Join us  

सिल्कच्या सुंदर कुर्त्यावर पारंपरिक कलमकारी वर्क! अदिती राव हैदरीचा ४७ हजारांचा स्पेशल कुर्ता, पाहा जुन्या- नव्याचा फॅशन मिलाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 12:49 PM

Celebrity Fashion: कलमकारी वर्क (kalamkari work) असणाऱ्या कपड्यांचा स्वत:चा एक वेगळाच बाज असतो. असाच तब्बल ४७ हजारांचा एकदम खास ड्रेस घातला अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने (Actress Aditi Rao Hydari's silk kurta).. 

ठळक मुद्दे सिल्कवर केलेला कलमकारी प्रयोग नेहमीच खास ठरतो. याशिवाय तिच्या या ड्रेसवर मरून आणि गोल्डन थ्रेडचा वापर करून गोटा आणि मरोडी वर्क करण्यात आले आहे.

अभिनेत्री अदिती राव हैदरी नेहमीच तिचे क्लासिक फोटो साेशल मिडियावर शेअर करत असते. वेस्टर्न लूक तिला जेवढे शोभून दिसतात, त्यापेक्षाही अधिक सुंदर ती एथनिक लूकमध्ये (Aditi Rao Hydari in ethenic look) दिसते. त्यामुळेच तर खास करून तिचे एथनिक लूक फेस्टिव्ह सिझन आणि लग्न सराईमध्येही तिच्या चाहत्यांकडून नेहमीच फॉलो केले जातात. आता सुद्धा अदितीने तिचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केला असून या फोटोमध्ये तिने घातलेल्या ड्रेसची चांगलीच चर्चा होत आहे...

 

अदितीने घातलेला ड्रेस किती छान आहे, याची तर चर्चा आहेच. पण त्यापेक्षाही जास्त चर्चा रंगली आहे ती तिच्या ड्रेसच्या किमतीची. ड्रेसची किंमत ऐकून या ४७ हजारांच्या (47 thousand) ड्रेसमध्ये नेमकं आहे तरी काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तिचा हा मोतिया ivory white रंगाचा ड्रेस सेलिब्रिटीफॅशन डिझायनर पुनीत बालाना (Punit Balana) यांनी डिझाईन केला आहे. या ड्रेससाठी त्यांनी खास सिल्कच्या कपड्यावर कलमकारी वर्क केले आहे. कलमकारी वर्क हे साधारणपणे कॉटन कपड्यांवर केलेले दिसून येते. त्यामुळेच सिल्कवर केलेला कलमकारी प्रयोग नेहमीच खास ठरतो. याशिवाय तिच्या या ड्रेसवर मरून आणि गोल्डन थ्रेडचा वापर करून गोटा आणि मरोडी वर्क करण्यात आले आहे. आता हे वर्क म्हणजे नेमकं कसं ते पाहूया.. 

 

मरोडी वर्क म्हणजे काय? (What is marodi work?)कपड्यांवर जे विणकाम केले जाते त्याचे अनेक प्रकार असतात, हे आपल्याला माहिती आहे. जसा टाका बदलतो तसे विणकामाचे नक्षीही बदलत जातात. मरोडी वर्क हा विणकामाचाच एक प्रकार. मरोडी म्हणजे मराठीत मुडपणे. जेव्हा दोरा विशिष्ट पद्धतीने मुडपला जातो आणि ओवला जातो, तेव्हा त्या विणकामाच्या पद्धतीला मरोडी वर्क म्हणतात. 

 

गोटा वर्क म्हणजे काय? (What is gota work?)गोटावर्क हा जरदोसी वर्कचा एक भाग आहे. गोटा वर्क करण्यासाठी सिल्कचा सोनेरी धागा प्रामुख्याने वापरला जातो. या कामामधली विण अतिशय दाट असते. डिझायनर प्रकारातल्या अनेक साड्यांना गोटावर्कची बॉर्डर असते. ओढणी, घागरे आणि ब्लाऊजसाठीही बॉर्डर म्हणून गोटा वर्कचा पर्याय निवडला जातो.

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्सआदिती राव हैदरीसेलिब्रिटी