दिवाळीत सध्या पारंपारिकसह मॉडर्न लूक सोशल मिडीयावर ट्रेंडवर आहे. काठापदराची साडी आणि त्यासह डिझायनर ब्लाऊजचा ट्रेंड सध्या तुफान चर्चेत आहे. या सणासुदीच्या दिवसात तुम्ही देखील काठापदराच्या साडीवर डिझायनर ब्लाउज शिवून परिधान करू शकता. या नवख्या ब्लाउजच्या लुकमध्ये तुम्हाला पारंपारिकसह एक मॉडर्न आणि हटके लुक मिळेल.
डीप बॅक ब्लाउज
सध्या डीप बॅक ब्लाउजचा ट्रेंड सर्वत्र पाहायला मिळत आहे. स्लीवलेससह डीप बॅक ब्लाउज साध्या साडीला देखील विशिष्ट लुक देईल. ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला गोंडे, नॉट्स लावून स्टायलिश बॅक लूक मिळवू शकता.
फूल स्लिव्हज ब्लाउज
ज्यांना फूल स्लिव्हजची आवड आहे. त्यांनी मागच्या ब्लाउजचा गळा त्रिकोणी आकाराचा ठेवला तर अधिक खुलून दिसेल. त्यात साडीच्या रंगाच्या कॉण्ट्रास्ट किंवा सोनेरी लेस लावली तर उत्तम दिसेल.
डीप बॅक नॉट ब्लाऊज
सिंपल साडीवर पुढून प्लेन आणि मागून मोठ्या गळ्यांचे पॅटर्न त्यासह मागे एक मोठा नॉट ब्लाऊज तुम्ही या दिवाळीनिमित्त खास शिवू शकता. खास सणासुदीच्या दिवसात तुम्ही मित्र मैत्रिणींना भेटायला जाण्यासाठी किंवा घरातील फंक्शनसाठी हा पॅटर्न खास आहे.
हेवी डिजाईन्स ब्लाउज
पैठणी किंवा हेवी डिजाईन्सच्या साडीसाठी देखील तुम्ही विशिष्ट ब्लाऊज परिधान करू शकता. ज्यात बॅक पिकॉक डिझाइन उत्तम दिसेल. लग्नासाठी किंवा मोठ्या समारंभासाठी हा पॅटर्न ट्राय करू शकता.