Lokmat Sakhi >Fashion > साडी नेसल्यावर खूप जाड दिसता ? ५ टिप्स, साडी नेसल्यावर दिसाल स्लिम - सुंदर - आकर्षक...

साडी नेसल्यावर खूप जाड दिसता ? ५ टिप्स, साडी नेसल्यावर दिसाल स्लिम - सुंदर - आकर्षक...

Saree Tips & Hacks for Plus Size Women : साडी नेसल्यावर स्लिम, सुंदर व टापटीप दिसण्यासाठी फॉलो करा या खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 11:24 PM2023-10-25T23:24:26+5:302023-10-25T23:49:19+5:30

Saree Tips & Hacks for Plus Size Women : साडी नेसल्यावर स्लिम, सुंदर व टापटीप दिसण्यासाठी फॉलो करा या खास टिप्स...

5 Saree Secrets to Look Slim Without Actually Losing Weight, Saree Tips & Hacks for Plus Size Women | साडी नेसल्यावर खूप जाड दिसता ? ५ टिप्स, साडी नेसल्यावर दिसाल स्लिम - सुंदर - आकर्षक...

साडी नेसल्यावर खूप जाड दिसता ? ५ टिप्स, साडी नेसल्यावर दिसाल स्लिम - सुंदर - आकर्षक...

साडी व साडीप्रेम हा प्रत्येक स्त्रीचा अतिशय आवडता विषय असतो. सध्याच्या काळात महिलांचे वेगवेगळ्या फॅशनचे, ट्रेंडी आऊटफिट्स असले तरीही भारतीय संस्कृतीने आपले वेगळेपण अजून जपून ठेवलं आहे. वेस्टर्न वेअर कल्चरचं वेड तरुणाईमध्ये असलं तरीही भारतीय संस्कृतीची ओळख असलेली साडी सगळ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. स्त्रिया त्यांचे साडीप्रेम शब्दांत व्यक्त करु शकत नाहीत. एखादी साडी जर त्यांच्या मनात भरली तर ती विकत घेण्यापासून त्यांना कोणीही अडवू शकत नाही. घरात लग्नसराई असो किंवा एखादा सण आपल्या कपाटात कितीही साड्या असल्या तरीही खास प्रसंगाला खास साडी घेतल्याशिवाय स्त्रिया शांत राहूच शकत नाहीत. सणवार, लग्नसमारंभ, वाढदिवस अशा या ना त्या निमित्ताने साडी खरेदी ठरलेलीच असते(How to look slim in saree for plus size?).

स्त्रियांना साडी नेसण्यासाठी फक्त निमित्तच हवे असते. साड्यांचे असंख्य न मोजता येणारे इतके प्रकार, डिझाइन्स, रंगसंगती, पॅटर्न, कापडाचा प्रकार अशा अनेक गटांत साड्यांचे वर्गीकरण (How to Wear Saree for Plus Size 5 Ideas & Styling Tips) करता येऊ शकते. साड्यांचे असे अनेक प्रकार जरी असले तरीही त्यातील नेमका कोणता प्रकार आपल्याला सूट होतो, याकडे लक्ष (How to wear saree perfectly to look slim) दिले पाहिजे. एखाद्या कार्यक्रमात किंवा खास प्रसंगी काय घालायचे याबद्दल खूप गोंधळ होतो, तेव्हा साडी (fatty women saree wearing) हा सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. परंतु साडी नेसण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी ही घ्यावी लागते. साडी नेसताना आपली उंची, आपला रंग, बांधा, शरीरयष्टी यांसारख्या गोष्टीकडे विशेष (Plus Size Saree Draping Ways) लक्ष द्यावे लागते. बहुतेक महिलांना आपण साडीत स्लिम, सुंदर दिसावे अशी इच्छा असते. यासाठी काही खास टिप्स फॉलो करुयात(5 Saree Secrets to Look Slim Without Actually Losing Weight)

साडी नेसल्यावर स्लिम, सुंदर दिसण्यासाठी टिप्स :- 

१. साडी थोडी घट्ट बांधा :- साडी नेसताना साडी कमरेभोवती थोडी घट्ट बांधावी. साडी थोडी घट्ट बांधल्याने ती व्यवस्थित अंगाला बसते त्यामुळे आपल्याला स्लिम लूक मिळू शकतो. परंतु आपण काहीवेळा साडी अतिशय लूज नेसतो  साडी लूज नेसल्याने आपण थोडे जाड दिसू शकतो, यामुळे साडी नेसताना ती थोडी घट्ट कमरेभोवती बांधावी. यामुळे स्लिम लूक येण्यास मदत होते. 

हेव्ही ब्रेस्ट - जाड दंड - ब्लाऊजचे फिटिंग कायम चुकते ? ४ सोप्या टिप्स, शिवा परफेक्ट ब्लाऊज...

२. डार्क रंग निवडावा :- जर आपण जास्त हेव्ही किंवा जाड असाल तर आपले वजन लपवण्यासाठी किंवा स्लिम दिसण्यासाठी साडीचा रंग योग्य पद्धतीने निवडणे गरजेचे असते. शक्यतो साडीत बारीक किंवा स्लिम दिसण्यासाठी साडीचा रंग डार्क निवडावा. काळा, मरून, जांभळा, बॉटल ग्रीन असे डार्क रंग निवडण्याला प्राधान्य द्यावे. 

खोटे कानातले घातल्यानं कानाला जखमा होतात, रक्त येतं - गाठी होतात ? ३ सोप्या टिप्स, बिंधास्त घाला खोटे कानातले...

३. प्रिंट्सची निवड योग्य पद्धतीने करावी :- साडी खरेदी करताना प्लस साइजच्या महिलांनी एक विशेष गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे लहान प्रिंट असलेल्या साड्या निवडणे. मोठ्या प्रिंट असलेल्या साड्यांमुळे बॉडी अधिक भरलेली दिसते, पण लहान प्रिंट असलेल्या साड्या आपल्याला स्लिम लुक देतात. 

दीर्घकाळ स्पोर्ट्स ब्रा वापरल्याने पाठदुखीची समस्या होऊ शकते का ? एक्स्पर्ट सांगतात खरे कारण...

४. ब्लाऊज शिवताना घ्या काळजी :- साडीसोबतच ब्लाऊज शिवताना देखील काळजी घ्यावी. साडीसोबत ब्लाऊज निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात जसे की त्याची स्लीव्ह. साडीमध्ये स्लिम दिसण्यासाठी शॉर्ट किंवा स्लीव्हलेस ऐवजी फुल स्लीव्ह पर्याय निवडा. यामुळे जाड दंड सहज झाकले जातात आणि अशा स्लीव्हजही छान दिसतात. जर उंची कमी असेल तर गळ्यात कमी डीपलाईनचे किंवा चौकोनी ब्लाउज घालू नयेत. तुम्ही लांब बाह्यांचे आणि गोल गळ्याचे ब्लाऊज घालू शकता.

५. पेटिकोटची निवड :- जर तुम्ही जाड असाल तर बारीक आणि उंच दिसण्यासाठी पेटिकोटची निवडही खूप महत्वाची असते. बॉडी फिटींग पेटिकोट वापरल्यास तुमच्या कंबरेखालचा भाग बारीक दिसतो आणि साडी चापून चोपून बसते. या पेटिकोटचे कापडही आरामदायक असते. त्यामुळे तुम्ही कितीही वेळ असं ब्लाऊज वेअर करू शकता.

Web Title: 5 Saree Secrets to Look Slim Without Actually Losing Weight, Saree Tips & Hacks for Plus Size Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.