गंगूबाई काठियावाडी चित्रपटापासून आलिया भट पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आहे. सगळीकडे तिच्या अभिनय कौशल्याचे तोंडभरून कौतूक होत आहे.. आपल्या कसदार अभिनयाने आलियाने (Actress Alia Bhatt) या भुमिकेला चांगलाच न्याय दिला असल्याचीही चर्चा आहे.. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आलियाने नेसलेल्या साड्यांचे लूकही कमाल व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा आलियाचा एक सुंदर लूक सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. यामध्ये तिने ट्यूल लेहेंगा घातला असून त्याचे जे ब्लाऊज आहे, तो प्रकार 'तितली' ब्लाऊज (lehenga and Titli Blouse costs more that Rs. 2 lacs) म्हणून ओळखला जातो.
सेलिब्रिटी स्टायलिस्ट लक्ष्मी लेहर यांनी आलियाचे या लेहेंग्यातले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केले आहेत. या फोटोत आलिया कमालीची गोड दिसत असून तिचा लेहेंगा अतिशय आकर्षक दिसतो आहे. लेहेंग्याचे ब्लाऊज रॉ सिल्कचे असून गुलाबी रंगाचे आहे. त्यावर थ्री डी कुंदन, सिक्विन, मोती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लेस लावून ते डिझाईन करण्यात आले आहे. समोरच्या बाजूने बघितल्यास ब्लाऊजचा आकार फुलपाखरासारखा वाटतो. त्यामुळे या प्रकाराला तितली ब्लाऊज म्हणून ओळखले जाते.
ट्यूल लेहेंगा म्हणजे काय? (tulle lehenga)
- आलियाचा लेहेंगा पांढरा, गुलाबी आणि पीच या तीन रंगांचे सुंदर कॉम्बिनेशन वापरून तयार करण्यात आला आहे. या लेहेंग्यावरही थ्री डी कुंदन, सिक्विन आणि मोती वर्क आहे. लेहेंग्याचा घेर हा लेअर्ड प्रकारातला असून आलियाचा हा ड्रेस तब्बल २ लाख २२ हजार रूपयांचा आहे, अशी चर्चा आहे.
- सध्या ट्यूल लेहेंग्याची खूप फॅशन असून आलियाचा लेहेंगा याच प्रकारातला आहे. ट्यूल लेहेंगा म्हणजे वजनाला अतिशय हलकी असणारी जाळी किंवा नेट वापरून तयार करण्यात आलेला लेहेंगा. हा घागरा दिसायला खूप हेवी वाटतो. पण लेहेंग्याचे कापड आणि तो डिझाईन करण्यासाठी वापरलेले सजावटीचे सामान वजनाने खूप कमी असते.
त्यामुळेच या लेहेंग्याची किंमत खूप जास्त असते. वजनाने हलक्या असणाऱ्या कपड्यावर काम करणे अतिशय अवघड असल्याने खूप वेळ देऊन आणि हळूवारपणे हा लेहेंगा डिझाईन करावा लागतो.
- रेशीम, नायलॉन अशा पद्धतीचे कापड हा लेहेंगा तयार करण्यासाठी वापरले जाते. आलियाच्या या लेहेंग्यासाठी रेशीम वापरण्यात आले आहे.