक्यतो संध्याकाळीच असतात. सकाळच्या किंवा दुपारच्या कार्यक्रमाला आपण साधारणपणे पारंपरिक लूक करतो. पण संध्याकाळच्या कार्यक्रमाला थोडा वेस्टर्न लूकही चालतो. संध्याकाळी तयार होताना अंधार, दिवे, ओपन स्पेसमधील कार्यक्रम या सगळ्या गोष्टींचा विचार करुन आवरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. ती घेतल्यास आपलाच लूक खुलण्यास आणि आपण सगळ्यांमध्ये उठून दिसण्यास मदत होते. पाहूयात यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पाहूया (3 tips to get ready for evening wedding function)...
१. कपड्यांची निवड
संध्याकाळच्या रिसेप्शनला जायचं असेल तर नेहमीपेक्षा थोडे हेवी, वर्कचे असे कपडे तुम्ही नक्की घालू शकता. संध्याकाळी दिव्यांच्या प्रकाशात असे कपडे छान खुलून येतात आणि तुम्ही उठून दिसता. मात्र थंडीच्या दिवसांत थंडी वाजण्याची शक्यता असल्याने हे कपडे थोडे जाडसर असतील याची काळजी घ्यायला हवी.
२. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी
संध्याकाळचे लग्न असेल तर आपण सहसा दिवसभर ऑफीस किंवा इतक कामं करुन रिसेप्शनला जातो. अशावेळी आपण थकलेले असण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑफीस किंवा कामं केल्यावर थोडा ब्रेक घेऊन किंवा शक्य असल्यास आराम करुन मग या पार्टीसाठी तयार व्हा. तसेच एखादा चहा किंवा कॉफी घेतल्यास तुम्हाला तरतरी येण्यास मदत होईल. यामुळे ऐन पार्टीमध्ये तुम्ही फ्रेश दिसाल.
३. दागिन्यांची निवड
एरवी सकाळचे किंवा दुपारचे लग्न नाहीतर रिसेप्शन असेल तर आपण सोन्याचे किंवा खड्याचे भरपूर दागिने घालतो. हेअरस्टाईललाही आपण काही ना काही हेवी लावतो. दुपारच्या कार्यक्रमासाठी ते शोभून दिसते. पण संध्याकाळी आधीच सगळीकडे लाईट्स असल्याने आणि कपडे चमचमते घातल्याने शक्यतो हेवी प्रकारचे दागिने घालणे टाळलेले केव्हाही जास्त चांगले. याऐवजी तुम्ही फक्त हेवी कानातले आणि बिंदी, हातात हेवी कडं अशी मिनीमम ज्वेलरी कॅरी करु शकता.