दीपिका पादुकोण हल्ली बऱ्याच वेगवेगळ्या निमित्ताने चर्चेत आहे. सध्या गाजणाऱ्या 'बेशरम रंग' या गाण्यात तिने घातलेल्या कपड्यांवरूनही ती खूप जास्त ट्रोल झाली. त्यानंतर वाढदिवसानिमित्त ती नवरा रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) शॉर्ट व्हॅकेशनवर गेली, त्याचीही चर्चा झाली. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे ती तिने घातलेल्या एका मिडी ड्रेसमुळे. व्हॅकेशन संपवून ती जेव्हा पुन्हा मुंबईत आली, तेव्हा तिने हा ड्रेस घातला होता. तिच्या शुभ्र चमकदार पांढऱ्या ड्रेसची किंमत आहे तब्बल २१ हजार रुपये.(Deepika Padukone's Glossy White Dress)
आता सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचे कपडे, दागदागिने, फुटवेअर, गॉगल यांच्या किमती हजारोंच्या घरात असणारच. त्यात दीपिका तर आघाडीची अभिनेत्री. त्यामुळे तिच्या वस्तूंच्या महागपणाबद्दल तर विचारायलाच नको.
खाऊन बघा भोपळ्याचं चमचमीत भरीत! भाकरीसोबत खाण्याची तर मजाच न्यारी, पाहा सोपी- चवदार रेसिपी
आताही तिने जो ड्रेस घातला आहे, तो तब्बल २१ हजारांचा आहे. पण तो ड्रेस पाहून तो एवढा महाग कसं काय, असं काय त्यात एवढं खास आहे, असा प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत. शुभ्र पांढऱ्या रंगाचा हा मिडी ड्रेस कफ्तान प्रकारातला असून अतिशय सैलसर आहे.
दीपिकाच्या महागड्या ड्रेसची खासियतया ड्रेसच्या बाह्या बऱ्यापैकी लांब असून गळा डिप व्ही आकाराचा आहे. या ड्रेसला दोन लेअर्स असल्याने तो अधिक घेरदार वाटतो.
मराठी अभिनेत्रींचे संक्रांत स्पेशल लूक! बघा हलव्याचे दागिने आणि काळी साडी नेसून केलेला सुंदर साज
तिचा हा ड्रेस Joslin Studio या ब्रॅण्डचा असून त्याला Marlo Organic Cotton Midi Smock Dress असं म्हणून ओळखलं जातं. त्या ब्रॅण्ड हाऊसच्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ड्रेसची किंमत २१ हजार १०० रुपये एवढी दाखवण्यात आली आहे. अशा प्रकारातला कपडा अतिशय तलम असल्याने तो महागडा असतो, असं सांगितलं जातं.