मागील काही वर्षांपासून अभिनेत्री करिश्मा कपूर (glamorous look of Karishma) चित्रपटांमध्ये झळकलेली नाही. पण असे असले तरी तिचे ग्लॅमर मात्र यत्किंचितही कमी झालेले नाही. म्हणूनच तर आजही तिच्या प्रत्येक लूकची आणि तिच्या स्टाईलची जबरदस्त चर्चा होत असते.. कधी करिश्माचे साडीतले सौंदर्य दिसते तर कधी वेस्टर्न लूकमध्ये ती कमालीची भाव खाऊन जाते.. ट्रॅडिशनल ते वेस्टर्न अशा प्रत्येक प्रकारातील तिचा कपड्यांचा चॉईस खरोखरंच जबरदस्त आहे.. सध्या तिचा असाच एक लूक सोशल मिडियावर चर्चेत आहे...
करिश्माने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते. या फोटोंना तिने "Indian Summer" असं कॅप्शन दिलं होतं. फोटोंमध्ये ती मोतिया रंगाच्या अनारकली सूटमध्ये दिसते आहे.. आधीच करिश्मा गोरीपान आणि त्यात तिने घातलेला मोतिया रंगाचा ड्रेस यामुळे करिश्माचे सौंदर्य खऱ्या अर्थाने बहरून आल्यासारखे वाटते. हा ड्रेस Punit Balana यांनी डिझाईन केला असून या ड्रेसची किंमत तब्बल ६५ हजार रुपये असल्याचे सांगितले जाते.
करिश्माच्या या ड्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा हा संपूर्ण सूट चंदेरी सिल्क प्रकारातला असून ड्रेसवरची ओढणी मात्र ऑर्गेंझा सिल्कची आहे. अनारकली सूटवर खालच्या बाजूने अतिशय हेवी कॉईन एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे.. तसेच ओढणीचे चारही काठ पट्टी बॉर्डर वर्क करून सजविण्यात आले आहेत.
या ड्रेसवर करिश्माने कमीतकमी दागिने घातले आहेत. एका हातात गोल्डन रंगाचं मोती जडलेलं कडं, गळ्यात मोत्याचं चोकर आणि कानातले.. तसेच केसांचा अंबाडा.. असा करिश्माचा एकंदरीतच मोजून- मापून केलेला पेहराव तिला कमालीचा आकर्षक लूक देत आहे.. जयपूर येथे नुकत्याच झालेल्या एका समारंभासाठी तिने हा ड्रेस घातल्याचं बोललं जातं...
कॉईन एम्ब्रॉयडरी म्हणजे काय? (what is coin embroidary?)
- कॉईन एम्ब्रॉयडरी हा सिक्विन वर्कप्रमाणेच एक विणकामाचा प्रकार आहे. फक्त यातला मुख्य फरक असा की सिक्विन वर्कमध्ये अतिशय छोट्या आकाराचे शिक्के वापरले जातात तर कॉईन वर्कमधले शिक्के तुलनेने जरा मोठे असतात.
- जवळपास १५ ते २० वेगवेगळ्या प्रकारांनी कॉईन एम्ब्राॅयडरी करता येते.
- कॉईन एम्ब्रॉयडरी करताना कॉईन मध्यभागी ठेवला जातो आणि त्याच्याभोवती वेगवेगळ्या दोऱ्यांनी काम केले जाते.
- साडी, ड्रेस, ओढणी, जॅकेट अशा अनेक ठिकाणी कॉईन वर्क आढळून येते.
- आताही बहुतांश वेळेस कॉईन वर्क हातानेच केले जाते.