Lokmat Sakhi >Fashion > आपण कोणते कपडे घालतो याचा आपल्या कॉन्फिडन्सवर परिणाम होतो, मनस्थिती बदलते हे खरे आहे का?

आपण कोणते कपडे घालतो याचा आपल्या कॉन्फिडन्सवर परिणाम होतो, मनस्थिती बदलते हे खरे आहे का?

How Does Clothing Influence Our Mood & Confidence : आपण परिधान केलेल्या कपड्यांचा आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर प्रभाव पडतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 07:31 PM2023-02-20T19:31:03+5:302023-02-20T19:44:44+5:30

How Does Clothing Influence Our Mood & Confidence : आपण परिधान केलेल्या कपड्यांचा आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर प्रभाव पडतो.

5 Ways That Your Clothing Can Affect Your Mood & Confidence | आपण कोणते कपडे घालतो याचा आपल्या कॉन्फिडन्सवर परिणाम होतो, मनस्थिती बदलते हे खरे आहे का?

आपण कोणते कपडे घालतो याचा आपल्या कॉन्फिडन्सवर परिणाम होतो, मनस्थिती बदलते हे खरे आहे का?

आपण परिधान करत असलेल्या प्रत्येक पेहेरावाचे स्वतःचे असे विशिष्ट्य महत्व असते. कपड्यांचे रंग व प्रकार यात भरपूर प्रमाणांत विविधता आढळते. काही वेळा आपण पारंपरिक, मॉडर्न, वेस्टर्न, इंडोवेस्टर्न असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतो. आपण केलेला पेहराव हा आपल्या व्यक्तीमत्वाचाच एक भाग असतो. समोरच्या व्यक्तीने आपल्याला पहिल्यांदा पाहिल्यावर सर्वातआधी लोकांच्या नजरेत येतात ते आपले कपडे किंवा पेहेराव.

आपले कपडे आपलं व्यक्तीमत्व सांगत असतात. त्याचबरोबर आपण परिधान केलेल्या कपड्यांचा आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर प्रभाव पडतो. कपड्यांमध्ये सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर प्रभाव टाकण्याची शक्ती असते(How Does Clothing Influence Our Mood & Confidence).

कपड्यांचा आपल्या मनःस्थितीवर व आत्मविश्वासावर कसा प्रभाव पडतो?

१. कम्फर्टेबल कपडे :- जेव्हा आपण आरामदायक किंवा स्वतःच्या शरीराला फिट बसणारे कपडे घालतो तेव्हा आपल्याला शारीरिक दृष्टया चांगले वाटते. शरीराला कुठे बोचणारे, खरखरीत कापडाचे, स्वतःला सूट न होणारे, न आवडणारे कपडे घेतल्यास आपला मूड चिडचिडा आणि आत्मविश्वास कमी होतो. परंतु तेच ज्या दिवशी आपण आपल्या आवडीचे, स्वतःला फिट बसणारे कपडे घालतो तेव्हा आपला मूड आनंदी व चांगला राहतो. ज्या प्रकारच्या कपडयात आपल्याला स्वतःला आरामदायक किंवा कम्फर्टेबल वाटू लागते, तेव्हा आपला मूड आनंदी राहून आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्यामुळे नेहमी आरामदायक  व स्वतः ज्यात कम्फर्टेबल असू असेच कपडे घालावेत. ज्या कपड्यातून आपली शरीरयष्टी, देहबोली, व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल, असे कपडे वापरावेत. खूप टाईट किंवा खूपच सैल कपडे वापरू नयेत. 

