Join us  

सुटलेलं पोट दिसू नये म्हणून कपडे निवडताना लक्षात ठेवा 5 गोष्टी, पोटाचा घेर लपेल आपोआप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 3:31 PM

वाढलेलं पोट झाकायचं कसं यासाठी काही सोपे उपाय पाहूयात. पोट दिसू नयेत यासाठी कपड्यांची निवड कशी करायची याविषयी...

ठळक मुद्देवाढलेलं पोट कमी करणे हा उपाय आहेच, पण ते दिसू नये म्हणून काीह ट्रिक्स तर वापराव्या लागणार फॅशन करताना थोडी सजगता दाखवली तर आपण स्वत:ला छान कॅरी करु शकतो

एखाद्या समारंभाला किंवा कार्यक्रमाला जायचं तर सगळ्यात आधी आपली कपडे निवडण्याची लगबग सुरू होते. आपण सगळ्यांमध्ये उठून दिसायला हवे असे वाटत असल्याने कपडे निवडताना आपण जास्त चिकित्सा करतो. आपल्याला चांगले दिसणारे कपडे तर हवे असतातच पण सगळ्यात महत्त्वाचं आपण जाड दिसणार नाही, आपलं पोट दिसणार नाही याची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं असतं. कोणत्याही कपड्यांतून आपलं पोट दिसलं तर आपण जाड तर दिसतोच पण फोटोही छान येत नाहीत. आता हे असलेलं पोट झाकायचं कसं यासाठी काही सोपे उपाय पाहूयात. पोट दिसू नयेत यासाठी कपड्यांची निवड कशी करायची याविषयी...

 

१. कडेला गडद रंगाचे आणि मध्यभागी वेगळ्या रंगाची प्रिंट असलेले कपडे निवडावेत. जेणेकरुन पोटोचा घेर जास्त दिसत नाही. गडद रंगामुळे पोटाचा मोठा भाग लपला जातो. मधला रंग फिकट असल्याने पाहणाऱ्यांची नजर त्याच रंगाकडे जाते आणि आपण आपसूकच बारीक असल्यासारखे भासते. त्यामुळे तुम्हाला पोट मोठे असूनही बारीक दिसायचे असेल तर तुम्ही अशाप्रकारचे कपडे आवर्जून वापरायला हवेत.

(Image : Google)

२. गळ्याला डिझाईन असलेले, वेगळे प्रिंट असलेले कपडे पोट मोठं असणाऱ्यांनी आवर्जून घालायला हवेत. असे केल्याने पाहणाऱ्याचे सगळे लक्ष हे तुमच्या पोटाकडे न जाता तुमच्या कपड्याला असलेल्या गळ्याच्या डिझाईनकडे जाते. यामध्ये गळ्याला नेट, लेस, फ्रिल किंवा एम्ब्रॉडरीने सजावट केलेली असू शकते. यामध्ये पारंपरिक किंवा वेस्टर्न अशा कोणत्याही प्रकारचे कपडे असतील तरी गळ्याला डिझाईन असल्याने पोटाच्या भागाकडे विशेष लक्ष जात नाही. 

(Image : Google)

३. आपले पोट आणि वाढलेली कंबर याकडे लक्ष जाऊ नये असे वाटत असेल तर लांब साईजची ज्वेलरी न घालता गळ्याभोवती येईल अशी ज्वेलरी निवडा. त्यामुळे तुमच्या गळ्याकडे लक्ष वेधले जाईल. ही ज्वेलरी थोडी ठसठशीत असेल याची काळजी घ्या म्हणजे त्याकडे विशेष लक्ष जाईल. सध्या बाजारात अशाप्रकारच्या ज्वेलरीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. 

(Image : Google)

४. आपलं पोट मोठं दिसू नये यासाठी कोणतेही कपडे घालताना त्याला बाजूला कट असेल असेच कपडे निवडा. याचे कारण म्हणजे कट नसेल तर ते कपडे पोटाला खूप घट्ट बसतात आणि मग पोटाच्या वळ्या दिसतात. यामुळे आपल्या पोटाकडे लक्ष जाऊ शकते. पण हेच जर टॉपला कट असेल तर पोटापाशी हा टॉप घट्ट होण्याचे कारणच नसते. त्यामुळे कपडे खरेदी करताना ही काळदी अवश्य घ्यायला हवी.

(Image : Google)
 

५. तुमचं पोट मोठं असेल तर हाय वेस्ट पँट घ्या. ही पँट शक्यतो लूज असेल असे बघा. तसेच या पँटला स्प्लिटस असतील तर ती जास्त छान बसते आणि दिसतेही. त्यामुळे जाड असूनही तुम्ही अगदी सहज वेगवेगळ्या रंगाच्या, कापडाच्या आणि फॅशनेबल पँट घालू शकता. या पँटला पोटाच्या वरच्या बाजूला म्हणजेच निमुळत्या भागावर एखादा मोठं बक्कल असलेला किंवा ट्रेंडी बेल्ट लावला तर तुमच्या पोटाकडे लक्ष न जाता तुमच्या बक्कलकडे पाहणाऱ्यांचे लक्ष जाईल आणि पोटाचा भाग झाकला जाईल. 

(Image : Google)

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्सखरेदी