आपण टेलरकडे जाऊन जेव्हा ब्लाऊज (Types of blouse Stitching) शिवायला टाकतो, तेव्हा त्यांच्याकडून हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कोणत्या प्रकारचं ब्लाऊज शिवायचं. आता गळ्याचे पॅटर्न आपल्याला माहिती असतात. पण ब्लाऊजचे प्रकार विचारल्यावर मात्र आपण गडबडून जातो आणि काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून नेतो. पण ब्लाऊजची फिटींग परफेक्ट असावी, यासाठी आपण कोणत्या साडीवर ब्लाऊज शिवणार आहोत, साडीचा पॅटर्न कसा आहे (Which blouse is more suitable according to your saree?) आणि शिवाय आपली देहयष्टी कशी आहे, यावर ब्लाऊज शिवणं अवलंबून असतं. त्यामुळेच ब्लाऊजचे हे ४ प्रकार बघून घ्या आणि तुम्हाला कोणतं ब्लाऊज शिवण्याची गरज आहे, हे स्वत:च तपासा. (Blouse stitching ideas)
१. सिंपल प्लेटेड ब्लाऊज
या ब्लाऊजला चार कट असतात. हे ब्लाऊज एखाद्या साध्या साडीवर शिवावं. नेटच्या किंवा पातळ टेक्स्चर असणाऱ्या साडीवर हे ब्लाऊज शिवणं टाळावं.
२. बेल्ट ब्लाऊज
नावातच सांगितल्याप्रमाणे या ब्लाऊजला कंबरेच्या ठिकाणी एक बेल्टसारखी फिटिंग असते. ज्यांच्या छातीचा भाग मोठा असताे त्यांचे ब्लाऊज पाठीवर किंवा पोटावर व्यवस्थित फिटिंगला बसत नाहीत. वर उचलल्यासारखे दिसतात. अशा मैत्रिणींनी बेल्ट ब्लाऊज किंवा बेल्ट कट ब्लाऊज शिवावा.
३. प्रिन्सेस लाईन ब्लाऊज
आजकाल हे ब्लाऊज जास्त ट्रेण्डिंग आहेत. कारण या ब्लाऊजची फिटिंग अतिशय उत्तम येते.
इम्युनिटी बुस्टर शॉट! सेलिब्रिटी डाएटिशियन पूजा माखिजाची खास रेसिपी, थंडीत ठणठणीत रहायचं तर.....
नेटची साडी असेल तर अशाच पद्धतीचं ब्लाऊज शिवावं. शिवाय डिझायनर साड्या, पार्टीवेअर साड्यांसाठीही प्रिन्सेस लाईन ब्लाऊज शिवण्याचा सल्ला दिला जातो.
४. चोली कट ब्लाऊज
यालाच बेंगॉली कट किंवा कटोरी कट ब्लाऊज असंही म्हणतात. कटोरी ब्लाऊज नावाने ते जास्त ओळखलं जातं.
अभिनेत्री भाग्यश्रीचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा, केस आणि आरोग्य- तिन्हीसाठी एक खास उपाय
ज्यांचा छातीचा भाग जास्त मोठा नसतो, त्यांच्यासाठी हे ब्लाऊज चांगले आहे. पण ब्लाऊज अंगावर व्यवस्थित दिसण्यासाठी त्याची फिटिंग अगदी अचूक असणं गरजेचं आहे.