२. स्टाईल :- आपली वैयक्तिक शैली किंवा स्टाईल प्रतिबिंबित करणारे कपडे परिधान केल्याने आपल्याला आपल्या स्वतःमध्ये अधिक आत्मविश्वास आणि कम्फर्टेबल वाटू लागते. जेव्हा आपल्याला असे वाटते की, मी केलेल्या स्टाईलमध्ये मी स्वतः छान दिसत आहे किंवा ही स्टाईल मला शोभून दिसत आहे तेव्हा आल्याला स्वतःबद्दल खूप चांगले वाटू लागते. बऱ्याचदा अनेकांना एखाद्या सेलिब्रेटी अथवा प्रभावी व्यक्तिमत्वाला कॉपी करण्याची सवय असते. मात्र इतरांसारखं वागण्याने आपलं व्यक्तिमत्व बदलत नाही. यासाठीच इतरांची स्टाईल कॅरी करण्यापेक्षा आपली स्वतःची वेगळी स्टाईल कॅरी करा. ज्यामुळे आपले प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकेल. आपल्या रंग, रूपाला कोणते रंग साजेसे ठरतील, याचा विचार करून कपडे निवडा. फॅशन ट्रेंड, सेलिब्रिटी लुक इत्यादी गोष्टींच्या मागे लागू नये. चित्रपटातील हिरो- हिरॉईन कोणते कपडे घालतात याचा विचार न करता आपल्याला काय साजेसं ठरतं, प्रसंग काय आहे, याचा विचार करूनच योग्य तो पेहराव करावा.

 

३. प्रसंगानुरूप कपड्यांची निवड :- काहीवेळा आपण काही खास प्रसंगानुरूप कपड्यांची निवड करून मगच ते कपडे घालतो. कोणते कपडे परिधान करावेत, हे ठरविण्यासाठी आधी आपण कुठे जाणार आहोत किंवा निमित्त काय आहे, ते महिती करून घेतलं पाहिजे. त्यानंतर आपल्या बॉडी टाइपनुसार कपड्यांची निवड करायला हवी. उदाहरणार्थ :- जर आपण कुठे जॉब इंटरव्यूला जाणार असाल तर तेव्हा फॉर्मल कपडे घालणे आपण पसंत करतो. याउलट, आपण जरा एखाद्याच्या लग्नात जात असाल, तर तिकडे उठून दिसणाऱ्या रंगांचे कपडे, ज्यावर कलाकुसर केलेली असते, असे कपडे घालण्याला प्राधान्य देतो. 

४. कपड्यांचा रंग :- कपड्यांच्या रंगांची निवड हा फारच महत्त्वाचा विषय असतो. कारण, कपड्यांमध्ये खूपच विविध प्रकारचे पर्याय असतात. आपल्या स्किनच्या रंगाला जे कपडे सूट होतील, याचा विचार नक्की करावा. यासोबतच आपण हे कपडे कुठल्या वेळेला घालावेत याचाही विचार करावा.

५. कपडे आणि प्रतीकात्मकता :- कपड्यांमध्ये सांस्कृतिक किंवा वैयक्तिक प्रतीकात्मकता असू शकते. जे आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर प्रभाव टाकू शकतात. आपल्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे कपडे परिधान केल्यास आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आपण ज्या प्रकारचे कपडे परिधान करतो त्याचा आपल्यावर आणि आपल्याला समोरून पाहणाऱ्या व्यक्तीवरही काही अंशी प्रमाणात परिणाम होत असतो. आपण ज्या प्रकारचे व रंगांचे कपडे घालतो त्यावरून आपली इमेज ठरत असते. उदाहरणार्थ :- आपण भडक रंगाचे कपडे घालून वावरत असाल, तर त्यातून आपण आक्रमक किंवा तडफदार आहात, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होऊ शकते. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे घातल्यावर तुमचं व्यक्तिमत्त्व शक्तिशाली असल्याचे सगळ्यांना वाटते.

  

एकूणच, कपड्यांमध्ये सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर प्रभाव टाकण्याची शक्ती असते. विशिष्ट परिस्थिती, प्रसंग, मूडसाठी योग्य कपडे निवडून परिधान केल्याने आपल्याला अधिक कम्फर्टेबल व आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकते.

Web Title: 5 Ways That Your Clothing Can Affect Your Mood & Confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.