फॅशनेबल कपडे, ॲक्सेसरीज वापरायला किंवा स्टायलिश रहायला बहुतेक सगळ्यांनाच आवडतं. काही अपवाद सोडले तर अनेक जणींचा आपण स्टायलिश, फॅशनेबल दिसावं, असा प्रयत्न असताे. हल्ली तर बाहेरच्या जगात वावरताना आपलं प्रेझेंटेबल (How to maintain classy look) असणं, खूपच जास्त गरजेचं झालं आहे. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करणं काहीच चुकीचं नाही. पण बऱ्याचदा कपडे आणि इतर ॲक्सेसरीज यांची अचूक निवड कशी करावी (proper selection of accesories and clothes), त्यांचं एकमेकांशी कसं कॉम्बिनेशन असावं, हे बऱ्याच जणींच्या लक्षात येत नाही. त्यामुळे मग एकंदरीतच त्यांचा सगळा लूक 'ओव्हर' या प्रकारात मोडणारा होतो. म्हणूनच फॅशन- स्टाईल करताना काही चुका टाळायला पाहिजेत. (5 Fashion mistakes that should avoid)
ॲक्सेसरीजची निवड करताना ५ चुका टाळाया टिप्स इन्स्टाग्रामच्या davoguecurly या पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत.
तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही या ५ चुका करताय का१. यात सांगण्यात आलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बोल्ड किंवा हेवी दिसणारे कानातले आणि गळ्यातलं घालणं टाळा. कानातलं मोठं असेल तर गळ्यातलं नाजूक हवं. कानातले आणि ब्रेसलेट किंवा बांगडी हे दोन्ही हेवी असतील, तर अधिक स्टायलिश वाटेल.
२. हातात बांगडी, ब्रेसलेट किंवा कडं असंच काहीतरी घाला. एखादा दोरा किंवा धाग्यांपासून तयार केलेलं काहीतरी असं काही हातात घालू नका.
३. तुम्ही हातात घेतलेली पर्स खूप मोठी किंवा खूप लहान नको. तसेच तिचा आकार योग्य हवा. म्हणजे तिच्यात खूप वस्तू कोंबून तिचा आकार बिघडवू नका. तसेच तिच्यात काहीच ठेवलेलं नसेल तरी ती अगदीच लेचीपेची दिसते. त्यामुळे पर्सच्या आकाराकडेही लक्ष द्या.
४. फॉर्मल कपडे घातले असतील तर त्यावर प्रिंटेड प्रकारातली मोठ्या आकाराची पर्स घेऊ नका. एकाच रंगाची, प्लेन आणि मध्यम आकाराची पर्स निवडा.
सारखे करपट ढेकर येतात- पोट नेहमीच फुगलेलं वाटतं? करून बघा तज्ज्ञांनी सांगितलेला १ उपाय
५. फॉर्मल कपड्यांवर कलरफूल फुटवेअर घालणं टाळा. काळ्या- ब्राऊन रंगातले पॉईंटेड शूज, हाय हिल्स सॅण्डल त्यावर उठून दिसतात.