Join us  

थंडीत स्कार्फ कॅरी करायचे ३ हटके प्रकार; हिवाळ्यातही दिसा फॅशनेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2022 4:54 PM

3 Ways to Style Scarf in Winter : थंडीपासून आपले संरक्षण व्हायला तर मदत होतेच पण आपण फॅशनेबल दिसण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो.

ठळक मुद्देस्वत:ला फॅशन अपडेट करायचे असेल तर अशाप्रकारचे व्हिडिओ पाहणे आणि ते फॉलो करायला हवेतथंडीतही स्वत:ला फॅशनेबल ठेवायचं तर पाहा हा व्हिडिओ...

थंडीच्या दिवसांत हवेतला गारठा वाढल्यामुळे आपल्या कपड्यांच्या फॅशनमध्ये आपोआपच बदल होतात. एरवी आपण सुती, लहान बाह्यांचे, थोडे पातळ असलेले कपडेही सहज वापरु शकतो. पण थंडीच्या दिवसांत मात्र अंग जास्तीत जास्त झाकले जाईल असे, छाती, डोकं, कान यांना वारं लागणार नाही असे कपडे प्रामुख्याने वापरले जातात. यामध्ये जॅकेटस, वूलन कपडे, सॉक्स, वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या आणि स्कार्फ यांचा समावेश असतो. स्कार्फ हा अनेकदा आपण फॅशन म्हणून कॅरी करतो. मात्र अडीनडीला कधी डोक्यावर घेण्यासाठी किंवा कधी अंग झाकण्यासाठी या स्कार्फचा अतिशय चांगला उपयोग होतो (3 Ways to Style Scarf in Winter). 

(Image : Google)

कपड्यांनुसार आपण या स्कार्फची फॅशन बदलतो. फिक्या रंगावर गडद रंगाचा स्कार्फ अधिक उठून दिसतो तर कधी कॉम्बिनेशन असलेला स्कार्फ आपला लूकच एकदम बदलून टाकतो. या स्कार्फमध्येही कापडाचे, डिझाईन्सचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात जे आपला लूक एकदम बदलून टाकतात. कधी कुर्त्यावर तर कधी जीन्सवरही आपण हे स्कार्फ कॅरी करतो. यामुळे थंडीपासून आपले संरक्षण व्हायला तर मदत होतेच पण आपण फॅशनेबल दिसण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. आता नेहमीप्रमाणे नुसता गळ्यात स्कार्फ टाकण्यापेक्षा हा स्कार्फे थोडा वेगळ्या पद्धतीने बांधला तर तो जास्त छान दिसतो. मात्र झटपट आणि थोडी हटके स्टाईल कशी करायची हे आपल्याला माहिती असतेच असे नाही. त्यासाठीच आपण आज स्कार्फ बांधण्याच्या ३ सोप्या पद्धती पाहणार आहोत. 

इन्स्टाग्रामवर ब्युटी टीप्स या पेजवर या स्कार्फ टाय करण्याच्या टिप्स शेअर करण्यात आल्या असून यामध्ये ३ एकदम मस्त स्टाईल्स दाखवण्यात आल्या आहेत. या टिप्स अतिशय सोप्या असून यामध्ये असणारी मॉडेल काळ्या रंगाच्या वन पीसवर ग्रे रंगाचा पोलका डॉट असलेला स्कार्फ टाय करताना दिसते. तुम्हाला यातली कोणती आवडली असेही याच्या कॅप्शनमध्ये विचारण्यात आले आहे. स्वत:ला फॅशन अपडेट करायचे असेल तर अशाप्रकारचे व्हिडिओ पाहणे आणि ते फॉलो करुन आपला फॅशन सेन्स सुधारणे नक्कीच चांगले नाही का? विशेष म्हणजे २ दिवसांत या व्हिडिओला ८ हजारांहून अधिक लाईक्स आले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्समेकअप टिप्सथंडीत त्वचेची काळजी