आपण नेहमीच्या वापरात वेगवेगळ्या कापडांपासून तयार झालेले कपडे वापरतो. यात कॉटन, लिनन, नायलॉन, सॅटिन अशा वेगवेगळ्या कापडांच्या प्रकाराचा समावेश असतो. यातही सॅटिन किंवा नायलॉन ( Hack to Avoid Satin Dresses sticking to your body) सारख्या मटेरियल पासून तयार झालेल्या कपड्यांचा वापर करणे थोडे अवघड असते. सॅटिन आणि नायलॉन सारखे कापड दिसायला फारच सुंदर दिसत जरी असले तरीही ते अंगाला (How Do You Remove Static From Clothes Easily) चिकटून बसते. काहीवेळा आपल्या शरीराला आलेल्या घामामुळे असे फॅब्रिक आपल्या अंगाला चिकटून (How to Stop Static on a Dress Clinging to You) राहते. सॅटिन आणि नायलॉन सारख्या फॅब्रिक्स पासून तयार झालेले कपडे अंगाला चिकटल्यावर ते दिसताना व्यवस्थित दिसत नाही. तसेच सारखं अशा पद्धतीने कपडे अंगाला चिकटत राहिले तर आपल्याला देखील असे कपडे घालणे नको वाटते(5 easy tips to avoid satin dresses sticking to your body).
काहीवेळा तर सॅटिन आणि नायलॉन सारखे कपडे अंगाला अगदी चिकटून बसल्याने आपल्या शरीराचा शेप बाहेरून दिसतो. त्यामुळे चारचौघात जाताना असे कपडे अंगाला चिकटल्यास आपल्याला ओशाळल्यासारखे होते. अशावेळी नेमकं काय करावं ते समजत नाही. यामुळे आपण शक्यतो सॅटिन आणि नायलॉन सारख्या फॅब्रिक्स पासून तयार केलेलं कपडे फारसे घालत नाही. परंतु काही गोष्टींची खबरदारी घेतली तर आपण हे सॅटिन आणि नायलॉन सारखे कपडे अगदी सहजपणे घालू शकतो. सॅटिन आणि नायलॉनसारखे कपडे घातल्यावर ते अंगाला चिकटू नयेत यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात.
सॅटिन, नायलॉन सारख्या फॅब्रिक्स पासून तयार केलेले कपडे अंगाला चिकटू नयेत म्हणून...
१. अंगाला मॉइश्चरायझर लावा :- सॅटिन, नायलॉन सारख्या फॅब्रिक्स पासून तयार केलेले कपडे शक्यतो परिधान केल्यावर अंगाला चिकटून बसतात. यासाठी असे कपडे घालण्याआधी अंगाला मॉइश्चरायझर न विसरता लावावे. अंगाला मॉइश्चरायझर लावल्याने सॅटिन, नायलॉन सारख्या फॅब्रिक्स पासून तयार केलेले कपडे अंगाला चिकटून बसत नाही.
कोणत्या वयात कोणती ब्रेसियर वापरावी? परफेक्ट लूकसह कम्फर्टसाठी ‘हे’ विसरु नका...
२. कपड्याच्या आतील बाजूस पिन लावून घ्यावी :- सॅटिनचे कपडे अंगाला चिकटू नयेत म्हणून कपड्याच्या आतील बाजूस असणाऱ्या छोट्याशा टॅगवर एक सेफ्टी पिन लावून घ्यावी. यामुळे कपड्यांमध्ये तयार होणारी स्टॅटीक एनर्जी या सेफ्टी पिनकडे आकर्षित होते. जेणेकरून कपडे आपल्या अंगाला चिकटून बसत नाही.
चेहऱ्याचा आकार कसा आहे, गोल-चौकोनी की निमुळता? त्याप्रमाणे ‘असे’ शिवा ब्लाऊज, परफेक्ट लूकची युक्ती
३. मेटल हॅंगरचा वापर करावा :- सॅटिन - नायलॉन सारखे कपडे नेहमी मेटलच्या हॅंगरवर लटकावून ठेवावेत. कपडे मेटलच्या हॅंगरवर लटकवण्याआधी हँगर कपड्यांवर अलगद हल्केच घासून घ्यावा. जेणेकरून कपडे घातल्यावर आपल्या अंगाला चकटून बसत नाहीत.
४. इनर वेअर्सचा वापर करा :- जर सॅटिनचा ड्रेस शरीराला जास्त प्रमाणांत चिकटत असेल तर आतमध्ये कॉटनचे इनर वेअर्स घाला. हलक्या आणि सुती किंवा कॉटन कापडाच्या इनर वेअर्सचा घातल्याने सॅटिनचे कपडे अंगाला जास्त चिकटत नाहीत. कॉटन फॅब्रिकमुळे सॅटिन शरीरावर चिकटत नाही यासोबतच ड्रेसचे फिटिंग आणखी चांगले दिसते.
महागडे-फॅशनेबल ब्लाऊज काखेत फाटतात-घामाचे डागही पडतात? २ सोप्या ट्रिक्स- ब्लाऊज टिकतील अनेक वर्ष...
५. कापड थोडे ओलसर करा :- जर सॅटिनचे कापड संपूर्णपणे कोरडे असेल तर ते अंगाला जास्त प्रमाणांत चिकटते. त्यामुळे असे सॅटिनचे ड्रेसेस घालण्यापूर्वी पाण्याचा स्प्रे करून किंचित हलके ओले करून घ्यावे. सॅटिनच्या कापडात थोडा ओलावा आला की ते अंगाला चिकटत नाहीत.