Join us  

मैत्रिणीच्या लग्नासाठी आलिया भटने घातला ५२ हजारांचा सुंदर ड्रेस, त्यावरची नक्षी अशी की.... बघा व्हायरल फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 5:24 PM

Actress Alia Bhatt's Pink Or Rani Colour Dress Worth Rs 52K: अभिनेत्री आलिया भटचे गुलाबी रंगातल्या ड्रेसमधले काही फोटो साेशल मिडियावर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत... (Viral photos of Alia Bhat in pink dress)

ठळक मुद्देतिचा हा ड्रेस तब्बल ५२ हजारांचा असून तिने घातलेले हिरव्या रंगाचे लटकन टाईप कानातले Hanut Singh and rings यांनी डिझाईन केलेले आहेत.

अभिनेत्री आलिया भट नेहमीच तिच्या खास अशा ड्रेसिंग आणि मेकअप स्टाईलमुळे ओळखली जाते. मेकअप, ड्रेसिंग आणि ज्वेलरी या तिन्ही गोष्टींमध्ये आलियाची युनिक चॉईस दिसून येते. त्यामुळेच फॅशन जगतामध्ये जे काही ट्रेण्डसेटर आहेत, त्यापैकी एक म्हणून आलियाकडे पाहतात. आता हेच पाहा ना आलियाने तिच्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये जो डार्क गुलाबी रंगाचा किंवा राणी रंगाचा जो ड्रेस घातला होता, त्यात ती अतिशय सुंदर दिसत होती (Actress Alia Bhatt's pink or rani colour dress worth Rs 52K). त्या ड्रेसची, तिच्या मेकअपची सध्या बरीच चर्चा सोशल मिडियावर होत असून तिचे सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत (Viral photos of Alia Bhat in pink dress for her friend's wedding).

 

आलियाने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. यात ती तिच्या मैत्रिणींसोबत दिसत असून सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरला आहे तो आलियाने घातलेला गुलाबी ड्रेस.

५ मिनिटांत पातेलंभर मक्याचे दाणे सोलून होतील, बघा स्वीटकॉर्न झटपट सोलण्याच्या २ पद्धती

आलियाचा हा ड्रेस रॉ मँगो या प्रसिद्ध फॅशन हाऊसचा असून तो anti-fit silhouette या प्रकारातला आहे. म्हणजेच असे ड्रेस अगदी परफेक्ट फिटिंगचे नसतात. ते थोडे सैलसर असल्याने खूप जास्त आरामदायी असतात. आलियाचा ड्रेसही असाच असून तिने त्यावर ओढणीही खूप वेगळ्या पद्धतीने घेतली आहे. तिने मागच्या बाजूने ओढणी घेऊन दोन्ही खांद्यांवरून पुढे सोडली आहे. अशा पद्धतीची ओढणी तुम्ही येत्या लग्नसराईमध्ये नक्कीच घेऊ शकता.

 

या गर्द गुलाबी ड्रेसवर सुंदर थ्रेड वर्क केले असून त्याचे डिझाईन Mughal architecture या कलाप्रकाराशी मिळतेजुळते आहे.

झाडांना फुलं येतंच नाहीत? १ सोपा उपाय, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर अगदी लवकर

तिचा हा ड्रेस तब्बल ५२ हजारांचा असून तिने घातलेले हिरव्या रंगाचे लटकन टाईप कानातले Hanut Singh and rings यांनी डिझाईन केलेले आहेत. हिरव्या रंगाची छोटी टिकली, गुलाबी रंगाचे ब्लश आणि न्यूड शेड लिपस्टिक एवढ्याच मर्यादित मेकअपमध्येही आलिया कमालीची सुंदर दिसते आहे. 

 

टॅग्स :फॅशनआलिया भट