Join us  

खास उन्हाळ्यासाठी कपडे खरेदी करताय? हे ४ टॉप नक्की खरेदी करा, दिसा एकदम ट्रेण्डी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2023 2:22 PM

4 Best Cotton Tops Design For Summer Season : उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घ्यायचे म्हणून जे मिळेल ते घेण्यापेक्षा खास ट्रेण्डी, कूल कपडे घ्या.

उन्हाळा सुरु झाला की आपला जीव उष्णतेने हैराण होतो. वाढत्या गरमीमुळे आपल्या जीवाची लाही लाही होते. जसजसे दिवस पुढे जातात तसे तापमान अधिकच वाढत जाते. या ऋतूमध्ये, त्वचेवर पुरळ किंवा त्वचेची कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून आपण त्वचेला सहन होणारे अनुकूल फॅब्रिकचे कपडे घालण्यास प्राधान्य देतो. त्वचेसाठी अनुकूल फॅब्रिकबद्दल बोलायचे तर, आजकाल कॉटन फॅब्रिकला सर्वाधिक पसंती दिली जाते. उन्हाळ्यामध्ये येणारा घाम आणि त्यातून होणारी चिडचिड रोखण्यासाठी उन्हाळ्यामध्ये सुती किंवा कॉटनच्या कापडाचा वापर केला जातो. उन्हाळ्यांत अंगाला येणारा घाम रोखण्यासाठी सुती कापड खूपच उपयुक्त असल्याचे मानले जाते. शरीरातील घाम वाळविण्याचे किंवा शोषून घेण्याचे काम सुती कपडे करतात. इतर कोणत्याही प्रकारचे कापड हे काम करू शकत नाही. त्यामुळे या काळात खादी, मऊ सुती, ऑरगॅनिक कॉटन, लिनन असे कपडे वापरण्यास महिला प्राधान्य देतात. 

आपल्या कपड्यांमध्ये असे अनेक पॅटर्न असतात ज्यामुळे गरम होत असते, किंवा ते दिसायला खूप सुंदर आणि हेवी असतात. परंतु असे कपडे उन्हाळ्यासाठी आपण वापरणे शक्यतो टाळतोच. या दिवसांत काहीजण तर जास्त गरम होणार तर नाही असे हलके कपडे वापरण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत कॉटन व्यतिरिक्त काही फॅब्रिक्स असे असतात की ते घातल्यावर गरम वाटत नाही. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण उन्हाळ्यात काही मोजक्याच फॅब्रिकचे कपडे वापरतात. उन्हाळ्यांत स्टायलिश व कुल दिसण्यासाठी कपड्यांचे काही पर्याय समजून घेऊयात(4 Best Cotton Tops Design For Summer Season).

उन्हाळ्यांत स्टायलिश व कुल दिसण्यासाठी कपड्यांचे काही पर्याय :- 

१.  क्रॉप टॉप (Crop Top) :- सध्या सगळीकडेच क्रॉप टॉप परिधान करण्याचा ट्रेंड सुरु आहे. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे डिझाइन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतील. क्रॉप टॉप (Crop Top) हे खूप स्वस्त आणि बाजारांत अगदी सहज उपलब्ध होतात. मार्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या कॉटन फॅब्रिकपासून बनवलेले क्रॉप टॉप ३०० ते ५०० रुपयांपर्यंत सहज मिळतील. स्कर्टपासून जीन्सपर्यंत सर्व प्रकारच्या कपड्यांवर तुम्ही हे स्टायलिश क्रॉप टॉप (Crop Top) घालू शकता.

तुम्ही पण सुडौल दिसण्यासाठी 'बॉडी शेपवेअरचा' वापर करता? तज्ज्ञ सांगतात....

२. डोरी स्टाइल टॉप (Dori Style Top) :- उन्हाळ्यांत जर तुम्हांला अगदी साधा सुधा पण स्टायलिश लूक हवा असल्यास आपण डोरी स्टाइल टॉप (Dori Style Top)चा उत्तम पर्याय देखील निवडू शकतो. या डोरी स्टाइल टॉप (Dori Style Top) मध्ये खांद्यावर डोरी डिझाइन केलेला कॉटन टॉप घालू शकता. हे डोरी स्टाइल टॉप (Dori Style Top) तुम्हांला मार्केटमध्ये जवळपास ४०० ते ६०० रुपयांना विकत मिळतील. या प्रकारच्या टॉपसह तुम्ही ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर कानातले स्टाइल करू शकता. 

३. पेप्लम स्टाइल टॉप (Peplum Style Top) :- जर तुम्हाला कॉटन फॅब्रिकपासून बनवलेले पेप्लम शैलीचे डिझाइन आवडत असेल तर उन्हाळ्यांत कुल दिसण्यासाठी पेप्लम स्टाइल टॉप हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. शॉर्ट्स स्कर्टस ते स्किनी जीन्सवर तुम्ही अशाप्रकारचे पेप्लम स्टाइल टॉप परिधान  करु शकता. तुम्हाला असे टॉप्स जवळपास ५०० ते १००० रुपयांपर्यंत बाजारांत सहज विकत मिळतील.   

लठ्ठपणा, ओघळलेले स्तन यामुळे फॅशनेबल कपडे घालता येत नाहीत? ४ टिप्स, करा योग्य कपड्यांची निवड...

४. सिंगल शोल्डर टॉप (Single Shoulder Top) :- उन्हाळ्याच्या सिजनमध्ये जर तुम्हाला एकाच वेळी बोल्ड आणि कम्फर्टेबल दिसायचे असेल तर या प्रकारचा सिंगल शोल्डर टॉप तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल. या प्रकारच्‍या डिझाईन असलेला कॉटन टॉप जवळपास ५०० ते १००० रुपयांना बाजारात विकत मिळेल. हा टॉप सिंगल शोल्डर असल्यामुळे आपल्या फारसे गरम देखील होणार नाही. तसेच कॉटनचा मोकळा ढाकळा टॉप घातल्यामुळे तुम्ही अगदी कम्फर्टेबल फिल कराल.

टॅग्स :फॅशन