Lokmat Sakhi >Fashion > ख्रिसमस पार्टीसाठी तयार होताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिसाल सगळ्यात आकर्षक-देखण्या

ख्रिसमस पार्टीसाठी तयार होताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिसाल सगळ्यात आकर्षक-देखण्या

4 Fashion Tips to get ready for Christmas party : ख्रिसमसच्या निमित्ताने आपला लूक कसा असला पाहिजे याविषयीच्या काही टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2023 04:12 PM2023-12-24T16:12:37+5:302023-12-24T16:18:38+5:30

4 Fashion Tips to get ready for Christmas party : ख्रिसमसच्या निमित्ताने आपला लूक कसा असला पाहिजे याविषयीच्या काही टिप्स

4 Fashion Tips to get ready for Christmas party : 4 things to remember while getting ready for Christmas party, you will look your best | ख्रिसमस पार्टीसाठी तयार होताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिसाल सगळ्यात आकर्षक-देखण्या

ख्रिसमस पार्टीसाठी तयार होताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिसाल सगळ्यात आकर्षक-देखण्या

आपण सणावारांना आवर्जून पारंपरिक कपडे घालतो आणि आपला लूकही तसाच करतो. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य देशात मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जाणारा हा नाताळ हा सणही जगभरात साजरा केला जातो. नाताळ म्हणजे सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, दिव्यांची रोषणाई, केक आणि बिस्कीटे, चॉकलेट यांची देवाणघेवाण हे ठरलेले असते. गेल्या काही वर्षात भारतातही हा नाताळचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपले मित्रमंडळी ख्रिश्चन धर्माचे असतील तर आपल्याला त्यांच्या घरी पार्टीसाठी आवर्जून बोलावले जाते. इतकेच नाही तर ऑफीसमध्ये, हॉटेलमध्येही ख्रिसमस पार्टींचे खास आयोजन केलेले असते. अशावेळी आपले कपडेही या दिवसाला साजेसे असेच असायला हवेत. म्हणूनच ख्रिसमस पार्टीसाठी तयार होताना नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे, ख्रिसमसच्या निमित्ताने आपला लूक कसा असला पाहिजे याविषयीच्या काही टिप्स आज आपण पाहणार आहोत (4 Fashion Tips to get ready for Christmas party). 

१. कपड्यांची निवड

कपड्यांची निवड करताना साधारणपणे लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे निवडावेत. तसेच या काळात खूप जास्त थंडी असल्याने लोकरीचे किंवा जाड कापड असलेले कपडे केव्हाही जास्त उबदार ठरतात. हे कपडे वेस्टर्न पॅटर्नचे असतील तर जास्त चांगले. त्यामुळे पार्टी लूक जास्त परफेक्ट आणि छान होऊ शकतो. यामध्ये जीन्स-टॉप, वनपीस, शॉर्ट ड्रेस, स्कर्ट असे काहीही ट्राय करता येऊ शकते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. दागिन्यांची निवड

वेस्टर्न कपड्यांवर साधारपणे खूप जास्त ज्वेलरी घालण्याची पद्धत नाही. त्यामुळे वेस्टर्न लूक देतील असे छान ट्रेंडी कानातले, हातात एखादे ब्रेसलेट आणि घड्याळ आणि गळ्यात एखादी चेन किंवा साधे पेंडंट अशी ज्वेलरी आपण नक्कीच कॅरी करु शकतो. 

३. मेकअप

थंडीच्या दिवसांत चेहरा कोरडा पडलेला असल्याने जास्त मेकअप केला तर चेहरा आणखीनच कोरडा दिसतो. अशावेळी बेसला भरपूर मॉईश्चरायजर लावून मेकअप करावा. नाईट पार्टीसाठी डोळ्यांचा मेकअप थोडा बोल्ड केला तरी चालतो. तसेच लिपस्टीकही कपड्यांना मॅच होईल अशीच निवडायला हवी. त्यामुळे आपला लूक छान खुलून येण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. फूटवेअर 

वेस्टर्न कपडे असतील तर साधारणपणे स्निकर्स, कॅनव्हास शूज किंवा स्पोर्ट वेअर चांगले दिसू शकतात. इतकेच नाही तर ट्रेंडी बूट किंवा हिल्सचे सँडलही आपण सवय असेल तर कॅरी करु शकतो. मात्र त्यांचा रंग आपल्या कपड्यांच्या रंगाशी मॅच होईल याची अवश्य काळजी घ्यायला हवी.   
 

Web Title: 4 Fashion Tips to get ready for Christmas party : 4 things to remember while getting ready for Christmas party, you will look your best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.