भारतीय महिलांमध्ये कपाळाला टिकली लावण्याची परंपरा दिसून येते. आपल्याकडे कपाळाला टिकली लावणे हा एक आपल्या संस्कृतीचा भाग मानला जातो. कोणताही भारतीय लुक किंवा पोषाख हा कपाळावरील टिकलीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे ही टिकली स्टाइल स्टेटमेंट म्हणून काम करते. पूर्वी महिला कपाळावर मेण लावून ठसठशीत कुंकू लावत मग त्याजागी गंध आले आणि आता विविध रंगाच्या टिकल्या वापरल्या जातात. आजकालच्या महिला त्यांच्या पेहेरावानुसार त्याला मॅच होणारी टिकली लावतात.
कपाळावर टिकली शिवाय एखाद्या स्री चा शृगांर अपूर्ण राहिल्यासारखा वाटतो. आपल्यापैकी बहुतांश महिला आपल्या कपड्यांच्या रंगानुसार, प्रकारानुसार वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांच्या, पॅटर्नच्या, लहान - मोठ्या टिकल्या लावणे पसंत करतात. मुख्यत्वे करून चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी कपाळावर टिकली लावली जाते. ही टिकली कपाळावर चिकटून राहण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि रसायन लावली जातात. या वापरल्या जाणाऱ्या केमिकल्स मुळेच ही टिकली कपाळावर चिकटून राहते. ही टिकली कपाळावर सतत लावल्याने काहीवेळा खाज, रॅशेस, सूज किंवा ड्राय स्किनसह सफेद डाग अशा समस्या उद्भवतात. या अशा वारंवार समस्या उद्भवल्या तर कपाळावरची स्किन खराब होऊन चेहऱ्याच्या सुंदरतेत फरक पडू शकतो. अशावेळी नेमकं काय करायचं हा प्रश्न पडतो. कपाळावर टिकली लावल्याने त्या भागावरची त्वचा काहीवेळा खराब होऊन काही गंभीर समस्या उद्भवू नये म्हणून काही सोपे उपाय लक्षात ठेवूयात(5 Amazing Tips To Get Rid Of Skin Dryness And Itching Due To Bindi).
कपाळावर टिकली लावल्याने अॅलर्जीच्या समस्येने हैराण ?
१. मॉइश्चरायझरची मदत घ्या :- काहीवेळा कपाळावर सतत टिकली लावून त्वचेचा तो भाग कोरडा पडतो. कपाळाच्या त्वचेचा कोरडेपणा आणि खाज दूर करण्यासाठी आपण मॉइश्चरायझरची मदत घेऊ शकता. यासाठी आपण कपाळावर ज्या ठिकाणी टिकली लावतो त्या भागावर दिवसातून दोन ते तीन वेळा त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे. त्यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहून त्वचेचा कोरडेपणा आणि खाज सुटण्यापासून लगेच आराम मिळतो.
"हाय हिल ते नाचे तो तू बड़ी जचे," पण हाय हिल्स घालून पस्तावाल? रोज हिल्स घालत असाल तर...
२. खोबरेल तेल लावा :- टिकलीमुळे त्वचेवर येणारे पुरळ आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेल प्रभावी असते. यासाठी दररोज दोन मिनिटे खोबरेल तेलाने कपाळाला मसाज करावा. नारळाचे तेल त्वचेसाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझिंग एजंट मानले जाते, जे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते.
सनग्लासेस विकत घेताय? ५ गोष्टी चेक कराच, फेक सनग्लासेस खरेदी केले तर होतात गंभीर आजार...
३. एलोवेरा जेल लावा :- टिकलीमुळे कपाळावरील त्वचेवर येणारा कोरडेपणा आणि खाज दूर करण्यासाठी आपण एलोवेरा जेलची मदत घेऊ शकतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कपाळावर एलोवेरा जेल लावावे आणि त्वचेला काही वेळ हलक्या हातांनी मसाज करावा. एलोवेरा जेलमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. टिकलीच्या वापरामुळे त्वचेच्या भागावर येणारे पुरळ, खाज, रॅशेज यांसारख्या सगळ्या समस्यांवर एलोवेरा जेल हा गुणकारी उपाय आहे.
४. तिळाचे तेल वापरा :- त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण तिळाच्या तेलाचा वापर करू शकतो. यासाठी बोटावर थोडेसे तिळाच्या तेलाचे दोन-तीन थेंब घेऊन ते ठिपके त्वचेच्या भागावर लावून त्वचेला दोन-तीन मिनिटे मालिश करा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि खाज हळूहळू दूर होण्यास मदत होते.
५. कमी प्रमाणात गोंद असणाऱ्या टिकलीचा वापर करावा :- कमी प्रमाणात गोंद असणाऱ्या टिकलीचा वापर करावा. मुख्यत्वे करून रात्री झोपण्यापूर्वी कपाळावरील टिकली काढावी आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझिंग क्रिम लावावे. कपाळाची त्वचा जोर देऊन रगडण्याची चूक करू नये. हलक्या हाताने त्वचा स्वच्छ करावी.